SBI मध्ये जाऊन खराब नोटा बदलता येतात का? चिंता करू नका पाहा काय करायचे...

SBI soiled notes | स्टेट बॅंकेने ट्विटरवर एका ग्राहकाला उत्तर देताना म्हटले आहे की बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये पूर्णपणे खराब झालेल्या किंवा थोडाशा खराब झालेल्या नोटा बदलून मिळतात. बॅंकेने पुढे म्हटले की बॅंकेची करन्सी चेस्ट ब्रॅंच खराब झालेल्या किंवा जुन्या नोटा बदलून देते. स्टेट बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार करन्सी नोट बदलण्याची सुविधा बॅंकेच्या ग्राहकांना आणि इतरांसाठीदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Spoiled or mutilated notes
खराब किंवा फाटक्या नोटा कशा बदलायच्या 
थोडं पण कामाचं
  • फाटक्या, चुरगळलेल्या किंवा खराब झालेल्या नोटांचे काय करायचे हा मोठा प्रश्न असतो
  • बॅंकेत (Bank) जाऊन या नोटा बदलू शकता
  • स्टेट बॅंकेने ट्विट करत नोटा बदलण्यासंदर्भात दिली माहिती

SBI soiled notes | नवी दिल्ली: अनेकवेळा फाटक्या, चुरगळलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा (spoiled or mutilated notes) आपल्याकडे येत असतात. अशावेळी या नोटांचे काय करायचे हा मोठा प्रश्न असतो. तुमच्याकडेदेखील अशा फाटलेल्या  किंवा खराब झालेल्या नोटा असतील तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही बॅंकेत (Bank) जाऊन या नोटा बदलू शकता. देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (State Bank of India) ही माहिती दिली आहे. स्टेट बॅंकेने ट्विट करत एका ग्राहकाला उत्तर देताना यासंदर्भातील माहिती दिली आहे. (You can exchanged spoiled or mutilated notes in banks, check the SBI twit).

एसबीआयचे ग्राहकाला उत्तर

स्टेट बॅंकेने ट्विटरवर एका ग्राहकाला उत्तर देताना म्हटले आहे की बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये पूर्णपणे खराब झालेल्या किंवा थोडाशा खराब झालेल्या नोटा बदलून मिळतात. बॅंकेने पुढे म्हटले की बॅंकेची करन्सी चेस्ट ब्रॅंच खराब झालेल्या किंवा जुन्या नोटा बदलून देते. स्टेट बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार करन्सी नोट बदलण्याची सुविधा बॅंकेच्या ग्राहकांना आणि इतरांसाठीदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रकारात बॅंक रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते. बॅंकेने सांगितले की आरबीआयने बॅंकांना त्या खराब नोटांना बदलण्याची परवानगी दिली आहे ज्या खऱ्या आहेत आणि त्या अशाप्रकारे खराब झालेल्या आहेत ज्या कोणतीही फसवणुक होऊ शकत नाही.

ग्राहकाचा बॅंकेला प्रश्न

स्टेट बॅंकेने हे ट्विट एका ग्राहकाच्या प्रश्नाला उत्तर देताना केले आहे. एका व्यक्तीने ट्विटरवर बॅंकेला टॅग करत विचारले होते की त्याच्याकडे दोन हजार रुपयांची एक नोट आहे आणि ती फाटली आहे. तो ती नोट बदलू इच्छितो. आरबीआयच्या सूचनांनुसार जुन्या किंवा फाटलेल्या नोटा बदलता येतात. मात्र बॅंकेने नोट बदलून देण्यात मनाई केली. त्यानंतर त्या व्यक्तीने स्टेट बॅंकेच्या ट्विटर हॅंडलला टॅग करत विचारले की तो पुढे काय करू शकतो.

खराब नोटांसाठीच्या आरबीआयची मार्गदर्शक तत्त्व

खराब झालेल्या नोटा म्हणजे ज्या नोटा घाण झाल्या आहेत, ज्यावर डाग पडले आहेत किंवा ज्या थोड्याशा फाटल्या आहेत. ज्या नोटांच्या दोन्ही कोपऱ्यांवर नंबर देण्यात आले आहेत, म्हणजे जी नोट १० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक मूल्याची आहे, अशा नोटेला खराब नोट समजले जाते. अशा सर्व नोटांना कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या काउंटरवर जाऊन बदलता येते. याचबरोबर या नोटा खासगी क्षेत्रातील कोणत्याही करन्सी चेस्ट ब्रॅंचमध्ये किंवा रिझर्व्ह बॅंकेच्या इश्यू ऑफिसमध्ये जाऊन बदलता येतात. यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरण्याची आवश्यकता नसते.

फाटलेल्या नोटांसाठीचे आरबीआयचे नियम

जी नोट फाटली आहे, ज्या नोटेचे दोन तुकडे झाले आहेत किंवा नोटेचा महत्त्वाचा भाग हरवला आहे, अशा नोटांना बदलता येते. करन्सी नोटमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे ऑथोरिटी,गॅरंटी, प्रोमिज क्लॉज, सिग्नेचर, महात्मा गांधी यांचा फोटो, अशोक स्तंभ इत्यादी बाबी असतात. या नोटांची रिफंड व्हॅल्यू आरबीआयच्या नियमानुसार दिली जाते. या नोटा कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेच्या काउंटरवर बदलता येतात. याचबरोबर या नोटा खासगी क्षेत्रातली बॅंकेच्या करन्सी चेस्ट ब्रॅंच किंवा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये जाऊन बदलता येतात. यासाठी कोणताही फॉर्म भरावा लागत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी