ऐतिहासिक तेजी... Sensex ने पहिल्यांदाच 50,000 चा आकडा गाठला, सर्व रेकॉर्ड मोडले 

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Jan 21, 2021 | 11:40 IST

Sensex Today, Share Market: भारतीय शेअर बाजाराने आज एक ऐतिहासिक आकडा पार केला आहे.  सेन्सेक्सने प्रथमच ५० हजाराचा आकडा गाठला आहे.

Share Market
ऐतिहासिक तेजी... Sensex ने पहिल्यांदाच 50,000 चा आकडा गाठला, सर्व रेकॉर्ड मोडले   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुरुवारी शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी दिसून आली
  • बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्सने प्रथमच 50 हजारांचा टप्पा ओलांडला
  • शेअर बाजार बुधवारी ग्रीन मार्क वर बंद झाला होता

मुंबईः अमेरिकेतील नवीन सरकारकडून नव्या मदत उपायांच्या आशेने जागतिक बाजारपेठेत तेजी आली आहे. ज्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. त्यामुळे आज (गुरुवार) सेन्सेक्सने 50 हजारांचा ऐतिहासिक आकडा पार करत सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सकाळच्या सत्रातच सेन्सेक्स 50079.50 वर तर निफ्टी 14729.30 वर होता. यापूर्वी बुधवारी बीएसईचा ३० शेअरचा निर्देशांक सेन्सेक्स ३९३.८३ अंकांनी म्हणजेच ०.८० टक्क्यांनी वधारत ४९.७९२.१२ अंकांनी नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला होता.

ऐतिहासिक बेंचमार्क

एप्रिल १९७९ मध्ये १०० अंकांनी सुरुवात करणाऱ्या सेन्सेक्सने गुरुवारी पहिल्यांदाच ५०,००० अंकांच्या पुढे मजल मारली आहे. याच्या स्थानेच्या ४३ वर्षानंतर बेंचमार्कने १५.५ टक्के वार्षिक रिटर्न दिलं आहे. 
याव्यतिरिक्त जागतिक बाजारपेठांमध्ये देखील तेजी आली आहे. आज माहिती तंत्रज्ञान (आयटी), ऊर्जा आणि वाहन कंपन्यांनी मजबुती मिळविल्यामुळे देशांतर्गत शेअर बाजाराने नवीन विक्रम गाठला. व्होल्टास, अपोलो टायर, हीरो मोटर, आयसीआयआय बँक, इंडिगो, इंडस बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे.

चांगले निकाल मिळेल अशी आशा आहे

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी पीटीआयला सांगितले की, ऑटो, आयटी आणि सरकारी बँकांच्या खरेदीमुळे आणि जागतिक बाजारपेठेत आशावादी राहिल्याने भारतीय बाजाराला नवीन उंची गाठण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत तिसर्‍या तिमाहीचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला लागला आहे. यामुळे विविध क्षेत्रात खरेदी करण्यास समर्थन मिळालं. बायडेन यांनी शपथ घेण्यापूर्वी अमेरिकेचा बाजार सकारात्मक दृष्टीने पुढे जात आहे आणि नवीन मदत उपायांची अपेक्षा केली जात आहे.' 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी