Multibagger stock | फक्त २.९५ रुपयांच्या या आयटी कंपनीच्या शेअरने दिला २,३९३ टक्क्यांचा तुफान परतावा

Multibagger stock | सध्या ३ आय इन्फोटेक लि. चा शेअर ७३.५५ रुपयांच्या (Share price of 3i Infotech Ltd) पातळीवर व्यवहार करतो आहे. फक्त वर्षांपूर्वी म्हणजे ६ नोव्हेंबर २०२०ला ३ आय इन्फोटेक लि.च्या शेअरची किंमत २.९५ रुपये प्रति शेअर इतकी होती. इतक्या कमी किंमतीत मिळणाऱ्या या आयटी शेअरने एका वर्षात जवळपास २,३९३ टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे.

Multibagger Stock of 3i Infotech Ltd
आयटी कंपनीचा तुफान शेअर 
थोडं पण कामाचं
  • आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये तुफान तेजी
  • ३ आय इन्फोटेक लि.ने १२ महिन्यात दिला २,३९३ टक्क्यांचा परतावा
  • या शेअरमधील एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले २४ लाख रुपये

Multibagger stock | मुंबई: शेअर बाजार (Share Market) विक्रमी पातळीवर व्यवहार करतो आहे. मागील वर्षभरात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex)आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीने (Nifty) तुफान घोडदौड केली आहे. हे दोन्ही निर्देशांक त्यांच्या आजपर्यतच्या उच्चांकीवर पोचले आहेत. या तुफान तेजीत अनेक कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. मात्र मागील वर्षभरातील या जबरदस्त तेजीमध्ये ज्या काही क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सनी मोठी तेजी दाखवली आहे त्यात आयटी क्षेत्र आहे. आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये तुफान तेजी आलेली आहे. कोरोनाच्या संकटात आयटी कंपन्यांच्या (IT Company) सेवांना मोठी मागणी आल्याने या कंपन्यांचा महसूल आणि नफा देखील वाढला आहे. शेअर बाजाराच्या तेजीने मागील एक-दीड वर्षाच्या कालावधीत काही शेअर्सना मल्टीबॅगर शेअर्स करत त्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना श्रीमंत (Wealth creation)बनवले आहे. असा एक मल्टीबॅगर शेअर आहे, ३ आय इन्फोटेक लि. (3i Infotech Ltd) या आयटी कंपनीचा. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी वर्षभरातच मोठी कमाई केली आहे. सध्या ३ आय इन्फोटेक लि..चा शेअर सध्या ७३.५५ रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. (Share Market: Investment of Rs 1 Lakh in Multibagger Stock of 3i Infotech Ltd turned to Rs 25 Lakhs in 1 year)

३ आय इन्फोटेक लि.चा २,३९३ टक्क्यांचा परतावा 

सध्या ३ आय इन्फोटेक लि. चा शेअर ७३.५५ रुपयांच्या (Share price of 3i Infotech Ltd) पातळीवर व्यवहार करतो आहे. फक्त वर्षांपूर्वी म्हणजे ६ नोव्हेंबर २०२०ला ३ आय इन्फोटेक लि.च्या शेअरची किंमत २.९५ रुपये प्रति शेअर इतकी होती. इतक्या कमी किंमतीत मिळणाऱ्या या आयटी शेअरने एका वर्षात जवळपास २,३९३ टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. फक्त १२ महिन्यातच यात गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे कित्येक पटींनी वाढले आहेत.

एक लाखाच्या गुंतवणुकीचे २४ लाख रुपये

३ आय इन्फोटेक लि.च्या शेअरच्या किंमत वर्षभराच्या कालावधीत जवळपास २४ पट वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज २४ लाख रुपये झाले आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती उभी करून दिली आहे. आगामी काळातदेखील आयटी क्षेत्रामध्ये तेजी असण्याचीच चिन्हे आहेत, त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

कंपनीची स्थापना, महसूल

३ आय इन्फोटेक लि.ची स्थापना १९९३ मध्ये झाली होती. ही एक आयटी कंपनी आहे. या कंपनीचे प्रवर्तक आयसीआयसीआय बॅंक आहे. मात्र मार्च २००२ मध्ये आयसीआयसीआय बॅंकेने यातील मोठा हिस्सा विकला होता. कंपनीने मागील वर्षी १,१२१.७५ कोटी रुपयांचा महसूल कमावला होता.

शेअर बाजाराचा ट्रेंड

आज सेन्सेक्स दिवसअखेर ६०,७१८.७१ अंशाच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने किरकोळ वाढ नोंदवली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी १८,१०९.४५ अंशांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्येही थोडीशीच वाढ झाली. यावर्षभरात शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीचा वारू उधळला आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी