Multibagger stock | मुंबई: दिवाळीचा मोठा सण येऊ घातला आहे. दिवाळीच्या आणि सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण आपल्या घराला रंग देऊन सुशोभित करत असतात. रंगांच्याच बाजारपेठेतील एका आघाडीच्या कंपनीने मागील वीस वर्षात गुंतवणुकदारांना जबरदस्त पैसा कमावून दिला आहे. या कंपनीने गुंतवणुकदारांच्या आयुष्यात पैशांची उधळण केली करत त्यांचे आयुष्य रंगांनी भरून टाकले आहेत. शेअर बाजारातील (Share market investment)सध्याच्या तुफान तेजीमुळे अनेक गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीची जबरदस्त घोडदौड अनुभवायला मिळते आहे. काही शेअर जे काही वर्षांपूर्वी अतिशय किरकोळ किंमतीत उपलब्ध होते त्यांनी आज गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण केली आहे. काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकदारांनी संयम राखत गुंतवणूक केल्यावर त्या संयमाचा दणकेबाज फायदा गुंतवणुकदारांना मिळाला आहे. बर्जर पेंट्स इंडिया लि. (Berger Paints India Ltd) या कंपनीच्या शेअरने मागील वीस-बावीस वर्षात गुंतवणुकदारांना मालमाल केले आहे. सध्या बर्जर पेंट्स इंडिया लि. चा शेअर ७३६.३० रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. या शेअरने लाखाचे रुपांतर करोडोंमध्ये केले आहे. (Share market: Investment of Rs 1 Lakh in Multibagger Stock of Berger Paints India Ltd turned to Rs 2.83 crores in 22 years)
सध्या बर्जर पेंट्स इंडिया लि. चा शेअर ७३६.३० रुपयांच्या (Share price of Berger Paints India Ltd) पातळीवर व्यवहार करतो आहे. २२ वर्षांपूर्वी म्हणजे १ ऑक्टोबर १९९९ला या शेअरची किंमत २.६० रुपये प्रति शेअर इतकी होती. म्हणजे २२ वर्षात या शेअरने २८,२५७ टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. तर दहा वर्षपूर्वी म्हणजे ३० सप्टेंबर २०११ ला हा शेअर ३५.६३ रुपये या किंमतीला उपलब्ध होता. या दहा वर्षाच्या कालावधीत बर्जर पेंट्स इंडिया लि. च्या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास १,९६९ टक्क्यांचा म्हणजेच जवळपास २,००० टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा देत गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे.
बर्जर पेंट्स इंडिया लि. च्या शेअरच्या किंमत २२ वर्षांच्या कालावधीत जवळपास २८३ पट वाढ झाली आहे. २२ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज २ कोटी ८३ लाख रुपये झाले आहे. तर दहा वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज जवळपास २१ लाख रुपये झाले आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती (Wealth creation)उभी करून दिली आहे.
बर्जर पेंट्सची स्थापना १९२३ ला झाली होती. कंपनी रंगांच्या उत्पादनाच्या व्यवसायात आहे. कंपनीचा महसूल ६,३६५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनीचे मुख्यालय कोलकाता येथे. बर्जर पेंट्स ही एक भारतीय मल्टीनॅशनल कंपनी आहे. भारतात कंपनीचे १६ उत्पादन प्रकल्प असून २ नेपाळमध्ये आहेत. त्याचबरोबर पोलंड आणि रशिया येथेदेखील प्रत्येकी एक उत्पादन प्रकल्प बर्जर पेंट्सचा आहे. रंगांच्या क्षेत्रात ही देशातील आघाडीची आणि नामवंत कंपनी आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देंशाक असलेला सेन्सेक्स आज दिवसअखेर ६१,१४३.३३ अंशांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी १८,२१०.९५ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांना आज थोडी घसरण झाल. मात्र शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.
(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)