SBI FD rates hike: गुंतवणुकदारांसाठी आनंदवार्ता; SBI ने FD व्याज दरात केली वाढ, जाणून घ्या नवे दर

SBI increase FD rates: एसबीआयच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने फिक्स डिपॉझिटवरील व्याज दरात वाढ केली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एसबीआयने एफडी वरील व्याज दरात केली वाढ
  • 25 ते 65 बीपीएस पर्यंत केली वाढ
  • SBI च्या निर्णयामुळे गुंतवणुकदारांना होणार फायदा

SBI FD rates: भारतीय स्टेट बँकेने एफडी वरील व्याज दरात 65 बेसिस पॉईंटपर्यंत वाढ केली आहे. आरबीआयने नुकतेच रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंट्सची वाढ केली होती. त्यानंतर आता एसबीआयने एफडी वरील व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयच्या वेबसाईटनुसार, बँकेने एफडीवरील व्याज दरात 25 ते 65 बेसिस पॉईंट्स पर्यंत इतकी वाढ केली आहे. ही वाढ दोन कोटी रुपयांपर्यंतच्या फिक्स डिपॉझिट्सवर लागू असणार आहे. नवे दर हे 13 डिसेंबर 2022 पासून लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी बँकेने 22 ऑक्टोबर रोजी रिटेल टर्म डिपॉझिट्सवरील व्याज दरात वाढ केली होती. (SBI hikes fixed deposit interest rates check new fd rates in marathi)

हे पण वाचा : Chanakya Niti: या मुलींसोबत लग्न केल्यावर मुलांचे रातोरात नशीब उजळते

बँकेने 211 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या डिपॉझिटवरील व्याज दरात वाढ करुन 5.50 टक्के दरावरुन 5.75 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. अशा प्रकारे या व्याज दरात 25 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. अशाच प्रकारे एक वर्षापासून ते दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठीच्या एफडीवरील व्याज दर 6.10 टक्क्यावरुन 6.75 टक्के इतका करण्यात आला आहे. यामध्ये 75 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे.

दोन वर्ष ते तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठीच्या व्याज दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच हा व्याज दर 6.25 टक्क्यांवरुन 6.75 टक्के इतका करण्यात आला आहे. तीन वर्षे आणि पाच वर्षांहून कमी कालावधीच्या मॅच्युरिटीच्या रकमेवर आता 6.10 टक्क्यांवरुन 6.25 टक्के इतका व्याज दर करण्यात आला आहे. पाच वर्षे ते 10 वर्षे इतक्या कालावधीसाठीच्या रक्कमेवर 6.10 टक्क्यांवरुन 6.25 टक्के व्याज दर करण्यात आला आहे. हे व्याज दर नव्या डिपॉझिट आणि मॅच्युअरिंग अकाऊंट्ससाठी रिन्यूवलवर लागू असतील.

हे पण वाचा : Vastu Tips: घरात कबूतर येणे शुभ की अशुभ? वाचा

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर

ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेने सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीतील एफडीवर 3.5 टक्क्यांपासून ते 7.25 टक्के व्याज दर देण्यात येत आहे. याच दरम्यान एसबीआय Wecare डिपॉझिट स्कीम 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या स्कीममध्ये ज्येष्ठ नागरिकांना रिटेल टीडी सेगमेंटमध्ये असलेल्या दरात 50 बीपीएस जास्त व्याज मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी