Multibagger stock | या डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील शेअरने केले १ लाखाचे १८ लाख

Multibagger stock | सध्या ब्राइटकॉम ग्रुप लि.चा शेअर ७५.२५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे ४ नोव्हेंबर २०२० ला या शेअरची किंमत फक्त ४.२० रुपये प्रति शेअर इतकी होती.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • ब्राइटकॉम ग्रुप या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली
  • या वर्षात या शेअरने जवळपास जवळपास १,६९२टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला
  • या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज १८ लाख रुपये झाले

Multibagger stock | मुंबई: डिजिटल मार्केटिंग हे मागील काही वर्षात वेगाने विस्तारणारे क्षेत्र बनले आहे. कोणत्याही क्षेत्रातील उत्पादन असो त्याला डिजिटल मार्केटिंगशिवाय पर्याय नसतो. डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या  ब्राइटकॉम ग्रुप या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे काही शेअर्स जबरदस्त तेजीत आले आहेत. काही शेअर्स मल्टीबॅगर ठरत त्यांनी गुंतवणुकदारांचे पैसे काही पटींनी वाढवले आहेत. अशाच प्रकारची तेजी ब्राइटकॉम ग्रुप लि. (Brightcom Group Ltd)या कंपनीच्या शेअरने दाखवली आहे. काही कंपन्यांच्या शेअर्सनी वर्षभरात दणदणीत करून दिली आहे. शेअर बाजारातील (Share market investment)सध्याच्या तुफान तेजीमुळे अनेक गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. मात्र ज्या गुंतवणुकदारांनी संयम राखत गुंतवणूक केली आहे त्यांना याचा खरा फायदा मिळाला आहे. सध्या ब्राइटकॉम ग्रुप लि.चा शेअर सध्या ७५.२५ रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. या शेअरने छोट्या गुंतवणुकीतून मोठी कमाई करून दिली आहे. (Share Market: Investment of Rs 1 Lakh in Multibagger Stock of Brightcom Group Ltd turned to Rs 18 Lakhs in 1 year)

ब्राइटकॉम ग्रुप लि.चा १,६९२ टक्क्यांचा परतावा 

सध्या ब्राइटकॉम ग्रुप लि.चा शेअर ७५.२५ रुपयांच्या (Share price of Brightcom Group Ltd) पातळीवर व्यवहार करतो आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे ४ नोव्हेंबर २०२० ला या शेअरची किंमत फक्त ४.२० रुपये प्रति शेअर इतकी होती. या वर्षात या शेअरने जवळपास जवळपास १,६९२टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. या शेअरने वर्षभरातच गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. 

एक लाखाच्या गुंतवणुकीचे १८ लाख रुपये

ब्राइटकॉम ग्रुप लि.च्या शेअरच्या किंमत वर्षभराच्या कालावधीत जवळपास १८ पट वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज १८ लाख रुपये झाले आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती (Wealth creation)उभी करून दिली आहे. आगामी काळातदेखील डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात मोठा विस्तार होत या क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

कंपनीचा व्यवसाय आणि विस्तार

ब्राइटकॉम ग्रुप लि.ची स्थापना १९९९ मध्ये झाली होती. कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. भारताव्यतिरिक्त अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझिल, चिली, उरुग्वे, मेक्सिको, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, युक्रेन, सर्बिया, इस्त्रायल, चीन आणि ऑस्ट्रेलिया येथे कंपनीची कार्यालये आहेत. ही कंपनी डिजिटल मार्केटिंगच्या व्यवसाय विस्तार करते आहे. मागील वर्षी कंपनीचा २,७०६ कोटी रुपयांचा महसूल होता.

शेअर बाजाराची दिशा

शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी