SBI Offer | स्वत:चा व्यवसाय करता आहात किंवा सुरू करायचाय, मग स्टेट बॅंक देते आहे ही जबरदस्त ऑफर..

SBI Platinum Current Account | एसबीआय व्यवसाय करणाऱ्यांना करंट अकाउंट (Current Account) म्हणजे चालू खाते सुरू करण्याची सुविधा देते. एसबीआय करंट अकाउंट (SBI Current Account) हे फारच उपुयक्त आहे, विशेषत: जे छोटे व्यावसायिक, व्यापारी ज्यांना सर्व किंवा जास्तीत जास्त सुविधा या कमी शुल्कावर हव्या असतात. एसबीआय या ऑफरचे नाव आहे एसबीआय प्लॅटिनम करंट अकाउंट.

SBI Platinum Current Account
एसबीआय प्लॅटिनम करंट अकाउंट 
थोडं पण कामाचं
 • व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांसाठी एसबीआयची ऑफर
 • एसबीआय करंट अकाउंटद्वारे मिळणार अनेक सुविधा मोफत
 • एसबीआय प्लॅटिनम करंट अकाउंट ची वैशिष्ट्ये आणि फायदे

SBI Platinum Current Account : नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बॅंक असलेली स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India)आपल्या ग्राहकांसाठी आणि नागरिकांसाठी अनेक सुविधा राबवत असते. अशीच एक ऑफर आहे व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी स्टेट बॅंक देते आहे. एसबीआय व्यवसाय करणाऱ्यांना करंट अकाउंट (Current Account) म्हणजे चालू खाते सुरू करण्याची सुविधा देते. एसबीआय करंट अकाउंट (SBI Current Account) हे फारच उपुयक्त आहे, विशेषत: जे छोटे व्यावसायिक, व्यापारी ज्यांना सर्व किंवा जास्तीत जास्त सुविधा या कमी शुल्कावर हव्या असतात. एसबीआय या ऑफरचे नाव आहे एसबीआय प्लॅटिनम करंट अकाउंट (SBI Platinum Current Account). या करंट अकाउंटद्वारे एसबीआय अनेक सुविधा आणि लाभ देते. (SBI Platinum Current Account for the businessmen, check the various benefits)

अलीकडेच एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून एसबीआय प्लॅटिनम करंट अकाउंटच्या फायद्याबद्दल ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की एसबीआयचे करंट अकाउंट व्यावसायिक, व्यापारी यांना पुढे जाण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी मदत करते. याचा व्यावसायिकांनी लाभ घ्यावा. या करंट अकाउंट आणि त्याच्या फायद्यांची माहिती घेण्यासाठी तुम्ही sbi.co.in/web/business/sme/current-accounts या वेबसाइटवर जाऊ शकता.

व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांच्या गरजांसाठी उपयुक्त सेवा

एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार प्लॅटिनम करंट अकाउंट त्या ग्राहकांसाठी आहे जे आपल्या व्यवसायासाठी आणि स्वत:साठी उत्तम बॅंकिंग सेवेची अपेक्षा ठेवतात. या करंट अकाउंटद्वारे सर्व प्रमुख सेवांना अनलिमिटेड स्वरुपात पुरवले जाते. जेणेकरून छोटे व्यापारी, प्रोफेशनल्स, मोठे व्यापारी, व्यावसायिक यांना सर्व सुविधा पुरवल्या जाव्यात. ज्यांना रोख रक्कम सांभाळावी लागते किंवा मोठ्या संख्येने आर्थिक व्यवहार करावे लागता, कलेक्शन करावे लागते, रोख रक्कम हाताळावी लागते अशांना ही सुविधा अतिशय उपयुक्त आहे.

प्लॅटिनम करंट अकाउंटची वैशिष्ट्ये -

 1. मंथली अॅव्हरेज बॅलन्स: 10,00,000 रुपये
 2. २ कोटी रुपये प्रति महिन्यांपर्यत मोफत रोख रक्कम जमा करता येते
 3. होम ब्रॅंचमधून अनलिमिटेड कॅश काढता येते
 4. अनलिमिटेड मोफत आरटीजीएस आणि एनईएफटी
 5. अनलिमिटेड मोफत मल्टीसिटी चेक लीफ
 6. अनलिमिटेड मोफत डिमांड ड्राफ्ट
 7. २ लाख रुपये प्रति दिन पैसे काढण्याच्या मर्यादेबरोबर मोफत प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड
 8. एसबीआयच्या सर्व २२००० शाखांमधून रोख रक्कम काढण्याची आणि जमा करण्याची सुविधा
 9. सर्वात सुरक्षित आणि सर्वात वेगवान कॉर्पोरेट इंटरनेट बॅंकिंग सुविधा मोफत
 10. नॉमिनेशनची सुविधा
 11. खाते सुरू ठेवण्याचे शुल्क: ५५० रुपये + जीएसटी
 12. करंट अकाउंट बंद करण्याचे शुल्क- खाते सुरू केल्यापासून १४व्या दिवसांपर्यत शुल्क नाही
 13. १४ दिवसांनंतर करंट अकाउंट बंद करण्याचे शुल्क- १००० रुपये + जीएसटी
 14. कॅश पिकअप: २ लाख रुपयांपर्यत मोफत

व्यवसाय करणारे किंवा व्यापारी एसबीआयमध्ये करंट अकाउंट सुरू करू शकतात. प्लॅटिनम करंट अकाउंटच्या अधिक माहितीसाठी एसबीआयच्या जवळच्या शाखेतदेखील तुम्ही जाऊ शकता किंवा sbi.co.in वर देखील जाऊन माहिती घेऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी