Post Office vs SBI FD: एफडीवर सर्वाधिक व्याज कुठे मिळतो, पोस्ट ऑफिस की एसबीआय? जाणून घ्या कुठे होईल तुम्हाला लाभ

FD in post office vs SBI, Interest Rate : पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये व्याज दरात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. अशा स्थितीत अधिक व्याजदर कुठे मिळणार? बँकेत की पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीत? जाणून घ्या....

Representative Image
प्रातिनिधिक फोटो   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाची बातमी
  • बँकेत व्याज दर अधिक मिळतो की पोस्ट ऑफिसमध्ये?
  • वाचा तुम्हाला सर्वाधिक व्याज कुठे मिळणार?

Post Office FD vs SBI FD interest rates : गुंतवणुकदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून बँकांकडून फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी व्याज दरात वाढ केली आहे. केवळ बँकच नाही तर पोस्ट ऑफिसकडूनही एफडीवरील व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नमकी गुंतवणूक पोस्ट ऑफिसमध्ये करावी की बँकेत करावी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडताना दिसतो.

आज आम्ही तुम्हाला या रिपोर्टमध्ये तुलना करुन सांगणार आहोत की, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयमध्ये गुंतवणूक केल्यास किती व्याज मिळतो आणि पोस्ट ऑफिसमध्ये एफडीवर किती व्याज मिळतो.

हे पण वाचा : Optical Illusion: 20 सेकंदांमध्ये फोटोमधील Lake मध्ये शोधा Take

पोस्ट ऑफिसकडून एक एप्रिलपासून व्याज दरात वाढ

केंद्र सरकारकडून मार्चच्या शेवटी पोस्ट ऑफिसमधील सर्व लहान योजनांवर मिळणाऱ्या व्याज दरात 0.10 टक्क्यांपासून ते 0.70 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यानंतर गुंतवणुकदारांना पोस्ट ऑफिसमध्ये एफडीवर गुंतवणूक केल्यास 6.8 टक्क्यांपासून ते 7.5 टक्के व्याज मिळत आहे.

1 वर्षाच्या एफडीवर - 6.8 टक्के व्याज दर

2 वर्षांच्या एफडीवर - 6.9 टक्के व्याज दर

3 वर्षांच्या एफडीवर - 7.0 टक्के व्याजर दर

5 वर्षांच्या एफडीवर 7.5 टक्के व्याज दर

हे पण वाचा : ...म्हणून विवाहबाह्य संबंध जास्त काळ टिकतात

SBIच्या एफडीवर व्याज दर

एसबीआय बँकेकडून गुंतवणुकदारांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांची एफडी ऑफर देण्यात येत आहे. यासोबतच वरिष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज दर देण्यात येत आहे.

7 दिवसांपासून ते 45 दिवसांपर्यंत - 3 टक्के व्याज दर 

46 दिवसांपासून ते 179 दिवसांपर्यंत - 4.50 टक्के व्याज दर 

211 दिवसांपासून ते एक वर्षांहून कमी कालावधीसाठी - 5.75 टक्के व्याज दर 

एक वर्षापासून ते दोन वर्षांहून कमी कालावधी - 6.80 टक्के व्याज दर 

400 दिवस (अमृत कलश) - 7.10 टक्के व्याज दर 

दोन वर्षांपासून ते तीन वर्षांहून कमी कालावधी - 7 टक्के व्याज दर 

तीन वर्षांपासून ते पाच वर्षांहून कमी कालावधीसाठी - 6.50 टक्के व्याज दर 

पाच वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंत - 6.50 टक्के व्याज दर 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी