Sensex Crash: नवी दिल्ली : शेअर बाजारात (share market) आज गुंतवणुकदारांचे चेहरे चिंतेने काळवटले आहेत. आज सोमवारी (२० डिसेंबर) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स (sensex) १७०० पेक्षा जास्त अंशांनी घसरला आहे. सकाळच्या सत्रात बाजार सुरू होताच सेन्सेक्स १,००० अंशांनी खाली आला. निफ्टीमध्येही (nifty)२.५ टक्क्यांची घसरण झाली. मागील काही आठवड्यांपासून शेअर बाजारात चढ उतार सुरूच होते. त्यातच आता काही दिवसांपासून जगभरात ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असलेल्या अनेक देशात चिंता व्यक्त होते आहे. या घटकांचा जागतिक वित्तीय बाजारात नकारात्मक परिणाम झाला आहे. (Share Market : Sensex crashes by 1700 points amid of Omicron spread across world)
शेअर बाजारातील पडझडीत सेन्सेक्स १,७०० अंशांनी कोसळल्यानंतर त्यात थोडीशी सुधारणा होत घसरण १,४९५ अंशावर आली आहे. सेन्सेक्स ५५,५१६ अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टीमध्ये ४४४ अंशांची घसरण होत निफ्टी १६,५४० अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक गडगडल्यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकदारांची तारांबळ उडाली.
मागील काही दिवसांपासून जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारावरदेखील ओमायक्रॉन, महागाई, अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण, व्याजदर, कच्च्या तेलाच्या किंमती या सर्वांचा दबाव होताच. यातून शेअर बाजारात चढ उतार होत होते. मागील वर्षभरात सेन्सेक्स आणि निफ्टी उच्चांकी पातळी गाठून मागे फिरले आहेत. सकाळी बाजार उघडल्याबरोबर सेन्सेक्स आणि निफ्टीवर दबाव येत घसरण होण्यास सुरूवात झाली.
मागील महिनाभरात परकी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसा काढून घेतला आहे. मात्र देशांतर्गत गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असल्यामुळे बाजार सावरलेला होता. मात्र जागतिक शेअर बाजारातील घसरगुंडीचा दबाव भारतीय शेअर बाजारावरदेखील निर्माण झाला आहे. आशियाई शेअर बाजार अमेरिकन शेअर बाजाराप्रमाणे वाटचाल करत असतो. ओमायक्रॉनसंदर्भातील ताज्या घडामोडी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या सावधगिरीच्या धोरणामुळे अमेरिकन शेअर बाजार घसरला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या शेअर बाजारातदेखील घसरण झाली आहे. जपान आणि शांघाय शेअर बाजारदेखील खाली येत व्यवहार करतो आहे. जगभरातील वित्तीय बाजारात यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेअर बाजाराचे आकर्षण छोट्या गुंतवणुकदारांना भुरळ घालते आहे. शेअर बाजारात सध्या चढ उतार सुरू आहेत. जागतिक शेअर बाजारावर जागतिक घटकांचा परिणाम होतो आहे. अर्थात बाजारातील घसरणीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आपल्या विक्रमी पातळीवरून खाली आले आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज वाढ झाली आहे. या वर्षभरात शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी नोंदवली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. अर्थात शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.