SBI Net Banking Update| नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI)या देशातील सर्वात मोठ्या बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बॅंकेच्या नेट बॅंकिंग सेवांसह (SBI net banking) इतर काही सेवा विशिष्ट कालावधीसाठी बंद राहणार आहेत. एसबीआयची इंटरनेट बॅंकिंग सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना इंटरनेट बॅंकिंग (Internet banking), योनो (Yono), योनो लाइट (Yono lite), यूपीआय (UPI) या सेवा एकूण ३०० मिनिटांच्या कालावधीसाठी म्हणजे ५ तासांसाठी उपलब्ध होणार नाहीत. शनिवार (११ डिसेंबर) आणि रविवार (१२ डिसेंबर) या दोन दिवसांदरम्यान स्टेट बॅंकेच्या नियोजित मेंटेनन्स कामकाजासाठी या सेवा बंद ठेवल्या जाणार आहेत. (SBI net banking & other services to remain close on Saturday and Sunday for maintenance activities)
स्टेट बॅंकेने यासंदर्भातील माहिती दिली आहे. आम्ही ग्राहकांना विनंती करत आहोत की बॅंकिंग सेवेत सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करण्यासाठी बॅंकेची नेट बॅंकिंग सुविधा बंद राहणार आहे. ११ डिसेंबरला रात्री ११:३० ते १२ डिसेंबरच्या सकाळी ४:३० दरम्यान (३०० मिनिटे) ही सेवा बंद राहील. यात इंटरनेट बॅंकिंग, योनो, योनो लाइट, योनो बिझनेस आणि यूपीआय या सेवा उपलब्ध राहणार नाहीत. ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असे ट्विट एसबीआयने केले आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बॅंक असून बॅंकेचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. यात बॅंकेच्या देशभर २२,००० शाखा आहेत आणि ५७,८८९ पेक्षा जास्त एटीएम आहेत.
नोकरदार लोकांना सॅलरी अकाउंटबद्दल चांगलेच माहित असते. त्यांना माहित असते की जर त्यांच्याकडे सॅलरी अकाउंट नसेल तर त्यांचा दर महिन्याचा पगार जमा होणार नाही. अर्थात कोणत्या बॅंकेत सॅलरी अकाउंट (Salary Account) असावे हे तो कर्मचारी ज्या कंपनीत काम करत असतो त्या कंपनीवर अवलंबून असते. मात्र ज्यांचे सॅलरी अकाउंट स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) मध्ये आहे, त्यांना झिरो बॅलन्स व्यतिरिक्त इतर काही असे फायदे आहेत ज्याचे महत्त्व मोठे आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, स्टेट बॅंकेच्या सॅलरी अकाउंट असणाऱ्यांना पर्सनल लोन, होम लोन, कार लोन, शैक्षणिक कर्ज इत्यादीमध्ये सूट मिळते. याशिवाय इतर काही फायदे असेही आहेत ज्यांची माहिती स्टेट बॅंकेच्या सॅलरी अकाउंट धारकाला असली पाहिजे आणि ज्यांनी स्टेट बॅंकेत सॅलरी अकाउंट उघडायचे आहे. स्टेट बॅंक सॅलरी अकाउंट धारकांना मल्टी सिटी चेक, एसएमएस अलर्ट, फ्री ऑनलाईन एनईएफटी, आरटीजीएस (NEFT/RTGS), कोणत्याही बॅंकेच्या एटीएममधूल अनलिमिटेड ट्रान्झॅक्शनची सुविधा देते.