SBI Interest rate : स्टेट बॅंकेने महिनाभरात दुसऱ्यांदा केली व्याजदरात वाढ, कर्जे झाली महाग, पाहा किती वाढणार तुमचा ईएमआय...

Interest rates : भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 15 मे पासून लागू होणार्‍या कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये (MCLR) 10 आधार अंकांनी वाढ केली आहे. स्टेट बॅंकेने मागील महिनाभरात दुसऱ्यांदा एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. एमसीएलआरमध्ये वाढ झाल्याने आता बॅंकेच्या व्याजदरातदेखील वाढ झाली आहे.

SBI rises interest rates
स्टेट बॅंकेने व्याजदरात केली वाढ 
थोडं पण कामाचं
  • स्टेट बॅंकेने आपल्या व्याजदरात केली वाढ
  • एसबीआयने एमसीएलआरमध्ये केली 10 बेसिस पॉइंटने वाढ
  • व्याजदर वाढल्यामुळे कर्ज होणार महाग आणि ईएमआय वाढणार

SBI MCLR Hike : नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 15 मे पासून लागू होणार्‍या कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये (MCLR) 10 आधार अंकांनी वाढ केली आहे. स्टेट बॅंकेने मागील महिनाभरात दुसऱ्यांदा एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. एमसीएलआरमध्ये वाढ झाल्याने आता बॅंकेच्या व्याजदरातदेखील वाढ झाली आहे. यामुळे एकीकडे कर्जे महाग होणार असून त्यावरील व्याजदर वाढणार आहेत. तर दुसरीकडे मुदतठेवींवर देखील जास्त व्याज मिळणार आहे. (SBI rises MCLR by 10 bps second time in a month)

अधिक वाचा : PM Kisan : या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये!

स्टेट बॅंकेचा नवा व्याजदर

स्टेट बॅंकेचा ओव्हरनाईट, एक महिना, तीन महिन्यांचा एमसीएलआर (MCLR)आता 6.85 टक्के आहे तोच पूर्वी 6.75 टक्के इतका होता. त्याचप्रमाणे, सहा महिन्यांचा एमसीएलआर 7.15 टक्के, एक वर्षाचा MCLR 7.20 टक्के, दोन वर्षांचा MCLR 7.40 टक्के आणि तीन वर्षांचा MCLR 7.50 टक्के आहे. ेएसबीआयने एकाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा व्याजदरात वाढ केली आहे.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 16 May 2022: सोनं घेता का कोणी सोनं! मोठी घसरणीसह पोचले 3 महिन्यांच्या नीचांकीवर, लग्नसराईत मोठी संधी

आरबीआयने वाढवला होता रेपो रेट

वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी एका अचानक घेतलेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दर 40 बेसिस पॉइंट्सने वाढवून तो 4.40 टक्क्यांपर्यंत आणला आहे. आरबीआयच्या रेपो रेट वाढवण्याच्या RBI च्या  निर्णयानंतर आता स्टेट बॅंकेने आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात केली आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीने त्याचा बेंचमार्क दर 40 बेस पॉइंटने वाढवण्यापूर्वी एप्रिलमध्ये, स्टेट बॅंकेने एमसीएलआर 10 बीपीएसने वाढवला होता.

अधिक वाचा : EPFO Update : पीएफखातेधारकांच्या खात्यात जमा होणार पैसे, या नंबरवर लगेच चेक करा तुमचा बॅलन्स

कर्जे झाली महाग, वाढणार ईएमआय

MCLR मध्ये वाढ झाल्यामुळे, ज्या कर्जदारांनी घर, वाहन आणि वैयक्तिक कर्जे घेतली आहेत त्यांचे मासिक हप्ते (EMIs) येत्या काही महिन्यांत वाढताना दिसतील. रिझव्‍‌र्ह बँकेने अनुकूल धोरण (आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पैशांचा पुरवठा वाढवण्याची तयारी) मागे घेण्याच्या तयारीत असल्याने, येत्या काही महिन्यांत कर्जाचे दर आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. डिसेंबर 2021 पर्यंत बँकांच्या कर्जाच्या व्यवसायात MCLR-संबंधित कर्जांचा सर्वात मोठा वाटा (53.1 टक्के) होता. मार्च 2020 ते जानेवारी 2022 दरम्यान बँकांच्या एका वर्षाच्या सरासरी MCLR मध्ये 95 bps ने घट झाल्यानंतर MCLR मध्ये वाढ झाली आहे.

स्टेट बॅंकेने अलीकडेच 10 मे पासून लागू होणार्‍या त्यांच्या बल्क टर्म डिपॉझिट्सवर (2 कोटी रुपये आणि त्याहून अधिक) व्याजदर 40 - 90 बेसिस पॉइंट्सने वाढवले ​​आहेत.

रिझर्व्ह बॅंकेने (RBI) रेपो रेटमध्ये वाढ करतानाच बऱ्याच काळापासून घटलेल्या व्याजदरांना चालना मिळणार आहे. बॅंकिंग क्षेत्रावर आरबीआयच्या धोरणाचा थेट आणि तात्काळ परिणाम होत असतो. आरबीआयने रेपो रेट (Repo rate) वाढवल्यामुळे आता देशातील सर्वच बॅंका हळूहळू आपल्या व्याजदरात वाढ करत आहेत. यामुळे तुम्हाला तुमच्या मुदतठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरात तर वाढ होणारच आहे. मात्र त्याचबरोबर तुम्हाला मिळणारी कर्जदेखील महाग होणार आहे. विशेषत: गृहकर्जे महागणार आहे. तुमचा होमलोनचा ईएमआय वाढणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी