September Bank Holiday : मुंबई : ऑगस्ट महिना संपत आहे आणि लवकरच सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. सप्टेंबर महिन्यात १८ दिवस बँक हॉलिडे असणार आहे. या महिन्यात सुट्ट्यांची यादी मोठी आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार रविवारी आणि दुसर्या व चौथ्या शनिवारी अशा मिळून सप्टेंबर महिन्यात १३ दिवस बँका बंद असणार आहे. (September month 13 days bank holiday bank will closed for 13 days see list read in marathi)
सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थी आणि नवरात्रला बँकांना सुटी असणार आहे. तसेच दुसर्या आणि चौथ्या शनिवारीही आणि रविवारी बँका बंद असणार आहे. या सर्व सुट्या मोजल्यास एकूण १३ दिवस बँका बंद असणार आहे. जर तुमचे बँकेत काही काम असेल तर आताच उरकून घ्या. तसेच बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी पाहून घ्या.
राज्या आणि शहरांच्या वेगवेगळ्या बँका असतात. अनेक राज्यांती सण उत्सवांवर त्या त्या बँकांमध्ये बँक हॉलिडे ठरत असतात. या सण आणि उत्सवांच्या काळात जरी बँका बंद असल्या तरी तुम्ही ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तुमची बँकेची कामे करू शकता.