स्टेट बँकेने ४२ कोटी ग्राहकांना पाठवला हा अलर्ट, तुम्हांला आला का? 

बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्या ग्राहकांना नेहमी सावधान करत असते.

sbi release video and alert massage for their customers
स्टेट बँकेने ४२ कोटी ग्राहकांना पाठवला हा अलर्ट 

थोडं पण कामाचं

  • कोरोना काळात बँकिंग फ्रॉडची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
  • अनेक भामट्यांनी बँक ग्राहकांची फसवणूक केली आहे.
  • अशाप्रकारे बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्या ग्राहकांना नेहमी सावधान करत असते. 

नवी दिल्ली : कोरोना काळात बँकिंग फ्रॉडची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक भामट्यांनी बँक ग्राहकांची फसवणूक केली आहे. अशाप्रकारे बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्या ग्राहकांना नेहमी सावधान करत असते. आजही बँकेकडून आपल्या सुमारे ४२ कोटी ग्राहकांना मेसेज पाठवून सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

स्टेट बँकेने मंगळवारी देखील एसबीआयने एक ट्वीट शेअर करत त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने यामध्ये फेक मेसेजबाबत सतर्क केले आहे.

एसबीआयने त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना वेळोवेळी असे अलर्ट पाठवले आहेत की, बँकेकडून कोणतेही मेसेज त्यांच्या ग्राहकांना पाठवले जात नाहीत. त्याचप्रमाणे बनावट मेल न उघडण्याचा सल्लादेखील बँकेने दिला आहे.

दरम्यान एसबीआयने नुकत्याच केलेल्या या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'बँक ग्राहकांना अशी विनंती आहे की, सोशल मीडियावर त्यांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही भ्रामक किंवा बनावट मेसेजना बळी पडू नये.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी