SBI hikes MCLR by 10 basis points : नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. एसबीआयच्या गृहकर्ज (Home loan), कार लोनच्या (Car loan)व्याजदरात वाढ झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या ईएमआयवर परिणाम होत तो वाढणार आहे. देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट म्हणजे एमसीएलआरमध्ये (MCLR)वाढ केली आहे. एसबीआयने एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढ केली आहे. MCLR दरांमधील सुधारणा 15 एप्रिलपासून लागू झाली आहे. त्यामुळे घर, कार आणि इतर कर्जाच्या ईएमआयवर (EMI) परिणाम झाला आहे, असे बॅंकेच्या वेबसाइटवरील अधिसूचनेत म्हटले आहे. (SBI home loan, car loan gets costlier, as bank hikes MCLR by 10 basis points)
अधिक वाचा : SBI Home Loan | गृहकर्जावर स्टेट बॅंक देते टॉपअप लोन, क्षणार्धात करा अर्ज, जाणून घ्या पात्रता आणि फायदे
रात्रभर, एक महिना आणि तीन महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 6.65 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आला आहे. सहा महिन्यांसाठी कर्जदराचा किरकोळ खर्च ६.९५ टक्क्यांवरून ७.०५ टक्के करण्यात आला आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने एका वर्षासाठी MCLR 7 टक्क्यांवरून 7.10 टक्के केला आहे. तर दोन वर्षांसाठी एमसीएलआर 7.20 टक्क्यांवरून 7.30 टक्के आणि तीन वर्षांसाठी 7.30 टक्क्यांवरून 7.40 टक्के केला आहे.
अधिक वाचा : Gold Price Today | लग्नसराई सुरू...सोन्यात आली तेजी, 2363 रुपयांनी वाढली चांदी, करा लगीनघाई
दरम्यान, बँक ऑफ बडोदाने सांगितले की, त्यांनी 12 एप्रिलपासून कालावधीसाठी किरकोळ खर्चाचा निधी-आधारित कर्ज दर (MCLR) 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या आघाडीच्या बॅंकेने एक्सचेंज फाइलिंगमध्ये या संदर्भातील माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की बेंचमार्क एक वर्षाचा कालावधी 7.35 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. एका रात्रीत, एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांचा MCLR अनुक्रमे 6.50 टक्के, 6.95 टक्के, 7.10 टक्के आणि 7.20 टक्के झाला आहे.
तुम्हालाही स्वत:चे घर खरेदी करायचे आहे का? तुम्हीदेखील गृहकर्ज (Home Loan)घेऊन स्वतःचे घर देखील खरेदी करू शकता. गृहकर्ज ग्राहकांसाठी टॉप-अप कर्ज (Top up loan)देखील उपलब्ध आहेत. पर्सनल लोन किंवा होम लोनच्या तुलनेत टॉप-अप होम लोन तुम्हाला कमी व्याजदरावर उपलब्ध होते. बांधकाम खर्चापासून ते नूतनीकरणापर्यंत अनेक खर्च भागवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. विविध बॅंका गृहकर्ज आणि गृहकर्जावरील टॉप अप लोनची सुविधा देतात. स्टेट बॅंक स्वस्तात गृहकर्ज (SBI Home loan)तर देतेच मात्र त्याचबरोबर टॉप अप लोनची सुविधा देते. एसबीआय योनोच्या इन्स्टा टॉप अप लोनच्या (SBI YONO Insta Home Top-Up Loan) सुविधेचा तुम्हीदेखील फायदा घेऊ शकता.