Multibagger stock | या हेल्थकेअर कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना आर्थिकदृष्ट्या केले एकदम फिट, करून दिली करोडोंची कमाई

Multibagger stock : फक्त वर्षभरापूर्वी म्हणजे ९ नोव्हेंबर २०२० ला एनएनजी लाइफसायन्सच्या शेअरची किंमत २५.०० रुपये प्रति शेअर इतकी होती. या शेअरने एका वर्षातच जवळपास २,९५१ टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • या हेल्थकेअर कंपनीने गुंतवणुकदारांना करून दिली करोडोंची कमाई
  • एनएनजी लाइफसायन्सच्या शेअरने फक्त वर्षभरातच दिला २,९५१ टक्क्यांचा परतावा
  • एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य झाले ३१ लाख रुपये

Multibagger stock | मुंबई: दिवसेंदिवस आरोग्य आणि आरोग्याशी निगडीत बाबींना अत्यंत महत्त्व येत चालले आहे. त्यातच कोरोना महामारीच्या संकटाने तर या क्षेत्राचे महत्त्वाचे अधोरेखितच केले. हेल्थकेअर क्षेत्र हे मागील काही दशकात जबरदस्त वेगाने विस्तारणारे क्षेत्र आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात या क्षेत्राची प्रचंड वेगाने वाढ झाली आहे. फक्त मोठ्या आणि आघाडीच्या हेल्थकेअर कंपन्यांनीच नव्हे तर छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांनीदेखील या कालावधीत मोठा महसूल आणि तडाखेबंद नफा कमावला आहे. मागील वर्षभरात शेअर बाजाराने (Share Market)सर्व विक्रम तोडले आहेत. साहजिकच या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी जबरदस्त कमाई केली आहे. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात हेल्थकेअर क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत अभूतपूर्व तेजी आली आहे. या क्षेत्रातील काही शेअर्स मल्टीबॅगर्स ठरले आहेत. असा एक मल्टीबॅगर शेअर आहे, एनएनजी लाइफसायन्स (ANG life science) या हेल्थकेअर क्षेत्रातील कंपनीचा. या शेअरमध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी मोठी कमाई केली आहे. सध्या एनएनजी लाइफसायन्सचा शेअर सध्या ७६२.८० रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना छोट्या गुंतवणुकीतून मोठी कमाई करून दिली आहे. (Share Market: Investment of Rs 1 Lakh in Multibagger Stock of ANG life science become Rs 31 Lakhs in 1 year)

एनएनजी लाइफसायन्सचा २,९५१ टक्क्यांचा परतावा 

सध्या एनएनजी लाइफसायन्सचा शेअर ७६२.८० रुपयांच्या (Share price of ANG life science) पातळीवर व्यवहार करतो आहे. फक्त वर्षभरापूर्वी म्हणजे ९ नोव्हेंबर २०२० ला एनएनजी लाइफसायन्सच्या  शेअरची किंमत २५.०० रुपये प्रति शेअर इतकी होती. या शेअरने एका वर्षातच जवळपास २,९५१ टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. या शेअरने वर्षभरातच गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. 

एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले ३१ लाख रुपये

एनएनजी लाइफसायन्सच्या शेअरच्या किंमत वर्षभराच्या कालावधीत जवळपास ३१ पट वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज ३१ लाख रुपये झाले आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती (Wealth creation)उभी करून दिली आहे. आगामी काळातदेखील हेल्थकेअर क्षेत्रामध्ये मोठा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

कंपनीचा व्यवसाय आणि उत्पादने

एनएनजी लाइफसायन्सची स्थापना २००६ मध्ये झाली होती. कंपनी ड्राय इंजेक्टेबल पावडरचे उत्पादन करते. त्याचबरोबर डायग्नोस्टिक्सच्या क्षेत्रातदेखील कार्यरत आहेत.

शेअर बाजारातील कमाई

शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीचा वारू उधळला आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी