SBI | स्टेट बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आयएमपीएस ट्रान्झॅक्शनची मर्यादा २ लाखांवरून झाली ५ लाख...

SBI IMPS Service : डिजिटल बॅंकिंग वापरण्यास अधिक प्रोत्साहन देण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (State Bank of India) मोठे पाऊल उचलले आहे. एसबीआयने (SBI)डिजिटल व्यासपीठावरील व्यवहार वाढवण्यासाठी इमीजिएट पेमेंट सर्व्हिस (IMPS)म्हणजे आयएमपीएस ट्रान्झॅक्शनची मर्यादा २ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केली आहे. बॅंकने योनोसह इंटरनेट बॅंकिंग, मोबाइल बॅंकिगद्वारे ५ लाख रुपयांच्या आयएमपीएस ट्रान्झॅक्शनवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.

SBI IMPS Service
एसबीआय आयएमपीएस सेवा 
थोडं पण कामाचं
  • एसबीआयने आयएमपीएस सेवेची मर्यादा वाढवली
  • आता २ लाखाऐवजी ५ लाख रुपये ट्रान्सफर करता येणार
  • आयएमपीएस ही देशातील लोकप्रिय पेमेंट सेवा

SBI IMPS Service : नवी दिल्ली: आपल्या ग्राहकांना डिजिटल बॅंकिंग वापरण्यास अधिक प्रोत्साहन देण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (State Bank of India) मोठे पाऊल उचलले आहे. एसबीआयने (SBI)डिजिटल व्यासपीठावरील व्यवहार वाढवण्यासाठी इमीजिएट पेमेंट सर्व्हिस (IMPS)म्हणजे आयएमपीएस ट्रान्झॅक्शनची मर्यादा २ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केली आहे. बॅंकने योनोसह इंटरनेट बॅंकिंग, मोबाइल बॅंकिगद्वारे ५ लाख रुपयांच्या आयएमपीएस ट्रान्झॅक्शनवर कोणतेही शुल्क लावलेले नाही. तर ब्रॅंच चॅनेलच्या बाबतीत सध्याच्या स्लॅबमधील सेवा शुल्कात बदल केलेला नाही. (SBI enhances the IMPS service limit from Rs 2 Lakhs to Rs 5 Lakhs)

अर्थात २ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांसाठी एक नवा स्लॅब जोडण्यात आला आहे. २ लाख रुपये आणि ५ लाख रुपयांच्या दरम्यानच्या रकमेसाठी आयएमपीएस द्वारे रक्कम पाठवण्यासाठीचे शुल्क २० रुपये अधिक जीसएटी इतके असेल. आयएमपीएसवर सर्व्हिस चार्जसाठी एनईएफटी किंवा आरटीजीएसवरील देवाणघेवाणवर सर्व्हिस चार्जनुसार आहे.

किती लागेल शुल्क

आयएमपीएसअंतर्गत १,००० रुपयांपर्यतच्या व्यवहारासाठी कोणताही चार्ज नाही. १,००१ ते १०,००० रुपयांपर्यतच्या व्यवहारांसाठी २ रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आहे. तर १०,००१ रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यतच्या व्यवहारांसाटी ४ रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क लागते. १ लाख रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यतच्या रकमेसाठी १२ रुपये अधिक जीएसटी शुल्क लागते. हे शुल्क फक्त ब्रॅंचकडून करण्यात आलेल्या व्यवहारांवरच लागू होते. 

काय आहे आयएमपीएस सेवा

आयएमपीएस ही बॅंकांद्वारे दिली जाणारी लोकप्रिय पेमेंट सर्व्हिस आहे. यामध्ये रियल टाइममध्ये इंटर बॅंक फंड ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. ही सुविधा २४ तास आणि सातही दिवस उपलब्ध असते. अगदी सुट्टीच्या दिवशीदेखील ही सुविधा सुरू असते. यातून पैसे पाठवण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नाही. आयएमपीएसद्वारे खातेधारक कधीही, कुठेही पैसे पाठवू शकतात. काही सेकंदाच तुमचे पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर होतात.

भारतात ऑनलाइन बॅंकिंगद्वारे पैसे पाठवता येतात. पैसे पाठवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. यात तीन प्रकारे पैसे पाठवता येतात. आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस हे तीन प्रकार आहेत. मात्र आयएमपीएसप्रमाणे एनईएफटी आणि आरटीजीएस ही सेवा चोवीस आणि सातही दिवस उपलब्ध नसते.

नव्या वर्षात एटीएममधून पैसे काढणे महागले

नव्या वर्षात १ जानेवारीपासून एटीएममधून कॅश काढणे महाग झाले आहे. एक जानेवारीपासून ग्राहकांना फ्री एटीएम ट्रान्झॅक्शनची सीमा पार केल्यानंतर तुलनेने अधिक शुल्क भरावे लागणार आहे. मागील वर्षापर्यत बॅंकांच्या एटीएममधून कॅश किंवा नॉन कॅश ट्रान्झॅक्शनवर महिन्यामध्ये ५ ट्रान्झॅक्शन मोफत असायचे. यानंतर २० रुपये प्रति ट्रान्झॅक्शनचा चार्ज लागायचा. मात्र १ जानेवारी २०२२ पासून हा चार्ज २१ रुपये प्रति ट्रान्झॅक्शन झाला आहे. सर्व एटीएममधून केल्या जाणाऱ्या मोफत ट्रान्झॅक्शनवरील (ATM Transaction Charge)मर्यादा संपल्यानंतर होणाऱ्या ट्रान्झॅक्शनवरील चार्ज रिझर्व्ह बॅंकेने (RBI)वाढवला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी