मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने(state bank of india) ट्वीट करत म्हटले की आता त्यांच्या कोणत्याही एटीएम(ATM)मधून पैसे काढणे(Cash withdrawal) अधिक सुरक्षित झाले आहे. जर तुम्ही एसबीआयच्या एटीएम(SBI ATM)मधून १० हजार अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढत असाल तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी(OTP service) पाठवला जाईल. त्यानंतर तुम्हाला रक्कम काढणे शक्य होणार आहे.
या ट्वीटमध्ये म्हटले आहे की एटीएम घोटाळ्यापासून ग्राहकांना वाचवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने संपूर्ण देशात २४ तासांसाठी ओटीपी आधारित सेवा सुरू केली आहे. हा नवा नियम १८ सप्टेंबरपासून लागू होत आहे. दरम्यान हा नियम केवळ एसबीआय डेबिट कार्ड होल्डर्सवर लागू होईल.
बँकेने आपल्या ग्राहकांना हेही सांगितले की जर तुम्ही एसबीआयच्या कार्डाचा वापर करत आहात तर एसबीआयच्या एटीएममध्ये जाताना तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर घेऊन जा. पैसे काढताना तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यानंतरच तुम्ही १० हजार अथवा त्या पेक्षा अधिक रक्कम काढू शकता.
जर एखाद्या ग्राहकाकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर नाही आहे तर तो एसबीआयच्या डेबिट कार्डने एसबीआयच्या एटीएमवरून १० हजारापेक्षा अधिक रक्कम काढू शकत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीला लवकरात लवकर आपला मोबाईल नंबर रजिस्टर्ड करावा लागेल.
स्टेट बँकेने याआधीच हा नियम लागू केला होता. १८ सप्टेंबरपासून २४ तासांसाठी हा नियम लागू केला जात आहे. सध्याच्या नियमानुसार ओटीपी प्रक्रिया रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत लागू होती.