Sovereign Gold Bond| स्वस्तात सोन्यातील गुंतवणुकीची संधी, मिळवा व्याजदेखील, २९ नोव्हेंबरपासून

Sovereign Gold Bond | सोन्याच्या बाजारभावाबरोबरच वाढणारी गुंतवणूक आणि त्याव्यतिरिक्त मिळणारे २.५ टक्के व्याज हे सोव्हेरन गोल्ड बॉंडचे वैशिष्ट्य आहे. सोव्हेरन गोल्ड बॉंड हे आरबीआय किंवा अर्थमंत्रालयाकडून बाजारात आणले जातात. सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये किमान १ ग्रॅमपासून गुंतवणूक करता येते. तर यामध्ये कमाल ४ किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. अर्थात ही गुंतवणूक केल्यावर प्रत्यक्ष सोने मिळत नाही तर सर्टिफिकेटच्या स्वरुपात ही गुंतवणूक केली जाते.

Sovereign Gold Bond
सोव्हेरन गोल्ड बॉंड 
थोडं पण कामाचं
  • सोव्हेरन गोल्ड बॉंडची नवी सेरिज गुंतवणुकीसाठी २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत खुली राहणार
  • सोन्याचा भाव (Gold price)४,७९१ रुपये प्रति ग्रॅम
  • डिजिटल पेमेंट करणाऱ्या गुंतवणुकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट

Sovereign Gold Bond | नवी दिल्ली : सोव्हेरन गोल्ड बॉंडची (Sovereign Gold Bond) नवी सेरिज २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान बाजारात उपलब्ध होते आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) सोव्हरेन गोल्ड बॉंड बाजारात आणत असते.  या सेरिजसाठी सरकारने सोन्याचा भाव (Gold price)४,७९१ रुपये प्रति ग्रॅम इतका निश्चित केला आहे. रिझर्व्ह बॅंकेने यासंदर्भातील माहिती दिली आहे.  सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये डिजिटल स्वरुपातदेखील पेमेंट करता येते. डिजिटल पेमेंट करणाऱ्या गुंतवणुकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट मिळते. सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक (Gold Investment) समजली जाते.  सोन्याच्या भावात मागील काही कालावधीत चढउतार होत असले तरी दीर्घ कालावधीची सोव्हेरेन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक ही नेहमी फायद्याची ठरते. (Sovereign Gold Bond : SGB will be available for investment between 29th November and 3rd December 2021)

सोव्हेरन गोल्ड बॉंड म्हणजे काय? (Sovereign Gold Bond)

सोन्याच्या बाजारभावाबरोबरच वाढणारी गुंतवणूक आणि त्याव्यतिरिक्त मिळणारे  २.५ टक्के व्याज हे सोव्हेरन गोल्ड बॉंडचे वैशिष्ट्य आहे.  सोव्हेरन गोल्ड बॉंड  हे आरबीआय किंवा अर्थमंत्रालयाकडून बाजारात आणले जातात. सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये किमान १ ग्रॅमपासून गुंतवणूक करता येते. तर यामध्ये कमाल ४ किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. अर्थात ही गुंतवणूक केल्यावर प्रत्यक्ष सोने मिळत नाही तर सर्टिफिकेटच्या स्वरुपात ही गुंतवणूक केली जाते. सरकारने निश्चित केलेल्या सोन्याच्या भावाप्रमाणे गुंतवणूक करायची असते आणि आठ वर्षानंतर (यामध्ये ५ वर्षांचा लॉकइन कालावधी असतो) त्यावेळेस असलेल्या सोन्याच्या भावाप्रमाणे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य किंवा रक्कम तुम्हाला दिली जाते.  सोव्हेरन गोल्ड बॉंडचा गुंतवणूक कालावधी आठ वर्षांचा असतो. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने १० ग्रॅम सोन्याच्या मूल्याएवढी गुंतवणूक आज केली तर ८ वर्षांनी १० ग्रॅम सोन्याच्या जो काही भाव असेल तितकी रक्कम त्या गुंतवणुकदारास मिळेल. याशिवाय दरवर्षी २.५ टक्के इतके व्याजदेखील तुम्हाला सरकारकडून दिले जाते. त्यामुळेच सोन्याचे मूल्य अधिक व्याज लक्षात घेता आठ वर्षांनंतर तुमच्या हाती घवघवीत परतावा आलेला असतो. सोव्हेरन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक ही अतिशय उत्तम गुंतवणूक समजली जाते.

सोव्हेरन गोल्ड बॉंडचे फायदे आणि वैशिष्ट्ये-

  1. सोव्हेरन गोल्ड बॉंड हे व्याज सहामाही स्वरुपात दिले जाते. ही गुंतवणूक आठ वर्षांसाठी असते.
  2. सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर २.५ टक्के वार्षिक व्याज सरकारकडून दिले जाते. 
  3. सोव्हेरन गोल्ड बॉंडवर मिळणारे व्याज हे प्राप्तिकर नियम १९६१ नुसार करपात्र असते. मात्र सोव्हेरन गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक काढल्यावर मिळणाऱ्या उत्पन्नात करवजावट मिळते. 
  4. सोन्यातील गुंतवणूक आणि तीदेखील सरकारच्या बॉंडमधील यामुळे सोव्हेरन गोल्ड बॉंड ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक समजली जातेचे मात्र त्याचबरोबर यात व्याजदेखील मिळत असल्याने गुंतवणुकीचा कालावधी संपल्यावर घवघवीत परतावादेखील मिळतो.
  5. या गुंतवणुकीतील आणखी एक फायदा म्हणजे सोव्हेरन गोल्ड बॉंड तारण ठेवून कर्जदेखील मिळते. कर्जाचे सोन्याच्या मूल्याशी असलेले गुणोत्तर हे रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी सोन्यावर दिल्या जाणाऱ्या कर्जासाठीच्या सूचनांप्रमाणे ठरवले जाते. 
  6. सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक कशी कराल
  7. सोव्हेरन गोल्ड बॉंडची विक्री शेड्युल्ड कमर्शियल बॅंक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पोस्ट ऑफिस, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मुंबई स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी केली जाते. यापैकी कोणत्याही एका ठिकाणी प्रत्यक्ष शाखेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सोव्हेरन गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक करू शकता. 

सोव्हरेन गोल्ड बॉंडमधील वाढती गुंतवणूक

२०१५ मध्ये सुरू झालेल्या सोव्हेरन गोल्ड बॉंड योजनेत मार्च २०२१ पर्यत एकूण २५,७०२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. २०२०-२१ या वर्षात रिझर्व्ह बॅंकेने सोव्हेरन गोल्ड बॉंडच्या एकूण १२ सेरिज बाजारात आणल्या होत्या आणि त्यातून १६,०४९ कोटी रुपयांची गुंतवणूक (३२.३५ टन सोने) झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी