Demat Account : शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाची बातमी! डिमॅट खात्याबाबत सेबीची मोठी घोषणा

Nomination for Demat Account : शेअर बाजारातील (Share Market)गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेबीने (SEBI) शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पॅन कार्ड आणि आधार लिंक (आधार-पॅन लिंक) पासून ट्रेडिंग-डीमॅट खात्यापर्यंत (Demat Account), नॉमिनीचे नाव टाकणे बंधनकारक आहे. सेबीने 31 मार्च 2022 रोजी नामांकनाची अंतिम मुदतही जाहीर केली होती. मात्र आता सेबीने गुंतवणुकदारांना दिलासा देत ही मुदत एक वर्षासाठी वाढवली आहे.

Demat Account update
डीमॅट खात्याचे नामांकन 
थोडं पण कामाचं
  • शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते आवश्यक
  • सेबीने डीमॅट खात्यात नॉमिनेशन टाकण्याबाबत वाढवली मुदत
  • डीमॅट खात्यामध्ये नॉमिनेशन करण्याची पद्धत

Demat Account : मुंबई : शेअर बाजारातील (Share Market)गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सेबीने (SEBI) शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पॅन कार्ड आणि आधार लिंक (Aadhaar-PAN Link) पासून ट्रेडिंग-डीमॅट खात्यापर्यंत (Demat Account), नॉमिनीचे नाव टाकणे बंधनकारक आहे. सेबीने 31 मार्च 2022 रोजी नामांकनाची अंतिम मुदतही जाहीर केली होती. मात्र आता सेबीने गुंतवणुकदारांना दिलासा देत ही मुदत एक वर्षासाठी वाढवली आहे. म्हणजेच आता गुंतवणुकदार डीमॅट खात्यात नॉमिनीचे नाव (Nomination for Demat Account) टाकण्याचे काम 31 मार्च 2023 पर्यंत करू शकतात. यामुळे ज्या गुंतवणुकदारांनी अद्यापपर्यत नॉमिनीचे नाव अपडेट केले नव्हते त्यांना दिलासा मिळणार आहे. (SEBI extends the deadline for updating the nomination for Demat account)

अधिक वाचा : Free Ration Update: मोठा धक्का! रेशनकार्ड लाभार्थ्यांना मिळणार नाही मोफत गहू, सरकारचे आदेश

सेबीने केली मोठी घोषणा 

हे लक्षात घेण्यासारखे आहे की SEBI च्या नियमांनुसार, ज्यांच्याकडे डिमॅट किंवा ट्रेडिंग खाते आहे, SEBI ने 31 मार्चपर्यंत नॉमिनीच्या नावाची नोंदणी करण्याचा नियम केला आहे. ज्यांनी अद्याप डीमॅट किंवा ट्रेडिंग खात्यात नामांकन केलेले नाही ते 31 मार्च 2023 पर्यंत करू शकतात. यापूर्वी त्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ होती. आता एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

अधिक वाचा : Air Force ने शेअर केले डिटेल्स; अग्निवीरांना एक कोटीचा विमा, 30 दिवसांच्या सुट्ट्या अन् असेल कॅन्टीनची सुविधा

सेबीने जाहीर केले परिपत्रक 

सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने यासाठी परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये सेबीने म्हटले आहे की, 'नॉमिनी करण्यासाठी साक्षीदाराची गरज नाही. नामनिर्देशन फॉर्मवर खातेदाराने स्वाक्षरी करणे आवश्यक असेल. पुढे, ई-साइन सुविधेचा वापर करून ऑनलाइन भरलेल्या नामनिर्देशन/घोषणा फॉर्मसाठी साक्षीदाराची आवश्यकता नाही. तथापि, खातेदाराने स्वाक्षरीऐवजी अंगठ्याचा ठसा वापरल्यास, फॉर्मवर साक्षीदाराची स्वाक्षरी देखील असणे आवश्यक आहे.

अधिक वाचा : Father’s Day Gift : या फादर्स डे निमित्त वडिलांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी द्या आर्थिक भेट, पाहा कशी?

डीमॅट खात्यामध्ये नॉमिनेशन कसे करावे

  1. -जर तुम्हाला तुमच्या खात्यात नामनिर्देशित व्यक्तीचे नाव देखील जोडायचे असेल तर प्रथम तुम्ही नामनिर्देशन फॉर्म भरून त्यावर स्वाक्षरी करून मुख्य कार्यालयाच्या पत्त्यावर कुरियर करू शकता (ज्या ब्रोकर कंपनीने डिमॅट खाते उघडले आहे तिथे) .
  2. - तुमच्या ट्रेडिंग आणि डीमॅट खात्यावर नामनिर्देशन लागू होईल, हा नामनिर्देशन तुमच्या डिमॅट खात्यात जोडला जाईल, तुमच्या कॉइन (म्युच्युअल फंड) होल्डिंगसाठीही हेच नामांकन लागू होईल.
  3. -तुम्हाला नामांकन अर्जासोबत नॉमिनीचा आयडी प्रूफ पाठवावा लागेल.
  4. -यासाठी तुम्ही आधार, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कोणताही आयडी पुरावा पाठवू शकता.
  5. -तुमचे खाते उघडल्यानंतर आणि एखाद्याला नॉमिनी बनवल्यानंतर तुम्हाला नॉमिनी बदलायचा असेल, तर तुम्हाला 25+18% GST शुल्क भरावे लागेल.
  6. यासाठी, तुम्हाला नामांकन अर्जाची हार्ड कॉपी खाते सुधारित फॉर्मसह पाठवावी लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी