Retail Investors | गुंतवणुकदारांची फसवणूक! सोशल मीडियावर शेअर बाजाराच्या टिप्स देणाऱ्यांना सेबीचा दणका

SEBI Action | सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social media)देण्यात येत असलेल्या बेकायदेशीर टिप्सविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मागील आठवड्यात अहमदाबाद आणि मेहसाणा या गुजरातमधील दोन शहरात सेबीने छापे मारले होते, त्यात या नव्या टीमने चांगलीच मदत केली होती. अलीकडच्या काही दिवसात सोशल मीडियावर शेअर खरेदी आणि विक्री यासाठीच्या टिप्स (Share market tips)जोरात दिल्या जात आहेत. हे लोक सेबीचे नोंदणीकृत विश्लेषक नाहीत आणि यांना असे काम करण्याची परवानगी देखील नाही.

SEBI action
सेबीची गुंतवणुकदारांच्या हितासाठी कारवाई 
थोडं पण कामाचं
  • अलीकडच्या काळात सोशल मीडियाद्वारे शेअर बाजाराच्या टिप्स देण्याच्या धंद्यात वाढ
  • सर्वसामान्य गुंतवणुकदारांची टिप्स देण्याच्या निमित्ताने होते फसवणूक
  • गुंतवणुकदारांचे हित सांभाळण्यासाठी सेबीकडून खास टीमची स्थापना

SEBI Action | नवी दिल्ली : सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजे सेबीने (SEBI) एक टीम तयार केली आहे. या टीमने व्हॉट्सअॅप (WhatsApp)आणि टेलीग्रामसारख्या (Telegram) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social media)देण्यात येत असलेल्या बेकायदेशीर टिप्सविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मागील आठवड्यात अहमदाबाद आणि मेहसाणा या गुजरातमधील दोन शहरात सेबीने छापे मारले होते, त्यात या नव्या टीमने चांगलीच मदत केली होती. अलीकडच्या काही दिवसात सोशल मीडियावर शेअर खरेदी आणि विक्री यासाठीच्या टिप्स (Share market tips)जोरात दिल्या जात आहेत. हे लोक सेबीचे नोंदणीकृत विश्लेषक नाहीत आणि यांना असे काम करण्याची परवानगी देखील नाही. या लोकांच्या टिप्सला बळी पडून गुंतवणूक करणाऱ्यांना मोठे नुकसाने होते आहे. सेबीने टाकलेले छापे हे टेलीग्रामवर बेकायदेशीर आणि खोट्या टिप्स देण्यासंदर्भात केलेली कारवाई होती. (SEBI set ups a team to take action on social media Apps which gives illegal Share market tips)

छोट्या शहरात पसरते आहे जाळे

समोर आलेल्या माहितीनुसार सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात येणाऱ्या या बेकायदेशीर आणि बनावट टिप्स फक्त मोठ्या शहरांपुरत्याच मर्यादित नाहीत. त्यांच्या कामाचे जाळे छोट्या शहरातदेखील सहजपणे पसरते. कारण सोशल मीडियाद्वारे देशभरातील लोक जोडलेले असतात. देशभरात असे सोशल मीडिया अॅप्स चालवले जात आहेत. जाणकारांच्या मते या प्रकारचे छापे मारण्याचे स्वरुप आणखी मोठे असले पाहिजे जसे ते ईडी किंवा इन्कम टॅक्स विभागाकडून मारले जातात. या प्रकरणांमध्ये डिजिटल पुरावे महत्त्वाचे असतात. त्यासाठी याची खात्री करावी लागले की छापे मारताना लॅपटॉप आणि मोबाइल फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना योग्य प्रक्रियेद्वारे जप्त करण्यात यावे.

नियामक संस्थांकडे नसते माहिती

आता नव्या योजनेअंतर्गत सेबीच्या अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी स्थानिक पोलिसांना सूचना दिल्या जाणार आहेत. शिवाय मोबाइल फोनसारख्या वैयक्तिक संपत्तीच्या प्रकरणात कोणत्याही जप्तीसाठी न्यायालयीन वॉरंटची आवश्यकता असेल. व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्या युजर्सची माहिती नियामक संस्थाना देत नाहीत. त्यामुळे सोशल मीडिया ग्रुप्सबद्दल पुरावे एकत्र करण्याचा एकमेव मार्ग आरोपीचे फोन जप्त करणे आणि हॅंडसेटमधून डेटा मिळवणे हाच आहे. सेबीला २०१४ मध्ये सरकारद्वारे तपासणी आणि जप्तीचा अधिकार देण्यात आला होता. मात्र त्याचा फारच कमी वापर केला जातो.

सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजाराकडे आकर्षित

अलीकडच्या दिवसात भारतीय शेअर बाजाराने सर्वसामान्य गुंतवणुकारांना वेगाने आकर्षित केले आहे. त्यामुळे नवीन डीमॅट खाते सुरू करण्यात मोठी वाढ झाली आहे. अर्थात सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या टिप्स अभ्यासपूर्ण नसतात आणि त्यामुळे गुंतवणुकदार पैसे गमावून बसतात. काही सोशल मीडिया ग्रुप १०,००० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यतची एन्ट्री फी देखील घेतात. यात मेंबरला सांगितले जाते की त्यांना खास टिप्स दिल्या जातील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी