Share Market IPO | कमाईची मोठी संधी! नोव्हेंबरमध्ये शेअर बाजारात फुटणार IPO चे फटाके, पाच कंपन्यांचे २७,००० कोटींचे आयपीओ

Share Market IPO | नोव्हेंबर महिन्यात शेअर बाजारात (Share Market) अनेक कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आयपीओची धूम असणार आहे. गुंतवणुकदारांना या आयपीओद्वारे कमाईची मोठी संधी मिळणार आहे. आयपीओ ही गुंतवणूक (IPO Investment) करण्याची चांगली संधी असते.

IPO Boom in Share Market
शेअर बाजारात आयपीओची धूम 
थोडं पण कामाचं
  • दिवाळीनंतर शेअर बाजारात आयपीओची धूम
  • गुंतवणुकदारांना या आयपीओद्वारे कमाईची मोठी संधी मिळणार
  • नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात जवळपास २७,००० कोटी रुपयांचे ५ आयपीओ येणार

IPO | मुंबई: शेअर बाजारात दिवाळीनंतर मोठी दिवाळी (Diwali) होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात शेअर बाजारात (Share Market) अनेक कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आयपीओची धूम असणार आहे. गुंतवणुकदारांना या आयपीओद्वारे कमाईची मोठी संधी मिळणार आहे. आयपीओ ही गुंतवणूक (IPO Investment) करण्याची चांगली संधी असते. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात जवळपास २७,००० कोटी रुपयांचे ५ आयपीओ येणार आहेत. यामध्ये पेटीएम म्हणजे वन९७ कम्युनिकेशन्सचा आयपीओ (Paytm IPO), पॉलिसीबाजारच्या प्रवर्तक कंपनीचा पीबी फिनेटकचा आयपीओ (Policybazaar IPO), सफायर फूड्सचा आयपीओ (Sapphire Foods IPO), एसजेएस एंटरप्राईझेसचा आयपीओ (SJS Enterprises IPO) आणि सिगाची इंडस्ट्रीजचा आयपीओ (Sigachi Industries IPO) असणार आहे. (Share Market: In November, there will huge boom of IPO worth Rs 27,000 crore) 

शेअर बाजारात आयपीओद्वारे पैशांचा पाऊस

यात पेटीएमचा आयपीओ १८,३०० कोटी रुपयांचा असणार आहे तर पॉलिसीबाजारचा आयपीओ ५,७१० कोटी रुपयांचा असणार आहे. पेटीएमचा आयपीओ हा देशातील आतापर्यतचा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. यावर्षी म्हणजे २०२१ मध्ये आतापर्यत एकूण ६६,९१५ कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी करणारे ४१ आयपीओ आले आहेत. असे मानण्यात येते आहे की यावर्षाच्या अखेरीपर्यत आयपीओद्वारे उभारण्यात आलेली एकूण रक्कम १ लाख कोटी रुपयांवर पोचलेली असेल. २०२० मध्ये एकूण १५ कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले होते. त्यांचे एकूण मूल्य २६,६११ कोटी रुपये होते. यामध्ये २०१७ मध्ये आयपीओचा बाजार तेजीत होता. त्यावर्षी ३६ आयपीओ बाजारात आले होते. या कंपन्यांनी एकूण ६७,१४७ कोटी रुपये बाजारातून उभारले होते.

Nykaa IPO चा आयपीओ १ नोव्हेंबरपर्यत

सध्या नायका या वेलनेस उत्पादनांचा व्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर करणाऱ्या कंपनीचा आयपीओ बाजारात खुला आहे. १ नोव्हेंबर ही त्याची शेवटची तारीख आहे. तर फिनो पेमेंट्स बॅंकेचा आयपीओदेखील खुला असून त्याची अंतिम मुदत २ नोव्हेंबर ही आहे. नायकाचा आयपीओ ५,३५२ कोटी रुपयांचा आहे, तर फिनो पेमेंट्स बॅंकेचा आयपीओ १,२०० कोटी रुपयांचा आहे. येऊ घातलेले ५ आयपीओ आणि सध्या सुरू असलेले दोन आयपीओ एकूण मिळून ३३,५०० कोटी रुपयांचे भांडवल उभारतील अशी चिन्हे आहेत. याआधी २९ सप्टेंबरला आदित्य बिर्ला एएमसीचा २,७७८ कोटी रुपयांचा आयपीओ शेअर बाजारात आला होता.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देंशाक असलेला सेन्सेक्स शुक्रवारी दिवसअखेर ६७० पेक्षा जास्त अंशाची घसरण नोंदवत ५९,३०६.९३ अंशांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी १८५ अंशांची घसरण नोंदवत १७,६७१.६५अंशांच्या पातळीवर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांना आज घसरण झाली. मात्र शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. याच तेजीचा फायदा घेण्यासाठी अनेक कंपन्या शेअर बाजारात आपला आयपीओ घेऊन येत आहेत. त्यामुळे त्यांना मोठे भांडवल उभारण्याची संधी मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी