शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स तब्बल 3079 अंकांनी कोसळला

काम-धंदा
पूजा विचारे
Updated Mar 12, 2020 | 16:07 IST

कोरोना व्हायरसचे गंभीर परिणाम जगभरात दिसत आहे.  मुंबईतही त्याचे पाहायला मिळत आहे. याचा कहर म्हणजे जगभरातील शेअर मार्केटमध्ये दिसतोय.. भारतीय शेअर बाजारात त्याचा मोठा परिणाम दिसत आहे.

share market
शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स तब्बल 3079 अंकांनी कोसळला 

मुंबईः कोरोना व्हायरसचे गंभीर परिणाम जगभरात दिसत आहे.  मुंबईतही त्याचे पाहायला मिळत आहे. याचा कहर म्हणजे जगभरातील शेअर मार्केटमध्ये दिसतोय.. भारतीय शेअर बाजारात त्याचा मोठा परिणाम दिसत आहे. सेन्सेक्स तब्बल 3079.93 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे निर्देशांक 32 हजार 617.47 अंकांपर्यंत कोसळला. बाजाराची सुरुवातच पडझडीने झाली.  बाजारात आज दिवसाची सुरुवात 1700 अंक कोसळून झाली.  तर निफ्टीतही 700 अंकांची घसरण पाहायला मिळाली.

सकाळी 11 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 2500 अंकांनी कोसळला.  बाजार सुरू होताच सेन्सेक्स मोठ्या म्हणजे तब्बल 1600 अंकानी गडगडला. तर दुसरीकडे निफ्टीमध्येही  470 अंकाची घसरण झाली.  पुढे यामध्ये आणखी वाढ होत गेली.  त्याआधी बुधवारी सेन्सेक्स 35,697 आणि निफ्टी 10,458 अंकांवर बंद झाली होती.

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला महारोगराई जाहीर केल्यानंतर जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचं वातावरण पसरलं आहे. अमेरिकेतील बाजाराताही कोरोनाची भीती आहे. कालच्या बाजारात Dow 1460 अंकांनी घसरला होता. Nasdaq आणि S&P 500 ही 5 टक्क्यांपर्यंत घसरला. मार्च 2017 नंतर पहिल्यांदाच निफ्टी 10 हजाराच्या खाली आला आहे. 40 हजारापर्यंत पोहोचलेल्या सेन्सेक्समध्ये 33 हजारापर्यंत घसरण झाली आहे. मोठमोठे शेअर्स धाडकन आपटल्याने बाजार कोसळला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या महिन्याभरासाठी युरोपमधून अमेरिकेत प्रवासबंदी जाहीर केली आहे. त्याचा फटकाही शेअर बाजाराला बसला आहे. भारतीय शेअर मार्केटप्रमाणे अमेरिका मार्केटही 1400 अंकांनी घसरला. यादरम्यान रुपयाही 68 पैशांनी घसरुन त्याचं मूल्य 74.32 रुपये प्रति डॉलर इतकं झालं. दरम्यान, बुधवारी मुंबई शेअर बाजार बंद झाला तेव्हा निर्देशांक, 35,697 एवढा होता.

जागतिक संकेतांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीची आज मोठ्या घसरणीने सुरुवात झाली. मिड आणि स्मॉलकॅप शेअर्समध्य़े विक्रीही पाहायला मिळात आहे. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 2.27 टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांक 1.16 टक्क्यांनी घसरला आहे. तेल-गॅस समभागातही आज मोठी घसरण दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी