आजपासून बदलले SBI ATM Card आणि Credit Card चे नियम

काम-धंदा
Updated Oct 01, 2020 | 12:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

SBI Rule: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय)ने आजपासून (१ ऑक्टोबर) आपल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. जाणून घ्या सविस्तर

sbi atm
एक ऑक्टोबरपासून बदलणार SBI ATM Card आणि Credit Card चे नियम 

थोडं पण कामाचं

  • एसबीआय ३० सप्टेंबरनंतर अनेक सेवा बंद करत आहे.
  • डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक नियम बदलत आहे
  • एक ऑक्टोबरपासून काही सेवा उपलब्ध असणार नाहीत

मुंबई: कोरोना साथीच्या रोगादरम्यान (corona virus) बँकांनी (bank rule) आपल्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. देशातील सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (state bank of india) ने आपल्या ग्राहकांना सांगितले की क्रेडिट(credit) आणि डेबिट कार्डवर (debit card) दिल्या जाणाऱ्या काही सेवा ३० सप्टेंबर २०२० नंतर बंद केल्या जातील म्हणजेच आजपासून (१ ऑक्टोबर) या सेवा उपलब्ध नसतील. भारतीय रिझर्व्ह बँक (indian reserve bank) एक ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक नियम बदलत आहे. 

या सेवा आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शनशी संबंधित आहेत. एसबीआयने म्हटले की जर तुम्ही आपल्या कार्डवरून आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये खरेदीची सुविधा चालू ठेवू इच्छितात तर INTL नंतर आपल्या कार्डचा नंबरच्या अखेरच्या 4 डिजिट लिहून 5676791 वर SMS करा. कोरोनामुळे कार्डधारकांना आरबीआयने हा नियम लागू करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची वेळ दिली होती. आरबीआयच्या नव्या नियमांनुसार ग्राहकांना आंतरराष्ट्रीय, ऑनलाईन आणि कॉन्टॅक्टलेस कार्डवरून ट्रान्झॅक्शनसाठी वेगवेगळी प्रायोरिटी सांगावी लागेल. 

याचा अर्थ ग्राहकांना गरजेमुसार या सर्व्हिसचा लाभ मिळेल. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना अप्लाय करावा लागेल. आरबीआयनुसार बँकांना सांगण्यात आले आहे की डेबिट आणि क्रेडिट कार्ड देताना ग्राहकांना डोमेस्टिक ट्रान्झॅक्शसाठी परवानगी दिली पाहिजे. जर गरज नसेल तर परदेशी ट्रान्झॅक्शनची परवानगी दिली गेली नाही पाहिजे. एटीएम मशीनमधून पैसे काढताना आणि पीओएस टर्मिनलवर मार्केटिंगसाठी परवानगी गरज असेल. दरम्यान ग्राहकांना हे ठरवावे लागेल की त्यांना कोणती सर्व्हिस सुरू करायची आहे डोमेस्टिक ट्रान्झॅक्शन की इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन. ग्राहक आपल्या ट्रान्झॅक्शनची लिमिटही बदलू शकतात. याचाच अर्थ तुम्ही तुमच्या एटीएमचे कार्डचे मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीन, आयव्हीआरच्या माध्यमातून कधीही ट्रान्झॅक्शन लिमिट बदलू शकता. 

याआधी हा नियम जानेवारी २०२०मध्ये लागू करायचा होता. मात्र मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आला. यानंतर देशभरात कोरोना व्हायरसमुळे देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने तो टाळण्यात आला. अखेर ३० सप्टेंबर ही अखेरची तारीख देण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच एसबीआयने एटीएम कार्डसाठी नवा नियम लागू केला. या नियमानुसार जर तुम्ही एसबीआयच्या एटीएममधून १० हजार अथवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढत असाल तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. त्यानंतर तुम्हाला रक्कम काढणे शक्य होणार आहे. त्यामुळे सायबर फ्रॉडसारखे गुन्हे घडणार नाहीत. एसबीआयने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी