Share Market: भारतात येणार तब्बल ३०,००० कोटींची परदेशी गुंतवणूक, 'या' शेअर्सला होणार फायदा

FII in Indian share market: भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढणार असून त्याचा फायदा हा भारतातील शेअर्सला मोठ्या प्रमाणात होणार आहे. 

share market trading
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊन नंतर आता भारतीय शेअर बाजारात तेजी पहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे भारतीय बाजारात मोठी परदेशी गुंतवणूक येणार आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, भारतीय बाजारात गुंतवणुकदारांना कमाईची चांगली संधी निर्माण होऊ शकते. मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया यांच्या मते, इंडेक्समध्ये भारताचा वाटा हा ८.२५ टक्क्यांवरुन ९.२५ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

चंदन तापडिया यांच्या मते, एमएससीआयमधील बदलांमुळे भारतीय बाजारात जवळपास ४ अब्ज डॉलर्स म्हणजेच २९,४८१ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक भारतीय बाजारात येण्याची शक्यता आहे. हे पैसे कुठल्या शेअर्समध्ये जाण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा कसा होईल हे पाहूयात...

 1. कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) - अंदाजित गुंतवणूक ५,०७९ कोटी रुपये
  टेक्निकल व्ह्यू: या शेअरने १,५०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आता हा शेअर आधी १,६७५ रुपये आणि नंतर १,७४० रुपयांच्या दिशेने वाटलाच करु शकतो.
 2. बजाज फायनान्स (Bajaj Finance) - अंदाजित गुंतवणूक १,२२३ कोटी रुपये 
  टेक्निकल व्ह्यू: हा शेअर ३,३७० रुपयांवर पोहोचला आहे. पुढे हा शेअर ३,७५० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
 3. एशियन पेंट्स (Asian Paints) - अंदाजित गुंतवणूक - १,२०९ कोटी रुपये 
  टेक्निकल व्ह्यू: हा शेअर गेल्या आठ वर्षांपासून गुंतवणुकदारांना खूपच चांगला परतावा देत आहे. हा शेअर २,६०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. 
 4. नेस्ले इंडिया (Nestle India) - अंदाजित गुंतवणूक - १,०४२ कोटी रुपये
  टेक्निकल व्ह्यू: एफएमसीजी शेअर्समध्ये खूपच तेजी आणि मजबूत स्थिती दिसून येत आहे. नेस्लेचा शेअर १६,५०० रुपयांचा टप्पा ओलांडल्यावर आता १८,५०० रुपयांपपर्यंत पोहोचू शकतो.
 5. एमआरएफ (MRF) - अंदाजित गुंतवणूक - ९७२ कोटी रुपये 
  टेक्निकल व्ह्यू: या शेअरमध्ये व्हॉल्यूम खूपच कमी असतो. या शेअरने ६७,७०० रुपयांचा टप्पा ओलांडल्यावर ७३,५०० रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 6. अशोक लेलँड (Ashok Leyland) - अंदाजित गुंतवणूक - ७६० कोटी रुपये 
  टेक्निकल व्ह्यू: या शेअरमध्ये सलग तेजी पहायला मिळत आहे. गुंतवणुकदार या शेअरमध्ये ७३ रुपयांच्या भावावर गुंतवणूक वाढवत आहेत. त्यानंतर ८८ रुपये आणि मग ९५ रुपयांचा टप्पा ओलांडताना पहायला मिळण्याची शक्यता आहे. 
 7. मुथ्थूट फायनान्स (Muthoot Finance) - अंदाजित गुंतवणूक ७५१ कोटी रुपये 
  टेक्निकल व्ह्यू: या गोल्ड फायनान्स कंपनीला सलग सपोर्टची आवश्यकता भासत आहे. १,१५० रुपयांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे. तर वरच्या बाजूला १,३५० कोटी रुपांपर्यंत हा शेअर पोहोचू शकतो. 
 8. एसीसी (ACC) - अंदाजित गुंतवणूक - ६८३ रुपये 
  टेक्निकल व्ह्यू: या सीमेंट कंपनीचा सपोर्ट स्तर १,५७५ रुपये इतका आहे. तर हा शेअर १,८५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 
 9. इप्का लॅब्स (IPCA Labs) - अंदाजित गुंतवणूक - ६२१ कोटी रुपये 
  टेक्निकल व्ह्यू: या शेअरमध्ये यंदाच्या वर्षी १०० टक्के तेजी पहायला मिळाली आहे. तसेच पुढील काळातही ही तेजी कायम पहायला मिळण्याची शक्यता आहे. या शेअरची सपोर्ट लेव्हल २,१०० रुपये इतकी आहे आणि हा शेअर २,७०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 
 10. या शेअर्समध्येही गुंतवणुकीची शक्यता
  मोतीलाल ओसवालच्या मते, एलअँडटी इन्फोटेक कंपनीत ८२७ कोटी रुपये, एसबीआय कार्डमध्ये ७३६ कोटी रुपये, कॅडिल ६७८ कोटी रुपये, लार्सन अँड टुब्रो १,२१७ कोटी रुपये आणि ब्रिटानियामध्ये १,०६१ कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. 

(Disclaimer: हे वृत्त केवळ तुमच्या माहितीसाठी आहे. या वृत्तानुसार शेअर खरेदी/विक्री करण्याचा आम्ही सल्ला देत नाहीत. या किंवा इतर कुठल्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तसेच शेअर्सची खरेदी/विक्री करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचे मार्गदर्शन घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी