शेअर बाजार विक्रमी पातळीवर, मात्र परकी गुंतवणुदारांनी ऑक्टोबरमध्ये बाजारातून काढले १,५०० कोटी

सप्टेंबर महिन्यात परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी बॉंड मार्केटमध्ये १३,३६३ कोटी रुपयांची आणि ऑगस्ट महिन्यात १४,३७६.२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ऑक्टोबर महिन्यात परकी गुंतवणुकदारांनी आतापर्यत १,६९८ कोटी रुपयांची गुंतवणूक बॉंड मार्केटमधून काढली आहे.

FPI investment in Share market
परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांचा कल 
थोडं पण कामाचं
  • भारतीय शेअर बाजार (Share Market) विक्रमी पातळीवर
  • मागील दोन महिन्यात परकी गुंतवणुकदार म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इनव्हेस्टर्सने भारतीय शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली
  • ऑक्टोबरमध्ये परकी गुंतवणुकदारांनी आतापर्यत भारतीय शेअर बाजारातून १,४७२ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली

मुंबई: भारतीय शेअर बाजार (Share Market) विक्रमी पातळीवर पोचला आहे. अशा परिस्थितीत परकी गुंतवणुकदार मात्र बाजारातून पैसा काढून घेताना दिसत आहेत. मागील दोन महिन्यात परकी गुंतवणुकदार म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इनव्हेस्टर्सने भारतीय शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली होती. जाणकारांच्या मते रुपयामधील घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घटक यामुळे परकी गुंतवणुकदार पैसा काढून घेत आहेत. या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स (Sensex) ६१,३०६ अंशावर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी (Nifty) १८,३३८ अंशांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला. शेवटच्या सत्रात सेन्सेक्सने नवा विक्रम नोंदवला आणि तो पहिल्यांदात ६१,००० अंशांच्या पलीकडे पोचला आणि बंदही झाला. (Despite of Indian Share market at record level, FPI are withdrawing money)

ऑक्टोबरमध्ये बदलला ट्रेंड

समोर आलेल्या आकडेवारीनुसार चालू महिन्यात परकी गुंतवणुकदारांनी आतापर्यत भारतीय शेअर बाजारातून १,४७२ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. डेट मार्केट किंवा बॉंड मार्केट संदर्भात परकी गुंतवणुकदारांचे धोरण बदलले आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी बॉंड मार्केटमध्ये १३,३६३ कोटी रुपयांची आणि ऑगस्ट महिन्यात १४,३७६.२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ऑक्टोबर महिन्यात परकी गुंतवणुकदारांनी आतापर्यत १,६९८ कोटी रुपयांची गुंतवणूक बॉंड मार्केटमधून काढली आहे.

परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदार

जाणकारांच्या मते परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांच्या धोरणात झालेला बदल हा ऑक्टोबरमध्ये रुपयांत झालेल्या घसरणीमुळे झाला आहे. अर्थात परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांनी २२६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदार बॅंकिंग शेअरची विक्री करत होते. तर दुसऱ्या पंधरवड्यात त्यांनी खरेदी केली. सप्टेंबरच्या पूर्ण महिन्यात त्यांनी सॉफ्टवेअर सेवा पुरवणाऱ्या म्हणजे आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची विक्री केली. म्हणजे आयटी कंपन्यांमधून गुंतवणूक काढून घेतली. विप्रो, इन्फोसिस आणि माइंडट्रीसारख्या कंपन्यांच्या दमदार कामगिरीमुळे आगामी काळात परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदार आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
परकी गुंतवणुकदार सध्या बाजार उच्चांकीवर पोचल्यामुळे सावध भूमिका घेत आहेत. बाजारातील अभूतपूर्व तेजीमुळे सध्या शेअर्सच्या किंमती चांगल्याच वधारलेल्या आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत परकी पोर्टफोलिओ गुंतवणुकदार परिस्थितीवर लक्ष ठेवत वाट पाहण्याचे धोरण अवलंबत आहेत.

शेअर बाजारातील गुंतवणूक

मुंबई शेअर बाजाराचा निर्देंशाक असलेला सेन्सेक्सने मागील काही महिन्यात अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सध्या शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर पोचले असून त्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअरच्या किंमती वाढल्या आहेत. शेअर बाजारातील ही तेजी कल्पनेपलीकडची आहे. चढ आणि उतार हे शेअर बाजाराचे अविभाज्य घटक आहेत.  या तेजीवर आरुढ होताना गुंतवणुकदारांनी सतर्क राहण्याचीही आवश्यकता आहे. शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे जोखमीचे ठरेल. सध्या सेन्सेक्स ६१,००० अंशांच्या पातळीवर पोचला आहे. ही सेन्सेक्सची आतापर्यतची उच्चांकी पातळी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी