Gold Trading | भारतात सुरू होणार गोल्ड ट्रेडिंग, गोल्ड एक्सचेंजसाठीची नियम जाहीर, असा होईल व्यवहार

Gold : सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजे सेबीने (SEBI)सोन्याचे ट्रेडिंग किंवा सोन्याचा व्यवहार डिजिटल स्वरुपात करण्यासाठी गोल्ड एक्सचेंजचा आराखडा जाहीर केला आहे. या बाजारात सोन्याची (Gold)खरेदी-विक्री इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स (EGR)च्या रुपात होणार आहे. सेबीने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की जे शेअर बाजारात (Share Market) ईजीआर सुरू करण्यास इच्छुक आहेत त्यांनी यासाठी अर्ज करावा. शेअर बाजार किंवा ईजीआरला सोन्यात रुपांतरित करू शकतात.

Gold Trading
गोल्ड ट्रेडिंग 
थोडं पण कामाचं
  • देशात लवकरच गोल्ड एक्सचेंजद्वारे करता येणार सोन्याचे व्यवहार
  • बाजारात सोन्याची (Gold)खरेदी-विक्री इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स (EGR)च्या रुपात होणार
  • सेबीकडून गोल्ड ट्रेडिंगसाठीचे नियम आणि आराखडा जाहीर

Gold Exchange : मुंबई : भारतात लवकरच गोल्ड ट्रेडिंगची (Gold Trading)सुरूवात होणार आहे. सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजे सेबीने (SEBI)सोन्याचे ट्रेडिंग किंवा सोन्याचा व्यवहार डिजिटल स्वरुपात करण्यासाठी गोल्ड एक्सचेंजचा आराखडा जाहीर केला आहे. या बाजारात सोन्याची (Gold)खरेदी-विक्री इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स (EGR)च्या रुपात होणार आहे. सेबीने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की जे शेअर बाजारात (Share Market) ईजीआर सुरू करण्यास इच्छुक आहेत त्यांनी यासाठी अर्ज करावा. शेअर बाजार किंवा ईजीआरला सोन्यात रुपांतरित करू शकतात. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पूर्ण सैदा तीन टप्प्यामध्ये-ईजीआर तयार करणे, शेअर बाजारात ईजीआरमध्ये व्यवहार आणि ईजीआरला प्रत्यक्ष सोन्यात बदलता येणार आहे. (SEBI issues guidelines to start Gold Exchange in India, gold trading will be done like this)

असा असेल आराखडा

डिपॉझिटरी एक संयुक्त व्यासपीठ यासाठी विकसित करतील. या प्लॅटफॉर्मवर सर्वानाच काम करता येईल. यामध्ये डिपॉझिटरी, शेअर बाजार, नियमन संस्था, वॉल्टचे व्यवस्थापन सर्वांचाच समावेश आहे. वॉल्ट म्हणजे तिजोरी किंवा स्ट्रॉंग रुमचे व्यवस्थापनाचे काम मान्यता प्राप्त स्टोरेज ठिकाणी सोन्याची साठवण करणे हे आहे. वॉल्ट व्यवस्थापनाला सेबीने निश्चित केलेल्या ठिकाणी आणि पद्धतीने सोने साठवावे लागेल. शिवाय सोन्याच्या गुणवत्तेची खातरजमा करण्याची जबाबदारी देखील त्यांचीच असेल. सेबीने म्हटले आहे की नवीन आराखडा आणि नियम तात्काळ प्रभावाने अंमलात लागू होईल.

वॉल्ट मॅनेजर्ससाठी नियम जाहीर

याआधी सरकारने शेअर नियम कायदा, १९५६ अंतर्गत २४ डिसेंबरला एका अधिसूचनेद्वारे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्सला शेअरच्या रुपात जाहीर केले होते. सेबीने स्वतंत्रपणे ३१ डिसेंबरला वॉल्ट मॅनेजर्ससाठी नियम जाहीर केले होते. सेबीच्या सर्क्युलरनुसार प्रत्यक्ष सोन्याचा पुरवठा ईजीआरमध्ये रुपांतरित केला जाईल. सोन्याचा पुरवठा एकतर आयात करून केला जाईल किंवा शेअर बाजारातून मान्यताप्राप्त देशांतर्गत रिफायनरींद्वारे तिजोरी किंवा स्ट्रॉंग रुममध्ये केला जाईल. तिजोरीत जमा झालेल्या सोन्याला ईजीआरमध्ये रुपांतरित करण्याच्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो. वॉल्ट प्रशासन याची खातरजमा करतील की सोन्याला ईजीआरमध्ये बदलल्यावर सर्व निकषांचे पूर्तता होईल.

वॉल्ट मॅनेजरची असेल ही जबाबदारी

वॉल्ट मॅनेजरच्या जबाबदाऱ्यांमध्ये रकमेचा स्वीकार करणे, सोन्याचा साठा करणे, त्याला सुरक्षित ठेवणे, ईजीआरची देखरेख आणि त्याचा व्यवहार करणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि सोन्याच्या डिपॉजिटरीच्या रेकॉर्डशी ईजीआरचा ताळमेळ साधणे इत्यादी बाबींचा समावेश आहे. 

कोण करू शकता वॉल्ट मॅनेजरसाठी अर्ज?

वॉल्ट मॅनेजरच्या रुपात काम करण्यासाठी इच्छूक व्यक्तीला आधी सेबीकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी पात्रतेच्या निकषाबद्दल सेबीने म्हटले आहे की भारतीय असलेली आणि किमान ५० कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती असलेली, कंपनी, कॉर्पोरेट, संस्था वॉल्ट मॅनेजरसाठी अर्ज करू शकतात. जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिले जाईल ते तोपर्यत वैध असेल जोपर्यत सेबीकडून ते रद्द केले जात नाही. सेबीने म्हटले आहे की जर एखाद्या वॉल्ट मॅनेजरने इतर व्यवहार केले तर त्यांच्या व्यवहारांमध्ये वॉल्ट मॅनेजरशी संबंधित व्यवहार स्वतंत्रपणे करण्यात आले पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी