Indian Railways update : मोठी बातमी, ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा मिळणार रेल्वे भाड्यात सवलत! पण नियम बदलणार

IRCTC Update : तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. भारतीय रेल्वे (Indian Railways) लोकांच्या मागणीनुसार ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) पुन्हा एकदा सूट देण्याचा विचार करते आहे. असे झाल्यास पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंसह इतर श्रेणीतील प्रवाशांना सवलतीची तिकिटे मिळू लागतील. ही सूट पूर्ववत न केल्याने रेल्वेला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

Rail Ticket
रेल्वे तिकिटात ज्येष्ठ नागरिकांना सूट 
थोडं पण कामाचं
  • भारतीय रेल्वे (Indian Railways) लोकांच्या मागणीनुसार ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) पुन्हा एकदा सूट देण्याच्या विचारात
  • पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंसह इतर श्रेणीतील प्रवाशांना सवलतीची तिकिटे मिळण्याची चिन्हे
  • तिकिटावरील शिथिलतेसाठी वयाचा निकष बदलला जाऊ शकतो.

Indian Railways Discount on Ticket : नवी दिल्ली : तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. भारतीय रेल्वे (Indian Railways) लोकांच्या मागणीनुसार ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) पुन्हा एकदा सूट देण्याचा विचार करते आहे. असे झाल्यास पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडूंसह इतर श्रेणीतील प्रवाशांना सवलतीची तिकिटे मिळू लागतील. ही सूट पूर्ववत न केल्याने रेल्वेला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. (Senior citizen will get concession on rail ticket once again but railway changes the rule) 

अधिक वाचा : Habits of Successful People : यशस्वी माणसांना ‘या’ सवयी अजिबात नसतात, तुम्हाला असतील तर आत्ताच सोडा

ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा मिळणार भाड्यात सवलत

भारतीय रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिकिटावरील शिथिलतेसाठी वयाचा निकष बदलला जाऊ शकतो. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सरकारने सवलतीच्या भाड्याची सुविधा द्यावी अशी अपेक्षा आहे. ही सुविधा पूर्वी 58 वर्षे वयाच्या आणि 60 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांसाठी होती. वृद्धांसाठीचे अनुदान कायम ठेवून या सवलती देऊन रेल्वेवरील आर्थिक बोजाचे नियोजन करणे हे त्याचे प्रमुख कारण आहे.

अधिक वाचा : Psoriasis : सोरायसिसच्या रुग्णांनी ‘हे’ पदार्थ कधीच खाऊ नयेत, त्रास होईल दुप्पट

पूर्वी सवलत मिळत होती

तुमच्या माहितीसाठी कोविड महामारीपूर्वी म्हणजेच मार्च 2020 च्या आधी, रेल्वेने 58 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना 50% आणि 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना 40% सवलत दिली होती. ही सवलत सर्व वर्गांमध्ये रेल्वेने प्रवास करण्यासाठी उपलब्ध होती. पण कोरोनाच्या कालावधीनंतर गाड्यांची वाहतूक पूर्ववत झाल्यावर ही सुविधा बंद करण्यात आली. रेल्वेच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती.

अधिक वाचा : धक्कादायक ! हॉस्पिटलचे १० लाखाचे बिल न भरल्याने तब्बल १ महिना ठेवले डांबून, अशी झाली सुटका

यावरही रेल्वे करतेय विचार 

आणखी एका पर्यायाचाही रेल्वेकडून विचार सुरू आहे. सर्व गाड्यांमध्ये 'प्रीमियम तत्काळ' योजना सुरू करण्याचा पर्याय आहे. त्यामुळे अधिक महसूल मिळण्यास मदत होईल. त्यामुळे सवलतींचा बोजा उचलण्यास मदत होईल. सध्या ही योजना सुमारे 80 गाड्यांमध्ये लागू आहे. प्रीमियम तत्काळ योजना ही रेल्वेने सुरू केलेला कोटा आहे, ज्यामध्ये डायनॅमिक भाड्यासह काही जागा राखीव आहेत. हा कोटा शेवटच्या क्षणी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या आणि अतिरिक्त खर्च करण्याची तयारी असणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आहे. 

भारतीय रेल्वेने लाखो लोक दररोज प्रवास करत असतात. भारतीय रेल्वे (Indian Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी वेळोवेळी सुविधा देत असते. या अनुषंगाने आता रेल्वे तिकीट बुकिंग (Railway Ticket Booking) प्रणाली अद्ययावत करण्यात गुंतली आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या ऑनलाइन प्रवासी तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी काम करते आहे, जेणेकरून प्रवाशांना तिकीट बुकिंग तसेच प्रवास करण्याची सुविधा मिळू शकेल. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, तिकिट प्रक्रियेचे आधुनिकीकरण करण्यासाठी वेळोवेळी अनेक पावले उचलली आहेत. वास्तविक, अनेक वेळा प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत ऑनलाइन तिकिटाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यावर काम करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी