Shaktikanta Das | केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पुढील ३ वर्षे आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांता दास

Shaktikanta Das | शक्तिकांता दास यांना पुढील ३ वर्षांसाठी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी (RBI Governor)नियुक्त करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गुरूवारी रात्री या निर्णयाला मंजूरी दिली आहे.

RBI Governor Shaktikanta Das
रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास 
थोडं पण कामाचं
  • पुढील ३ वर्षांसाठी शक्तिकांता दास आरबीआयच्या गव्हर्नरपदी राहणार
  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीचा महत्त्वाचा निर्णय
  • शक्तिकांता दास डिसेंबर २०२४ ते गव्हर्नरपदी कार्यरत राहतील

Shaktikanta Das | नवी दिल्ली: रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास (RBI Governor Shaktikanta Das) यांच्यासंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने शक्तिकांता दास यांचा कार्यकाल वाढवण्याचा (re-appointment of the RBI Governor)निर्णय घेतला आहे. दास यांना पुढील ३ वर्षांसाठी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी (RBI Governor)नियुक्त करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गुरूवारी रात्री या निर्णयाला मंजूरी दिली आहे. आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती होण्याआधी शक्तिकांता दास हे अर्थ मंत्रालयात आर्थिक विषयाचे सचिव होते. त्यांना ११ डिसेंबर २०१८ ला तीन वर्षांसाठी आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्त करण्यात आले होते. (Shaktikanta Das: Central government re-appoints Shaktikanta Das as RBI Governor for 3 years)

शक्तिकांता दास यांची कारकिर्द

शक्तिकांता दास यांना विविध क्षेत्रांमधील प्रशासकीय कामकाजाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी वित्त, कर, उद्योग इत्यादी क्षेत्रांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांचे शिक्षण दिल्ली विद्यापीठात झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयात त्यांना प्रदीर्घ काळ काम केले आहे. ८ केंद्रीय अर्थसंकल्पाशी शक्तिकांता दास यांचा थेट संबंध आला होता. पी चिदंबरम अर्थमंत्री असताना २००८ पहिल्यांदा दास यांना संयुक्त सचिव म्हणून नेमण्यात आले होते. शक्तिकांता दास यांनी जागतिक बॅंक, आशियाई विकास बॅंक, न्यू डेव्हलपमेंट बॅंक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बॅंकेत भारताचे पर्यायी गव्हर्नर म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी आयएमएफ, जी२०, ब्रिक्स, सार्क यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ते वित्त आयोगाचेदेखील सदस्य होते. 

आरबीआयच्या गव्हर्नरचा कार्यकाल कोण ठरवतो

आरबीआय अॅक्टनुसार केंद्र सरकारला आरबीआय गव्हर्नरचा कार्यकाल निश्चित करण्याचा अधिकार असतो. मात्र आरबीआय गव्हर्नरचा कार्यकाल पाच वर्षांपेक्षा अधिक असू शकत नाही. मात्र सरकारची इच्छा असल्यास लागोपाठ दुसऱ्यांदा आरबीआय गव्हर्नरपदी त्याच व्यक्तीची नियुक्ती केली जाऊ शकते. अलीकडच्या काळात फक्त एस वेंकटरमण आणि रघुराम राजन हे दोन गव्हर्नर होते ज्यांचा कार्यकाल तुलनेने छोटा होता. शक्तिकांता दास यांचा कार्यकाल तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला असून डिसेंबर २०२४ ते गव्हर्नरपदी कार्यरत राहतील. त्यांच्या पुनर्नियुक्तीचा आदेश १० डिसेंबरपासून लागू होणार आहे.

शक्तिकांता दास मूळचे ओडिशाचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९५७ ला भुवनेश्वर येथे झाला होता. ते १९८०च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. 

दरम्यान रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) मूळ ठेवीदार किंवा डिपॉझिटरचा किंवा गुंतवणुकदाराचा (Original Depositor) मृत्यू झाल्यास लॉक इन पीरियडच्या आधी गोल्ड मोनेटायझेशन स्कीम (Gold Monetization Scheme)अंतर्गत मुदतीपूर्वीच गुंतवणूक किंवा पैसे काढून घेण्यास परवानगी दिली आहे. गुंतवणुकदार मृत झाल्यानंतर त्याने केलेल्या गुंतवणुकीसंदर्भात अनेकवेळा तांत्रिक अडचणी निर्माण होतात. या प्रकाराला अधिक सुलभ करण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलेले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी