SBI खातेधारकांसाठी महत्त्वाचे! ATM मधून १०,००० आणि वरील रक्कम काढण्यासाठी आवश्यक आहे हा चार डिजिट नंबर

SBI | एसबीआयच्या खातेधारकांना ही बाब माहित असली पाहिजे की ओटीपी आधारित व्यवस्था कसे काम करते. ही सुविधा स्टेट बॅंकेच्या एटीएममधून १०,००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढतानाच लागू होणार आहे.

Cash withdrawal from SBI ATM
एसबीआयच्या एटीएममधून कॅश काढण्याची पद्धत 
थोडं पण कामाचं
  • एसबीआयकडून एटीएमद्वारे होणारे व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन अधिक सुरक्षित व्हावेत यासाठी ओटीपीवर आधारित ट्रान्झॅक्शन
  • ही व्यवस्था एटीएममधून १०,००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढतानाच लागू होणार
  • स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या भारतात ७१,७०५ बीसी आउटलेट्सबरोबर २२,२२४ शाखा आणि ६३,९०६ एटीएम किंवा सीडीएम

SBI | नवी दिल्ली: स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (State Bank of India) एटीएमद्वारे होणारे व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन अधिक सुरक्षित व्हावेत यासाठी ओटीपीवर आधारित ट्रान्झॅक्शनची सुरूवात केली आहे. या नव्या व्यवस्थेमुळे एसबीआय खातेधारकांना ओटीपी आधारावरच एटीएममधून रोख रक्कम काढता येणार आहे. ग्राहकांना आधी त्यांच्या मोबाइल फोन वर एक ओटीपी येईल त्याच्या आधारावरच एटीएममधून रोख रक्कम (Cash withdrawal from SBI ATM) काढता येणार आहे. यामुळे फ्रॉड किंवा फसवणुकीला टाळता येणार आहे. (SBI offers OTP based cash withdrawal from ATM for account holders)

ओटीपीवर आधारित व्यवस्था

एसबीआयकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की एसबीआय एटीएमद्वारे करण्यात येणारे ट्रान्झॅक्शनसाठी ओटीपी आधारित रोख रक्कम काढण्याची व्यवस्था फ्रॉडविरुद्धच्या सुरक्षेसाठी आहे. खातेधारकांना फ्रॉड किंवा फसवणुकीपासून वाचवणे याला बॅंकेचे प्राधान्य आहे. एसबीआयच्या खातेधारकांना ही बाब माहित असली पाहिजे की ओटीपी आधारित व्यवस्था कसे काम करते. ही सुविधा स्टेट बॅंकेच्या एटीएममधून १०,००० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढतानाच लागू होणार आहे. या सुविधेनुसार स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना त्यांच्या बॅंक खात्याशी नोंदवलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी आणि खातेधारकांच्या डेबिट कार्डचा पिन हा प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या वेळेस एटीएममधून १०,००० रुपये किंवा अधिक रक्कम काढताना आवश्यक आहे. ही सुविधा बॅंकेने १ जानेवारी २०२० पासून लागू केलेली आहे.

स्टेट बॅंकेचे जाळे

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी तुम्ही डेबिट कार्डचा वापर केल्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर हा ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी ही एक चारअंकी संख्या असते आणि ती एकवेळची पासवर्ड असते. यामुळे खातेधारकच अधिकृतपणे एटीएममधून पैसे काढत असल्याची बाब प्रमाणित होईल. स्टेट बॅंक ऑफ इंडिया, एकूण संपत्ती, शाखा, बॅंकेतील ठेवी, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठी बॅंक आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या भारतात ७१,७०५ बीसी आउटलेट्सबरोबर २२,२२४ शाखा आणि ६३,९०६ एटीएम किंवा सीडीएम आहेत. देशातील बॅंकिंगमधील हे सर्वात मोठे जाळे आहे. इंटरनेट बॅंकिंग आणि मोबाइल बॅंकिंगचा वापर करणाऱ्या खातेधारकांची संख्या अनुक्रमे ९.१ कोटी आणि २ कोटी इतकी आहे. 

एसबीआय, पंजाब नॅशनल बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदाने व्याजदरात कपात केली आहे. पीएनबीचे गृहकर्ज ६.५५ टक्के आहे. तर एसबीआयने गृहकर्जावरील व्याजदर कमी करून ६.७० टक्के केले आहे. बॅंक ऑफ बडोदानेदेखील व्याजदर कमी करत ते ६.७५ टक्क्यांवर आणले आहेत. अनेक बॅंका आणि वित्तीय सेवा कंपन्यांनी गृहकर्जावर (Home Loan) विविध ऑफर्स बाजारात आणल्या आहेत. दुसऱ्या बाजूला बांधकाम व्यावसायिक देखील अनेक ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी