SBI Update : स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना खूशखबर! बॅंक ग्राहकांना देतेय 35 लाखांचा फायदा, पाहा कसे

SBI Loan : स्टेट बॅंकेचे देशभरात जवळपास 44 कोटी ग्राहक आहेत, त्यांना एसबीआयची एक नवीन सुविधा मिळणार आहे. स्टेट बॅंकेने वैयक्तिक कर्ज देण्यासाठी एक नवीन जबरदस्त योजना सुरू केली आहे. 'रिअल टाईम एक्सप्रेस क्रेडिट' नावाच्या या सुविधेसह ग्राहक 35 लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकतात. एसबीआयने ही योजना YONO अॅपवर सुरू केली आहे.

SBI update
एसबीआयची नवी योजना 
थोडं पण कामाचं
  • स्टेट बॅंकेचे देशभरात जवळपास 44 कोटी ग्राहक
  • स्टेट बॅंकेची वैयक्तिक कर्ज देण्यासाठी एक नवीन जबरदस्त योजना
  • रिअल टाईम एक्सप्रेस क्रेडिटद्वारे ग्राहकांना घरबल्या कर्ज मिळणार

SBI Latest Scheme:नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बॅंक असलेली स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन सुविधा आणत असते. आता स्टेट बॅंकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बॅंकेचे देशभरात जवळपास 44 कोटी ग्राहक आहेत, त्यांना एसबीआयची एक नवीन सुविधा मिळणार आहे. स्टेट बॅंकेने वैयक्तिक कर्ज देण्यासाठी एक नवीन जबरदस्त योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव 'रिअल टाईम एक्सप्रेस क्रेडिट' (Real Time Xpress Credit)असे आहे. या योजनेअंतर्गत एसबीआयच्या (SBI) ग्राहकांना घरबल्या कर्ज मिळणार आहे.  'रिअल टाईम एक्सप्रेस क्रेडिट' नावाच्या या सुविधेसह ग्राहक 35 लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकतात. एसबीआयने ही योजना YONO अॅपवर सुरू केली आहे. एसबीआयच्या या खास सुविधेबद्दल जाणून घेऊया. (SBI launched new Real Time Xpress Credit scheme for customers)

अधिक वाचा : Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, काय झाली चर्चा?

SBI ची जबरदस्त सुविधा

एसबीआयच्या 'रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट'च्या या विशेष सुविधेचा लाभ सर्व ग्राहकांना घेता येणार नाही. या योजनेचा फायदा फक्त केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि संरक्षण सेवेत काम करणाऱ्या ग्राहकांनाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल आणि तुम्ही जर एसबीआयचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी कर्ज घेणे अतिशय सोपे झाले आहे. ही विशेष सुविधा YONO अॅपवर उपलब्ध आहे. या योजनेद्वारे क्रेडिट तपासणी, पात्रता आणि इतर कागदपत्रांची पडताळणीही घरबसल्या करता येईल.

अधिक वाचा : आमदारकीचा राजीनामा देतो, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट

35 लाखांपर्यंतचे कर्ज 

एसबीआयच्या या योजनेद्वारे तुम्हाला 35 लाखांपर्यंत कर्ज सहज मिळू शकते. याअंतर्गत ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार असून क्रेडिट तपासणी, कर्जाची पात्रता, कर्ज मंजूरी आणि कागदपत्रे जमा करणे यासारखी सर्व कामेही ऑनलाइन होतील.

एसबीआयने दिली माहिती 

नव्या 'रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट' योजनेबद्दल सविस्तर माहिती देताना स्टेट बॅंकेचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, 'योनो अॅपवर पात्र पगारदार ग्राहकांसाठी रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट कर्ज सुविधा सुरू केल्याने ग्राहकांना मोठा फायदा होईल. Xpress क्रेडिट सुविधा ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय डिजिटल मोडद्वारे कर्ज देण्यासाठी उपयुक्त आहे. एसबीआयकडून ग्राहकांना पूर्णपणे डिजिटल बॅंकिंग सुविधा देत बॅंकिंग अतिशय सोपे आणि सुलभ करण्याचा प्रयत्न आहे. 

अधिक वाचा: Shraddha Murder case: क्राईम सीरिज पाहून गर्लफ्रेंडचे 35 तुकडे केले, असं काय आहे या अमेरिकन टीव्ही शोमध्ये? 

स्टेट बॅंक अनेक मोबाइल बॅंकिंग(Mobile banking) आणि डिजिटल सेवा पुरवते. मात्र आता हॅकर्स स्टेट बॅंकेच्या ग्राहकांवर डोळा ठेवून आहेत. स्टेट बॅंकेच्या ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक (Online Fraud)होण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. डिजिटल क्षेत्राचा विस्तार झाल्यानंतर बॅंकिंग क्षेत्रानेदेखील कात टाकली आहे. नेट बॅंकिंग आणि मोबाइल बॅंकिंगमुळे ग्राहकांचे आयुष्य आणि बॅंकिंग व्यवहार खूपच सोपे झाले आहेत. मात्र त्याचबरोबर ऑनलाइन फ्रॉडच्या संख्येतदेखील मोठी वाढ झाली आहे. एसबीआय वेळोवेळी आपल्या ग्राहकांना यासंदर्भात सावध करत असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी