एसबीआयने 40 कोटी ग्राहकांना केले सावध, जर मोबाईलमध्ये हे नंबर सेव्ह असतील तर बँक खाते होईल रिकामे

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयकडून वेळोवेळी ग्राहकांना बँकिंगमधल्या फसवणुकीबद्दल सावध केले जात असते. आता स्टेट बँकेने एक नवे अलर्ट जारी करून ग्राहकांना इशारा दिला आहे.

State Bank of India
एसबीआयने 40 कोटी ग्राहकांना केले सावध, जर मोबाईलमध्ये हे नंबर सेव्ह असतील तर बँक खाते होईल रिकामे 

थोडं पण कामाचं

  • स्मार्टफोनमध्ये कधीही सेव्ह करू नका हे बँकेचे तपशील
  • कोणालाही सांगू नका बँकेविषयीचे हे तपशील
  • स्वतःच वापरा आपले एटीएम कार्ड, देऊ नका तपशील

मुंबई : एसबीआयचे (SBI) म्हणणे आहे की सध्या बँकांच्या फसवणुकीचे (bank frauds) प्रकार वाढत आहेत आणि याबाबत ग्राहकांनी (customers) सावध (alert) राहायला हवे. अन्यथा छोट्याशा चुकीमुळे (small mistake) आपले बँक खाते (bank account) रिकामे (empty) होऊ शकते. बँकेच्या संकेतस्थळावर (website) दिलेल्या माहितीनुसार सावध न राहिल्यास आपली माहिती सहज लीक (information leak) होऊ शकते आणि हॅकर्स (hackers) आपल्या खात्यातून पैसेही (money) चोरू (theft) शकतात.

स्मार्टफोनमध्ये कधीही सेव्ह करू नका हे बँकेचे तपशील

ग्राहकांची अशी फसवणूक होऊ नये यासाठी बँकेने त्यांना विनंती केली आहे की आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणतेही बँकेचे तपशील सेव्ह करू नयेत. अन्यथा बँक खात्याचा क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्डाचा क्रमांक किंवा याचा फोटो काढून फोनमध्ये ठेवल्यास ही माहिती लीक होण्याचा धोका असतो. याशिवाय एटीएम पासवर्डही सेव्ह केल्याने खासगी माहिती चोरून खात्यातून चोरी होण्याचा धोका वाढतो.

कोणालाही सांगू नका बँकेविषयीचे हे तपशील

कोणालाही आपला ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड, पिन क्रमांक, डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचा क्रमांक किंवा सीव्हीव्ही क्रमांक कधीही सांगू नका. बँकेने दिलेल्या माहितीनुसार बहुतेक फसवणुकी या अशाच प्रकारे होतात. फोनवर बँकेच्या नावे आपले कार्ड ब्लॉक करण्याची भीती दाखवून आणि पासवर्ड बदलण्यासाठी आपल्याकडून ओटीपी किंवा कार्डाच्या मागे लिहिलेला सीव्हीव्ही काढून घेतला जातो. बँकांनी या फोनपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

स्वतःच वापरा आपले एटीएम कार्ड, देऊ नका तपशील

आपल्या एटीएम कार्डाचा वापर नेहमी स्वतःच करा. इतरांची मदत शक्यतो यासाठी घेऊ नका. याशिवाय आपल्या एटीएम कार्डाचे तपशील कोणालाही देऊ नका. असे केल्याने आपल्या खात्याची माहिती लीक होऊ शकते. ग्राहकांनी पब्लिक डिव्हाईस, ओपन नेटवर्क किंवा मोफत वायफायशी जोडून ऑनलाईन व्यवहार करू नयेत. बँकांनुसार पब्लिक डिव्हाईजचा वापर केल्याने ग्राहकांची माहिती लीक होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी