एअर इंडियाच्या मुलाखतीसाठी इंडिगोचे अनेक कर्मचारी पडले आजारी; इंडिगोच्या 55 टक्के विमानांना विलंब

काम-धंदा
भरत जाधव
Updated Jul 04, 2022 | 08:06 IST

इंडिगो विमाना प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शनिवारी मोठा त्रास सहन करावा लागला. केबिन क्रू स्टाफच्या अनेकांनी वैद्यकीय रजा घेतली होती. परंतु आजारी कोणी नसून हे सर्वजण एअर इंडियाच्या मुलाखतीसाठी गेले होते.

Several Indigo employees on leave for Air India interviews
आजारी आहेत म्हणून गेले अन् एअर इंडियाच्या मुलाखतीसाठी आले  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  इंडिगो विमाना प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शनिवारी मोठा त्रास सहन करावा लागला. केबिन क्रू स्टाफच्या अनेकांनी वैद्यकीय रजा घेतली होती. परंतु आजारी कोणी नसून हे सर्वजण एअर इंडियाच्या मुलाखतीसाठी गेले होते. शनिवारी एअर इंडियाची ही मुलाखत होती या मुलाखतीसाठी इंडिगोचे अनेक कर्मचारी गेल्यामुळे  इंडिगो’च्या ५५% विमानांना शनिवारी विलंब झाला. दरम्यान इंडिगो रोज देशांतर्गत-आंतरराष्ट्रीय अशी एकूण १,६०० विमाने ऑपरेट करते.

हवाई वाहतूक मंत्रालयानुसार, शनिवारी इंडिगोची ४५.२% विमानेच तर एअर इंडियाची ७७.१%, स्पाइसजेटची ८०.४%, विस्ताराची ८६.३%, गो फर्स्टची ८८% आणि एअर आशिया इंडियाची ९२.३% विमानेच वेळापत्रकानुसार संचालित झाली. एअर इंडियाचे २७ जानेवारीला टाटा समूहाकडे औपचारिक हस्तांतरण झाले होते.

नवीन विमाने खरेदी करण्याची आणि सेवेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची योजना कंपनी तयार करत आहे. याच संदर्भात कंपनीने केबिन क्रूच्या भरतीची मोहीम सुरू केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी