दिवाळीत गोड बातमी: SBIच्या नफ्यात मोठी वाढ, 'इतक्या' कोटींचा झाला फायदा

SBI: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक (एसबीआय)च्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी उसळी पहायला मिळाली. एसबीआयच्या शेअर्मध्ये झआलेल्या वाढीमुळे बँकेला कोट्यावधी रुपयांचा नफा झाला आहे. 

sbi share price increased crores rupees profit business news marathi
SBIच्या नफ्यात मोठी वाढ, 'इतक्या' कोटींचा झाला फायदा 

थोडं पण कामाचं

  • एसबीआयच्या तिमाहीतील नफ्यात वाढ 
  • एसबीआयच्या शेअर्समध्ये मोठी वाढ 
  • एसबीआयला कोट्यावधी रुपयांचा नफा

मुंबई: भारतीय स्टेट बँक (एसबीआय)ने आपल्या तिमाहीत झालेल्या उत्पन्नाची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार एसबीआयला मोठ्या प्रमाणात नफा झाल्याचे दिसून येत आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत एसबीआयला ३०११.७३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत एसबीआयच्या नफ्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

...म्हणून झाला मोठा नफा

२०१८ सालच्या तिमाहीत एसबीआयला ९४४.८७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. शुक्रवारी एसबीआयने यंदाच्या वर्षीच्या तिमाहीतील उत्पन्नाची घोषणा केली. यावरुन दिसून येतं की, एसबीआयला मिळणाऱ्या व्याजामुळे बँकेची आर्थिक स्थिती आणखीन मजबूत झाली असून बँकेच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. 

शेअर्समध्ये मोठी वाढ 

नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये एसबीआयच्या शेअर्समध्ये ७.५६ टक्क्यांनी वाढ होत २८२.३५ रुपयांवर पोहोचला आहे. बँकेच्या शेअर्समध्ये आलेल्या या तेजीमुळे कंपनीचे बाजारी भआंडवल १६,८६८.०६ कोटी रुपयांवरुन २,५१,३१७.०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयला इतका मोठा लाभ झाल्याने त्याचा मोठा फायदा बँकेला होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

व्याजामुळे उत्पन्नात १७ टक्क्यांनी वाढ

जुलै-सप्टेंबर या काळात भारतीय स्टेट बँकेला मिळालेल्या व्याजामुळे बँकेच्या उत्पन्नात १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे हे उत्पन्न २४,६०० कोटी रुपये झालं आहे. तर ग्रॉस एनपीए ७.१९ टक्क्यांहुन कमी झालं आहे. या दरम्यान बँकेचा ग्रॉस एनपीए १,६१,६३६ कोटी रुपये झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी