Investment Tips | एसबीआय मुदत ठेव की पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना...कोणती गुंतवणूक आहे फायद्याची...

SBI Vs Post Office : बँकांव्यतिरिक्त, पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office Schemes) एफडी योजना देखील चालवल्या जातात. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पाच वर्षांच्या मुदत ठेवी आणि त्याच कालावधीसाठी पोस्ट ऑफिस मुदत ठेवींद्वारे ऑफर केलेल्या व्याजदराची तुलना करताना यातील फरक सुमारे 1.2% इतका येतो. एकीकडे, जिथे स्टेट बॅंकेच्या मुदत ठेवीचे दर 5.5% आहेत. दुसरीकडे, पोस्ट ऑफिस मुदत ठेवी पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यावर 6.7% व्याज दर देतात.

SBI FD Vs Post Office Schemes Interest rates
एसबीआयच्या मुदतठेवी आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांवरील व्याजदर 
थोडं पण कामाचं
  • मुदत ठेवी या अल्पकालीन तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय
  • बँकांव्यतिरिक्त, पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office Schemes) एफडी योजना देखील चालवल्या जातात
  • एकीकडे, जिथे स्टेट बॅंकेच्या मुदत ठेवीचे दर 5.5% आहेत. दुसरीकडे, पोस्ट ऑफिस मुदत ठेवी पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यावर 6.7% व्याज दर देतात.

SBI FD Vs Post Office Schemes : नवी दिल्ली :  मुदत ठेवी (Fixed Deposit) हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच मध्यमवर्गासाठी सर्वात सुरक्षित गुंतवणूक (Investment) पर्याय आहे. या मुदत ठेवी तुम्हाला अल्पकालीन तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय देतात. गरजेनुसार, तुम्ही एकतर निवडू शकता. बँकांव्यतिरिक्त, पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office Schemes) एफडी योजना देखील चालवल्या जातात. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पाच वर्षांच्या मुदत ठेवी आणि त्याच कालावधीसाठी पोस्ट ऑफिस मुदत ठेवींद्वारे ऑफर केलेल्या व्याजदराची तुलना करताना यातील फरक सुमारे 1.2% इतका येतो. एकीकडे, जिथे स्टेट बॅंकेच्या मुदत ठेवीचे दर 5.5% आहेत. दुसरीकडे, पोस्ट ऑफिस मुदत ठेवी पाच वर्षांसाठी गुंतवणूक केल्यावर 6.7% व्याज दर देतात. 1 एप्रिल 2022 पासून पोस्ट ऑफिस मुदत ठेवींसाठी नवीन व्याजदर लागू झाले आहेत. (SBI FD or Post office schemes which is the best investment option)

अधिक वाचा : Government Scheme | आता सरकार विवाहितांना देणार मोठा लाभ, दरमहा मिळणार 44,793 रुपये

अल्पबचत योजनांचे व्याजदर जैसे थे

भारत सरकारने (GoI)2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरील (Small Savings Schemes) व्याजदर स्थिर ठेवले आहेत. त्यात कोणताही बदल केलेला नाही. "विविध अल्पबचत योजनांवरील व्याजाचा दर 2022-23 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी, 1 एप्रिल 2022 पासून सुरू होणारा आणि 30 जून 2022 रोजी संपणारा,  (1 जानेवारी 2022, ते 31 मार्च 2022) आर्थिक वर्ष 2021-22 साठी चौथ्या तिमाहीसाठी लागू असलेल्या वर्तमान दरांपासून न बदलणारा राहील.," असे अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2022 रोजीच्या अधिसूचनेद्वारे जाहीर केले.

अधिक वाचा :  Indian Railway Update | रेल्वे प्रवाशांना दणका...'या' ट्रेनचे भाडे वाढणार ५० रुपयांनी! जाणून घ्या तपशीलवार माहिती

स्टेट बॅंकेचा मुदतठेवीवरील नवा व्याजदर

7 दिवस ते 10 वर्षांच्या स्टेट बॅंक मुदतठेवीवर सामान्य ग्राहकांना 2.9% ते 5.5% मिळेल. या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 50 बेस पॉइंट्स (bps) अतिरिक्त मिळतील -3.4% ते 6.30%. हे दर 15 फेब्रुवारी 2022 पासून लागू आहेत.

7 दिवस ते 45 दिवस - 2,9 %

46 दिवस ते 179 दिवस - 3.9 %

180 दिवस ते 210 दिवस - 4.4 %

211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी - 4.4%

1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी - 5.1%

2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी - 5.2%

3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी - 5.45%

5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंत - 5.5%

अधिक वाचा : Gold Price Today | जबरदस्त संधी ! करा स्वस्तात सोने खरेदी...आज घसरणीने पुन्हा स्वस्त झाले सोने, पाहा ताजा भाव

पोस्ट ऑफिस मुदत ठेव व्याज दर 1 एप्रिल 2022 पासून लागू

पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना बँक एफडी सारख्याच असतात. पोस्ट ऑफिस एक वर्ष ते पाच वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवी देतात. बँक एफडी प्रमाणे, गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस मुदत ठेवीच्या कालावधीद्वारे हमी परतावा मिळवतात. पोस्ट ऑफिस डिपॉझिटवरील व्याज 1 एप्रिल 2020 रोजी सुधारित करण्यात आले. एक वर्षाच्या ठेवी तीन वर्षांसाठी पोस्ट ऑफिस 5.5% व्याज दर देते. पाच वर्षांच्या टाइम डिपॉझिट खात्यासाठी, पोस्ट ऑफिस 6.7% व्याज दर देते.

1 वर्ष - 5.5%

2 वर्षे - 5.5 %

3 वर्षे- 5.5%

5 वर्षे - 6.7 %


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी