SBI New Feature: स्टेट बॅंकेच्या ग्राहकांचा जबरदस्त फायदा, आता घर बसल्या मिळणार 35 लाखांपर्यंतचे कर्ज...पाहा कसे

SBI Real Time Xpress Credit : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेली एसबीआयने ग्राहकांना वैयक्तिक कर्ज (SBI Personal Loan)देण्यासाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट (Real Time Xpress Credit) नावाच्या या सुविधेमुळे ग्राहकांना 35 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घरी बसून सहज घेता येणार आहे. ही सुविधा स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या योनो अॅपवर (YONO App) सुरू करण्यात आले आहे.

SBI Personal Loan
एसबीआयचे पर्सनल लोन मिळणार आता घरबसल्या 
थोडं पण कामाचं
  • स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहांसाठी सुरू केली नवी सुविधा
  • ही सुविधा स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या योनो अॅपवर मिळणार
  • रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट नावाच्या या सुविधेमुळे ग्राहकांना 35 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घर बसल्या मिळणार

SBI New Feature Update : नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेली एसबीआयने ग्राहकांना वैयक्तिक कर्ज (SBI Personal Loan)देण्यासाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट (Real Time Xpress Credit) नावाच्या या सुविधेमुळे ग्राहकांना 35 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घरी बसून सहज घेता येणार आहे. ही सुविधा स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या योनो अॅपवर (YONO App) सुरू करण्यात आले आहे. या खास वैशिष्ट्याबद्दल जाणून घेऊया. (SBI starts news facility of Real Time Xpress Credit for personal loan, check the details)

अधिक वाचा : Types Of Savings Account : बचत खात्याचे किती प्रकार आहेत? तुमच्यासाठी कोणते सर्वोत्तम असेल, येथे समजून घ्या

स्टेट बॅंके देतंय जबरदस्त सुविधा (SBI News Facility)

तुमच्या माहितीसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या रियल टाइम एक्सप्रेस क्रेडिटच्या (SBI Real Time Xpress Credit) या विशेष सुविधेचा लाभ सर्व ग्राहकांना मिळणार नाही. त्याचा लाभ फक्त केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी आणि संरक्षण सेवांमध्ये काम करणाऱ्या ग्राहकांनाच मिळणार आहे. या विशेष सुविधेअंतर्गत, ग्राहक योनो अॅपच्या (YONO App)मदतीने क्रेडिट तपासणी, पात्रता आणि इतर कागदपत्र पडताळणी यांसारखी कामे घरी बसून करू शकतील.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 23 May 2022 : सोन्याच्या भावात किंचित वाढ, चांदी मात्र थोडीशी घसरली, पाहा ताजा भाव

तुम्ही 35 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता

एसबीआयच्या या सुविधेअंतर्गत तुम्ही 35 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता. याअंतर्गत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. क्रेडिट चौकशी, कर्ज पात्रता, कर्ज मंजूरी आणि दस्तऐवज सादर करणे ही सर्व कामे ऑनलाइन केली जातील.

एसबीआयने दिली माहिती 

याबाबत माहिती देताना स्टेट बॅंकेचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, “YONO वरील पात्र पगारदार ग्राहकांसाठी रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट लोन सुविधा सुरू केल्याने ग्राहकांना मोठा फायदा होईल. एक्सप्रेस क्रेडिट उत्पादन ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय डिजिटल पद्धतीने कर्ज मिळवण्यास मदत करेल. बँकिंग सुलभ करण्यासाठी ग्राहकांना पूर्णपणे डिजिटल बँकिंग सुविधा देण्यासाठी एसबीआय प्रयत्नशील आहे.

अधिक वाचा : Electric Vehicle : नितीन गडकरी इलेक्ट्रिक वाहनांबद्दल असे काही बोलले की कार-बाइक चालवणारे झाले खूश...

एसबीआयच्या व्याजदरात वाढ

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 15 मे पासून लागू होणार्‍या कालावधीसाठी एमसीएलआरमध्ये (MCLR) 10 आधार अंकांनी वाढ केली आहे. स्टेट बॅंकेने मागील महिनाभरात दुसऱ्यांदा एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे. एमसीएलआरमध्ये वाढ झाल्याने आता बॅंकेच्या व्याजदरातदेखील वाढ झाली आहे. यामुळे एकीकडे कर्जे महाग होणार असून त्यावरील व्याजदर वाढणार आहेत. तर दुसरीकडे मुदतठेवींवर देखील जास्त व्याज मिळणार आहे. स्टेट बॅंकेचा ओव्हरनाईट, एक महिना, तीन महिन्यांचा एमसीएलआर (MCLR)आता 6.85 टक्के आहे तोच पूर्वी 6.75 टक्के इतका होता. त्याचप्रमाणे, सहा महिन्यांचा एमसीएलआर 7.15 टक्के, एक वर्षाचा MCLR 7.20 टक्के, दोन वर्षांचा MCLR 7.40 टक्के आणि तीन वर्षांचा MCLR 7.50 टक्के आहे. ेएसबीआयने एकाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी