SBI FD Rates | खातेधारकांसाठी खूशखबर! स्टेट बॅंकेने वाढवले एफडीवरील व्याजदर, पाहा किती मिळेल फायदा

SBI FD | स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State bank of India)च्या खातेधारकांसाठी खूशखबर आहे. जर तुमचेदेखील एसबीआयमध्ये खाते असेल तर तुम्हाला मुदतठेवींवर जास्त व्याज (interest rate) मिळणार आहे. एसबीआयने फिक्स्ड डिपॉझिटच्या (Fixed deposit interest rate)व्याजदरात वाढ केली आहे. बॅंकेकडून ग्राहकांना ७ दिवसांपासून ते १० वर्षापर्यतच्या मुदतठेवीची सुविधा मिळते.

SBI FD Rates
एसबीआयच्या मुदतठेवींवरील व्याजदरात वाढ 
थोडं पण कामाचं
  • एसबीआयने मुदतठेवीवरील व्याजदरात केली वाढ
  • स्टेट बॅंकेच्या खातेधारकांना मिळणार फायदा
  • स्टेट बॅंकेने दिली व्याजदरासंदर्भातील माहिती

SBI FD | नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State bank of India)च्या खातेधारकांसाठी खूशखबर आहे. जर तुमचेदेखील एसबीआयमध्ये खाते असेल तर तुम्हाला मुदतठेवींवर जास्त व्याज (interest rate) मिळणार आहे. एसबीआयने फिक्स्ड डिपॉझिटच्या (Fixed deposit interest rate)व्याजदरात वाढ केली आहे. बॅंकेकडून ग्राहकांना ७ दिवसांपासून ते १० वर्षापर्यतच्या मुदतठेवीची सुविधा मिळते. स्टेट बॅंकेच्या विविध मुदतठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरांबद्दल जाणून घ्या. (SBI increases FD interest rate for account holders)

ग्राहकांना मिळेल जास्त फायदा

स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना ७ दिवसांपासून ते ४५ दिवसांपर्यत मुदतठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरावर २.९० टक्क्यांवरून वाढून ३ टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच आता खातेधारकांना १० बेसिस पॉइंट जास्त फायदा मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ३.४० टक्क्यांऐवजी ३.५० टक्के व्याज मिळणार आहे.

२१० दिवसांच्या एफडीवर मिळणार इतके व्याज

१८० ते २१० दिवसांच्या मुदतठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरातदेखील वाढ झाली आहे. एसबीआयच्या ग्राहकांना ३ टक्के व्याजदर मिळत होता. आता त्यात वाढ होत तो ३.१० टक्के झाला आहे. 

१ ते २ वर्षांच्या एफडीचे व्याजदर

स्टेट बॅंक आपल्या ग्राहकांना १ वर्षांपासून ते २ वर्षापर्यतच्या एफडीवर ४.९० टक्के व्याज देत होती. आता यात वाढ होत हे व्याजदर ५ टक्के करण्यात आले आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना ५.४० टक्क्यांऐवजी ५.५० टक्के व्याजदर करण्यात आला आहे.

२ ते ३ वर्षांच्या एफडीवरील व्याजदरात बदल नाही

जर तुम्ही २ ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी एफडी केली तर तुम्हाला ५.१० टक्क्यांचे व्याज मिळेल. या कालावधीसाठीच्या एफडीमध्ये व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. तर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी ५.६० टक्के व्याजदर दिला जातो आहे.

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (State Bank of India)ग्राहकांसाठी मोठी ऑफर आणली आहे. एसबीआयने ग्राहकांसाठी ३ इन १ खात्याची (SBI 3-in-1 Account) सुविधा दिली आहे. यामध्ये बचत खाते (Saving Account), डीमॅट खाते (Dmat Account)आणि ट्रेडिंग खाते (Trading Account) एकत्र मिळते आहे. या खात्यामुळे ग्राहकांना एकाच खात्यात तीन सुविधांचा लाभ घेता येणार आहे. स्टेट बॅंकेने यासंदर्भातील ट्विट केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती  https://bank.sbi/web/personal-banking/investments-deposits/stocks-securities/3-in-1-account या अधिकृत वेबसाइटवर घेता येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे-

जर तुम्हाला एसबीआयचे ३ इन १ खाते सुरू करायचे असेल तर तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असली पाहिजेत. बचत खाते सुरू करण्यासाठी पुढील कागदपत्रे असली पाहिजेत.
१. पॅन कार्ड किंवा फॉर्म ६० (PAN or Form 60)
२. फोटोग्राफ
३. पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड, मनरेगाद्वारे देण्यात आलेले जॉब कार्ड आणि राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टरद्वारे देण्यात आलेले पत्र

बचत खात्याला डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यामध्ये रुपातंरीत करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत-

१. पासपोर्ट साइज फोटोग्राफ
२. पॅन कार्ड कॉपी
३. आधार कार्ड कॉपी
४. एक कॅन्सल चेक किंवा लेटेस्ट बॅंक स्टेटमेंट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी