SBI Home Loan | गृहकर्जावर स्टेट बॅंक देते टॉपअप लोन, क्षणार्धात करा अर्ज, जाणून घ्या पात्रता आणि फायदे

SBI YONO : तुम्हालाही स्वत:चे घर खरेदी करायचे आहे का? तुम्हीदेखील गृहकर्ज (Home Loan)घेऊन स्वतःचे घर देखील खरेदी करू शकता. गृहकर्ज ग्राहकांसाठी टॉप-अप कर्ज (Top up loan)देखील उपलब्ध आहेत. पर्सनल लोन किंवा होम लोनच्या तुलनेत टॉप-अप होम लोन तुम्हाला कमी व्याजदरावर उपलब्ध होते. बांधकाम खर्चापासून ते नूतनीकरणापर्यंत अनेक खर्च भागवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

(SBI YONO Insta Home Top-Up Loan
एसबीआय योनो इन्स्टा होम टॉप-अप कर्ज 
थोडं पण कामाचं
 • टॉप-अप कर्ज हे सध्याच्या गृहकर्जावर बँकेने दिलेले वाढीव कर्ज असते
 • एसबीआयचा YONO हा गृहकर्ज आणि घराशी संबंधित सर्व गरजांसाठी वन-स्टॉप पर्याय आहे
 • देशातील सर्वच सरकारी आणि खाजगी बँका घर खरेदीदारांसाठी गृहकर्ज देतात

YONO Insta Home Top Up Loan : नवी दिल्ली : प्रत्येकजण स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पाहतो. परंतु घरखरेदी करणे हे अनेकांच्या बजेटबाहेर असते. त्यासाठी मग डाउनपेमेंटची जुळवाजुळव आणि स्वस्त गृहकर्ज मिळवून मार्ग शोधला जातो. हे सर्व घडवून आणताना तारेवरची कसरत करावी लागते. तुम्हालाही स्वत:चे घर खरेदी करायचे आहे का? तुम्हीदेखील गृहकर्ज (Home Loan)घेऊन स्वतःचे घर देखील खरेदी करू शकता. गृहकर्ज ग्राहकांसाठी टॉप-अप कर्ज (Top up loan)देखील उपलब्ध आहेत. पर्सनल लोन किंवा होम लोनच्या तुलनेत टॉप-अप होम लोन तुम्हाला कमी व्याजदरावर उपलब्ध होते. बांधकाम खर्चापासून ते नूतनीकरणापर्यंत अनेक खर्च भागवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. विविध बॅंका गृहकर्ज आणि गृहकर्जावरील टॉप अप लोनची सुविधा देतात. स्टेट बॅंक स्वस्तात गृहकर्ज (SBI Home loan)तर देतेच मात्र त्याचबरोबर टॉप अप लोनची सुविधा देते. एसबीआय योनोच्या इन्स्टा टॉप अप लोनची (SBI YONO Insta Home Top-Up Loan) वैशिष्टये, पात्रता आणि फायदे जाणून घेत तुम्हीदेखील या सुविधेचा फायदा घेऊ शकता. (SBI is offering YONO Insta Home Top-Up Loan on your home loan, check eligibility & benefits)

अधिक वाचा : Petrol Price Today | जबरदस्त दिलासा! पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ नाही, सर्वात स्वस्त पेट्रोल 91.45 रुपये लिटर

YONO इन्स्टा होम टॉप-अप कर्जासाठीची पात्रता (YONO Insta Home Top-Up Loan Eligibility)

 1. कर्ज घेणारी व्यक्ती भारतीय रहिवासी असली पाहिजे
 2. वय किमान 18 आणि कमाल 70 वर्षे
 3. 30 वर्षांपर्यंत कर्जाचा कालावधी
 4. विद्यमान गृहकर्ज ग्राहक ज्यांनी आधीच या उत्पादनाची निवड केली आहे (विद्यमान गृहकर्जाचे मूल्य 10 लाखा रुपयांपेक्षा जास्त असावे)
 5. कमाल मर्यादा: गृहकर्ज मर्यादेच्या 8% किंवा 8 लाख रुपये, यापैकी जे कमी असेल
 6. टॉप-अपचा फायदा घेण्यासाठी किमान 50,000 रुपयांचे कर्ज घ्यावे लागते
 7. गृहकर्जाची किमान मुदत 3 वर्षांपेक्षा जास्त असावी
 8. ग्राहकाकडे कोणतेही थेट टॉप-अप कर्ज नसावे

अधिक वाचा : Property Tips | घर खरेदी करतांय? मग खरेदीपूर्वी तपासा ही 5 कागदपत्रे, होणार नाही फसवणूक

होम टॉप अप लोनची वैशिष्ट्ये काय? ((YONO Insta Home Top-Up Loan features)

 1. यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही
 2. हे ग्राहकांसाठी 24*7 तास उपलब्ध आहे
 3. तात्काळ तत्वतः मान्यता मिळते
 4. प्रत्येक टप्प्यावर रिअल-टाइम सूचना आणि प्रत्येक टप्प्याचे अपडेट दिले जातात
 5. कमी प्रक्रिया शुल्क आणि कोणतेही प्रशासकीय शुल्क नाही

अधिक वाचा : Insurance buyers, ALERT | ऑनलाइन आरोग्यविमा विकत घेतांय? मग या वेबसाइटपासून राहा सावध...IRDAI ने दिला सावधगिरीचा इशारा

होम टॉप अप लोनचे फायदे काय आहेत? (YONO Insta Home Top-Up Loan benefits)

 1. तीन सोप्या पायऱ्यांमध्ये उपलब्ध
 2. लगचे रक्कम मिळते
 3. कमी व्याजदर
 4. ओव्हरड्राफ्ट म्हणून उपलब्ध
 5. पूर्णपणे डिजिटल सेवा, मॅन्युअल हस्तक्षेप नाही

कसे घ्यावे योनोचे टॉप अप कर्ज?

 1. यासाठी प्रथम YONO डाउनलोड करा आणि नोंदणी करा किंवा लॉग इन करा
 2. (e) मेनूमध्ये, Loan वर क्लिक करा
 3. आता होम लोन वर क्लिक करा आणि Apply बटण दाबा
 4. अर्ज पूर्ण करा
 5. शेवटी सर्व अटी आणि शर्ती स्वीकारा आणि लीड जनरेट करा
   
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी