Multibagger stock | या कंपनीची बिस्किटे खाण्याऐवजी शेअर विकत घेतले असते तर सोन्याच्या बिस्किटांमध्ये खेळला असता !

Multibagger stock | सध्या ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. चा शेअर ३,६६५.०० रुपयांच्या (Share price of Britannia Industries Ltd.) पातळीवर व्यवहार करतो आहे. वीस वर्षांपूर्वी म्हणजे १५ नोव्हेंबर २००१ला ब्रिटानियाच्या शेअरची किंमत ५७.६९ रुपये प्रति शेअर इतकी होती

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या शेअरने गुंतवणुकदारांना करून दिली जबरदस्त कमाई
  • कंपनीच्या शेअरने दिला ६,२५३ टक्क्यांचा परतावा
  • शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज ६४ लाख रुपये झाले

Multibagger stock | मुंबई: बिस्किटे हा पदार्थ घराघरात खाल्ला जातो. लहानांपासून ज्येष्ठांपर्यत सर्वानाच बिस्किटे आवडतात. ज्यांची बिस्किटे भारतात सर्वत्र लोकप्रिय आहेत अशी एक कंपनी म्हणजे ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. या कंपनीच्या शेअरने मागील दोन दशकात गुंतवणुकदारांना भरभरून कमाई करून दिली आहे. कंपनीची उत्पादने ही नेहमीच बाजारात लोकप्रिय आहेत आणि कंपनीच्या व्यवसायात वाढ होत आली आहे. ब्रिटानियाचा शेअर हा दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मल्टीबॅगर शेअर ठरला आहे. सध्या शेअर बाजारातील तेजीमुळे काही शेअर्स जबरदस्त तेजीत आले आहेत. काही शेअर्स मल्टीबॅगर ठरत त्यांनी गुंतवणुकदारांचे पैसे काही पटींनी वाढवले आहेत. शेअर बाजारातील (Share market investment)सध्याच्या तुफान तेजीमुळे अनेक गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. मात्र ज्या गुंतवणुकदारांनी संयम राखत गुंतवणूक केली आहे त्यांना याचा खरा फायदा मिळाला आहे. सध्या ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. चा शेअर सध्या ३,६६५.०० रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. या शेअरने छोट्या गुंतवणुकीतून मोठी कमाई करून दिली आहे. (Share Market: Investment of Rs 1 Lakh in Multibagger Stock of Britannia Industries Ltd. turned to Rs 64 Lakhs in 20 years)

ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. चा ६,२५३ टक्क्यांचा परतावा 

सध्या ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. चा शेअर ३,६६५.०० रुपयांच्या (Share price of Britannia Industries Ltd.) पातळीवर व्यवहार करतो आहे. वीस वर्षांपूर्वी म्हणजे १५ नोव्हेंबर २००१ला ब्रिटानियाच्या शेअरची किंमत ५७.६९ रुपये प्रति शेअर इतकी होती. या शेअरने २० वर्षात जवळपास ६,२५३ टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. या शेअरने वर्षभरातच गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. 

एक लाखाच्या गुंतवणुकीचे ६४ लाख रुपये

ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. च्या शेअरच्या किंमत वर्षभराच्या कालावधीत जवळपास ६४ पट वाढ झाली आहे. २० वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज ६४ लाख रुपये झाले आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती (Wealth creation)उभी करून दिली आहे. आगामी काळातदेखील फूड इंडस्ट्रीजना सुगीचे दिवस येण्याचीच चिन्हे आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

कंपनीचा व्यवसाय आणि विस्तार

ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. ची स्थापना १८९२ मध्ये झाली होती. ही कंपनी प्रसिद्ध वाडिया समूहातील एक आघाडीची कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. ही कंपनी भारतातील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी असून आपल्या बिस्किटांसाठी प्रसिद्ध आहे. मागील वर्षी कंपनीने ११,८७९ कोटी रुपयांचा महसूल कमावला होता.

शेअर बाजाराची दिशा

शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी