Multibagger stock | या काचेच्या वस्तू बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने दिला १,२३९ टक्क्यांचा दणदणीत परतावा

Multibagger stock | सध्या बोरोसिल रिन्यूएबल्स लि.चा शेअर ४६८.०० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. फक्त दीड वर्षपूर्वी म्हणजे २९ मे २०२०ला हा शेअर ३४.९५ रुपये या किंमतीला उपलब्ध होता.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • बोरोसिल रिन्यूएबल्स लि.ने गुंतवणुकदारांना करून दिली जबरदस्त कमाई
  • गुंतवणुकदारांना मिळाला जवळपास १,२३९ टक्क्यांचा जबरदस्त परतावा
  • गुंतवणुकीचे मूल्य वाढले १३ पट

Multibagger stock | मुंबई:  वर्षभरात गुंतवणुकदारांनी शेअर बाजारात अभूतपूर्व पैसा कमावला आहे. सध्याच्या बाजारातील तुफान तेजीमुळे अनेक गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीची जबरदस्त घोडदौड अनुभवायला मिळते आहे. काही शेअर्सनी जबरदस्त घोडदौड करत काही महिन्यातच गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे. जे शेअर्स असे कित्येक पटींनी गुंतवणूक वाढवतात त्यांना मल्टीबॅगर शेअर म्हणतात. तर काही शेअर जे काही वर्षांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी अतिशय किरकोळ किंमतीत उपलब्ध होते त्यांनी आज गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण केली आहे. बोरोसिल रिन्यूएबल्स लि. (Borosil Renewables Ltd)या कंपनीच्या शेअरने मागील दीड वर्षातच गुंतवणुकदारांना मालमाल केले आहे. सध्या बोरोसिल रिन्यूएबल्स लि.चा शेअर ४६८.०० रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. या शेअरने गुंतवणुकदारांचा पैसा कित्येक पटींनी वाढवला आहे. (Share market: Investment of Rs 1 Lakh in Multibagger Stock of Borosil Renewables Ltd turned to Rs 13 Lakhs in 17 months)

१,२३९ टक्क्यांचा जबरदस्त परतावा 

सध्या बोरोसिल रिन्यूएबल्स लि.चा शेअर ४६८.०० रुपयांच्या (Share price of Borosil Renewables Ltd) पातळीवर व्यवहार करतो आहे. फक्त दीड वर्षपूर्वी म्हणजे २९ मे २०२०ला हा शेअर ३४.९५ रुपये या किंमतीला उपलब्ध होता. या दीड वर्षाच्या कालावधीत बोरोसिल रिन्यूएबल्स लि.च्या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास १,२३९ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना भरघोस परतावा देत जबरदस्त कमाई करून दिली आहे. 

१ लाखाच्या गुंतवणुकीचे झाले १३ लाख

बोरोसिल रिन्यूएबल्स लि.च्या शेअरच्या किंमत फक्त १७ महिन्यांच्याच कालावधीत जवळपास १३.५ पट वाढ झाली आहे. दीड वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज जवळपास १३.५ लाख रुपये झाले आहे. या कालावधीत या शेअरने गुंतवणुकदारांना जवळपास १,२३९ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे चांगला पैसा (Wealth creation)कमावून दिला आहे. 

बोरोसिल रिन्यूएबल्सचा व्यवसाय

ही कंपनी ग्लासवेअर म्हणजे काचेच्या वस्तूंचे उत्पादन करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी विशेषत: प्रयोगशाळेंमध्ये लागणारी विविध काचेची उपकरणे बनवण्यात या कंपनीची खासियत आहे. या क्षेत्रात कंपनीची चांगलीच मक्तेदारी असून कंपनीचा व्यवसाय विस्तारतो आहे. बोरोसिलची स्थापना १९६२ मध्ये झाली होती. भारताबरोबरच अमेरिका आणि युरोपमधील बाजारपेठेतदेखील कंपनीचा व्यवसाय विस्तारलेला आहे.

शेअर बाजारातील तेजी

मुंबई शेअर बाजाराचा निर्देंशाक असलेला सेन्सेक्स आज दिवसअखेर ६१,३५०.२६ अंशांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी १८,२६८.४० अंशांच्या पातळीवर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांना आज वाढ नोंदवली. शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी