State Bank Of India Update: नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक आहे. एसबीआय आता तुमच्यासाठी पैसे कमवण्याची संधी घेऊन आली आहे. आपण अशा सरकारी योजनेबद्दल (Government scheme) जाणून घेऊयात ज्यात तुम्हाला चांगली कमाई करता येणार आहे. शिवाय ही कमाईची संधी दर महिन्याला असणार आहे. स्टेट बॅंकेच्या या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागेल. यानंतर तुम्हाला दर महिन्याला निश्चित उत्पन्न (Monthly income) मिळेल. स्टेट बॅंकेद्वारे ही योजना चालवली जाणार असल्यामुळे यात सुरक्षितता देखील आहे. शिवाय दर महिन्याला कमाई करण्याची संधी आहे. या योजनेबद्दल जाणून घेऊया. (SBI is offering government scheme for monthly income)
अधिक वाचा - आज तुळशीचे पानं तोडणं आहे महापाप, जाणून घ्या कारण
स्टेट बॅंकेच्या या योजनेचे नाव एसबीआय अॅन्युईटी योजना ( SBI Annuity Scheme) असे आहे. या बँकेच्या योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये मिळू शकतात. या योजनेतून तुम्हाला दर महिन्याला उत्पन्न कसे मिळवता येणार ते पाहूया.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, या योजनेत 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी गुंतवणूक केली जाऊ शकते किंवा ठेवी ठेवल्या जाऊ शकतात. ग्राहक या योजनेचा लाभ स्टेट बॅंकेच्या सर्व शाखांमधून घेऊ शकतात. सध्या या योजनेत कमाल ठेवीवर मर्यादा नाही. या योजनेत किमान वार्षिकी प्रति महिना 1000 रुपये आहे.
अधिक वाचा - दिवाळी सणाच्यावेळी वडोदरात उसळली जातीय दंगल
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना युनिव्हर्सल पासबुकही ग्राहकांना देण्यात येणार आहे. कोणताही भारतीय नागरिक हे खाते उघडू शकतो किंवा स्टेट बॅंकेच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेत अल्पवयीन मुलांसाठीदेखील गुंतवणूक केली जाऊ शकते. स्टेट बॅंकेच्या या योजनेत खाते सिंगल किंवा जॉइंट दोन्ही पद्धतीने उघडता येते.
अधिक वाचा - Diabetes Control: या 5 नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून मधुमेहावर मिळवा नियंत्रण
या योजनेत आधी एकरकमी गुंतवणूक करायची असून त्यानंतर त्यावर दर महा निश्चित उत्पन्न मिळणार आहे. जितकी जास्त रक्कम एकरकमी स्वरुपात गुंतवली जाईल तितके जास्त उत्पन्न दरमहा मिळणार आहे. समजा जर एखाद्या ग्राहकाला या योजनेत दरमहा 10 हजार रुपये मासिक उत्पन्न हवे असेल तर त्याला एकरकमी 5,07,964 रुपये जमा करावे लागतील. या जमा केलेल्या रकमेवर ग्राहकाला वार्षिक 7 टक्के व्याजदराने परतावा मिळणार आहे. यातून गुंतवणुकदार दर महिन्याला 10 हजार रुपयांचे उत्पन्न कमावू शकणार आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बॅंक आहे. बॅंकेचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्या झालेला असून ग्राहकांसाठी अनेक योजना बॅंकांकडून चालवल्या जातात.