SBI Interest rates : स्टेट बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे...बॅंकेकडून व्याजदरात 10 बीपीएसची वाढ

SBI MCLR : देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. एसबीआयने आपल्या व्याजदरात आता वाढ केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जावरील व्याजदरात (interest rates) 10 bps ने वाढ केली आहे. नवा वाढीव व्याजदर शुक्रवारपासून लागू झाला आहे. बॅंकेने सर्व कालावधीसाठीच्या मुदतठेवींचे व्याजदर 10 बीपीएसने वाढले आहेत. एमसीएलआर (MCLR) हा किमान कर्जदर आहे ज्याच्या खाली बँकांना कर्ज देण्याची परवानगी नाही.

SBI latest interest rates
एसबीआयचे ताजे व्याजदर 
थोडं पण कामाचं
  • स्टेट बॅंकेकडून व्याजदरात वाढ
  • बॅंकेने सर्व कालावधीसाठीच्या मुदतठेवींचे व्याजदर 10 बीपीएसने वाढले
  • बॅंकेने एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांच्या कालावधीसाठीचे व्याजदर वाढवले

SBI Hikes Interest Rates : नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. एसबीआयने आपल्या व्याजदरात आता वाढ केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जावरील व्याजदरात (interest rates) 10 bps ने वाढ केली आहे. नवा वाढीव व्याजदर शुक्रवारपासून लागू झाला आहे. बॅंकेने सर्व कालावधीसाठीच्या मुदतठेवींचे व्याजदर 10 बीपीएसने वाढले आहेत. एमसीएलआर (MCLR) हा किमान कर्जदर आहे ज्याच्या खाली बँकांना कर्ज देण्याची परवानगी नाही. रिझर्व्ह बँकेने 2016 मध्ये कर्जासाठी व्याजदर निश्चित करण्यासाठी MCLR लागू केला. MCLR वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगळा असतो. (SBI rises MCLR by 10 bps, check the latest interest rates)

MCLR मध्ये झालेली वाढ गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि कारसह कर्जाच्या व्याजदरांमध्ये वाढ दर्शवते. यामुळे कर्जावरील ईएमआय (EMI) देखील महाग होतील.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 15 July 2022: संधी गमावू नका! सोने झाले स्वस्त, चांदीदेखील 2000 रुपयांनी घसरली, पाहा ताजा भाव

स्टेट बॅंकेचे नवे व्याजदर (SBI MCLR)

स्टेट बॅंकेने (SBI) वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांच्या कालावधीसाठीचे व्याजदर 7.05 टक्क्यांवरून 7.15 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दर 7.35 टक्क्यांवरून 7.45 टक्के झाला, तर एक वर्षाच्या कालावधीसाठी तो 7.40 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांपर्यंत वाढला.

दोन वर्षे आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी, दर अनुक्रमे 7.60 टक्के आणि 7.70 टक्क्यांवरून 7.70 टक्के आणि 7.80 टक्के झाले.

अधिक वाचा : Useful Information: जर दुकानदार हमी किंवा हमी देऊन माल बदलण्यास टाळाटाळ करत असेल तर त्वरित करा हे काम...

रिझर्व्ह बॅंकेने वाढवला होता रेपो रेट

रिझर्व्ह बॅंकेने (RBI)पतधोरणविषय समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आरबीआयने रेपो रेट 50 bps ने वाढवून 4.90 टक्क्यांपर्यंत नेला होता. त्यानंतर अनेक बॅंकांनी व्याजदरात वाढ केली होती. स्टेट बॅंक ऑफ इंडियानेदेखील जूनमध्ये एमसीएलआर  (MCLR) 20 बीपीएसने वाढवला होता.

आरबीआयने रेपो दर वाढवल्यानंतर, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया इत्यादी अनेक बॅंकांनी त्यांचे एमसीएलआर म्हणजे व्याजदर वाढवले आहेत. महागाईला आळा घालण्यासाठी पुढील काही धोरणात्मक बैठकांमध्ये रिझर्व्ह बॅंक आपल्या व्याजदरात वाढ करेल अशी अपेक्षा आहे.

अधिक वाचा : Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये गुंतवा 50 रुपये आणि मॅच्युरिटीला मिळवा 50 लाख

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महागाई नियंत्रित करण्यासाठी आपल्या प्रमुख रेपो दरात वाढ केल्यानंतर बँका मुदत ठेवींवर (FDs) व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे एकीकडे कर्जे महाग होत आहेत तर दुसरीकडे बॅंकांच्या मुदतठेवीवरील व्याजदरात (Bank Interest rates) देखील वाढ होते आहे. अनेक बॅंकांनी व्याजदर वाढवण्यास सुरूवात केली आहे.  

महागाई नियंत्रित करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जूनच्या सुरुवातीस मुख्य रेपो दर 50 बेसिस पॉइंट्स (bps) ने वाढवला. आरबीआयच्या पतधोरणविषयक समितीने 40 बेसिस पॉइंट्सने वाढवल्यानंतर ही जवळपास महिन्याभरातील दुसरी वाढ होती.  मे महिन्यात किरकोळ महागाई 7.04 टक्के होती. हा आकडा आरबीआयच्या 2-6 टक्क्यांच्या लक्ष्य मर्यादेपेक्षा जास्त आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी