SBI Recruitment Latest : स्टेट बॅंकेत प्रोबेशनरी ऑफिसरच्या 1673 पदांसाठी भरती, 70,000 पेक्षा जास्त पगार, पाहा कसा करायचा अर्ज

SBI Career : तुम्हाला बॅंकेत नोकरी करायची असेल तर स्टेट बॅंकेत मोठ्या प्रमाणात नोकरभरती होणार आहे. एसबीआयमध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या (PO) एकूण 1673 पदांची भरती केली जाणार आहे. शिवाय या पदासाठी उत्तम वेतन आणि भत्ते असणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन विस्ताराने तपशील पाहता येणार आहे. अर्ज करण्याची मुदत, पात्रता याविषयी जाणून घ्या.

SBI PO jobs
स्टेट बॅंकेत प्रोबेशनरी ऑफिसरच्या जागा 
थोडं पण कामाचं
  • स्टेट बॅंकेत करियरची मोठी संधी
  • एसबीआय प्रोबेशनरी ऑफिसरसाठी मोठी नोकरभरती
  • अर्ज, पात्रता आणि अटी याविषयीचा तपशील

SBI PO Vacancy Update : नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (SBI) करियर करण्याची मोठी संधी चालून आली आहे. स्टेट बॅंकेत मोठ्या प्रमाणात नोकरभरती होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एसबीआयच्या अधिसूचनेनुसार, प्रोबेशनरी ऑफिसरच्या (PO) एकूण 1673 पदांची भरती केली जाईल. यामध्ये अर्ज करण्यासाठी, उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट - sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करताना वेबसाइटवर जा आणि रिक्त जागांची संपूर्ण माहिती पाहा. (SBI have 1673 posts of Probationary Officers, check how to apply)

अधिक वाचा : Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी पालिकेकडून शिवसेनेच्या दोन्ही गटांना परवानगी नाही, शिवसेनेच्या ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव

स्टेट बॅंकेने (SBI) जाहीर केलेल्या या रिक्त पदासाठी अर्जाची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच 22 सप्टेंबर 2022 पासून सुरू होईल. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया पुढीलप्रमाणे असणार आहे.

एसबीआय पीओ रिक्त जागा: अर्ज प्रक्रिया- (SBI PO Vacancy)

  1. या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइट- sbi.co.in वर जावे लागेल.
  2. वेबसाइटच्या होम पेजवर Whats New च्या लिंकवर क्लिक करा.
  3. यानंतर 1673 पोस्टसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया SBI प्रोबेशनरी ऑफिसर्स ऑनलाइन फॉर्म 2022 च्या लिंकवर जा.
  4. आता Click Here to Apply या पर्यायावर जा.
  5. पुढील पानावर विचारलेले तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
  6. तुम्ही नोंदणी क्रमांकाद्वारे अर्ज भरू शकता.
  7. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंट काढा.

अधिक वाचा :  Naxilite Surrender : गडचिरोली पोलिसांना मोठे यश, सहा लाख इनाम असणार्‍या दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण 

एसबीआय पीओसाठीच्या महत्त्वाच्या तारखा-

SBI PO भरती 2022 अधिसूचना – 21 सप्टेंबर

SBI PO भरती 2022 अर्ज सुरू - 22 सप्टेंबर

SBI PO भर्ती 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर

SBI PO भर्ती 2022 प्राथमिक परीक्षा - 17 ते 20 डिसेंबर 2022

अधिक वाचा : Mumbai: 20 वर्षीय तरुणीवर आजोबा आणि काकांनी केला बलात्कार, 12 वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

SBI PO पात्रता: पात्रता आणि वय

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. त्याच वेळी, अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असावे. उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2022नुसार केली जाईल. या रिक्त पदावर निवड झालेल्या उमेदवारांना पगार म्हणून 63,840 रुपये प्रति महिना वेतन मिळेल. याशिवाय उमेदवारांना अनेक प्रकारच्या भत्त्यांचाही लाभ मिळणार आहे.

बॅंकिंग हे क्षेत्र करियरसाठी उत्तम समजले जाते. त्यातही स्टेट बॅंकेत प्रोबेशनरी ऑफिसरची नोकरी मिळत असल्याने ही एक जबरदस्त संधी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी