Multibagger stock | दिवाळी ते दिवाळी १७,०७५ टक्के धमाकेदार परतावा देणारा शेअर...मागच्या दिवाळीतील रोडपती या दिवाळीपर्यत करोडपती!

Multibagger stock | अगदी चिल्लरच्या भावात मिळणाऱ्या या शेअरने गुंतवणुकदारांना करोडोंची कमाई करून देत श्रीमंत बनवले आहे. सध्या फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअरची किंमत १८५.५० रुपये प्रति शेअर इतकी आहे.

Multibagger Stock of Flomic Global Logistics
करोडपती बनवणारा फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सचा शेअर 
थोडं पण कामाचं
  • या शेअरच्या दणदणीत परताव्याने गुंतवणुकदारांची दिवाळीआधीच दिवाळी
  • १२ महिन्यांमध्ये चिल्लरचे झाले करोडो, फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअरने दिला १७,०७५ टक्क्यांचा छप्परफाड परतावा
  • १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास १ कोटी ७२ लाख रुपये

Multibagger stock | मुंबई: दिवाळीच्या सणाचा (Diwali) उत्साह सर्वत्र दिसून येत असतो. शेअर बाजाराने यावर्षी अभूतपूर्व तेजी दाखवल्याने यंदाची दिवाळी शेअर बाजार आणि शेअर बाजारात गुंतवणूक (Share market investment)करणाऱ्यांसाठी खास आहे. बाजारातील तेजीमुळे अनेक शेअर्सनीदेखील दिवाळीआधीच दिवाळी साजरी केली आहे. काही कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत काही पटींनी वाढ वर्षभरातच झाली आहे. गुंतवणुकदारांनी अशा मल्टीबॅगर्स शेअरद्वारे (Multibagger share) जबरदस्त कमाई केली आहे. मागील वर्षाची दिवाळी ते यंदाची दिवाळी या कालावधीत अनेकांचे आयुष्यच बदलून गेले आहे. मागील वर्षभरात गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवणाऱ्या शेअरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. असाच एक जबरदस्त शेअर आहे फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स (Flomic Global Logistics)या कंपनीचा. अगदी चिल्लरच्या भावात मिळणाऱ्या या शेअरने गुंतवणुकदारांना करोडोंची कमाई करून देत श्रीमंत बनवले आहे. सध्या फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअरची किंमत १८५.५० रुपये प्रति शेअर इतकी आहे. (Share Market: Investment of Rs 1 Lakh in Multibagger Stock of Flomic Global Logistics turned to Rs 1 Crore 72 Lakhs in 1 year)

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअरने बनवले करोडपती

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स या १९८१ मध्ये स्थापन झालेल्या कंपनीचा शेअर सध्या १८५.५० रुपये प्रति शेअरच्या (Share price of Flomic Global Logistics) किंमतीवर व्यवहार करतो आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे मागील वर्षाच्या दिवाळीअगोदर २९ ऑक्टोबर २०२०ला या शेअरची किंमत फक्त १.०८ रुपये प्रति शेअर इतकी होती. फक्त १२ महिन्यांआधी हा शेअर चिल्लरच्या किंमतीत मिळत होता. मागील वर्षाच्या दिवाळीपासून ते या वर्षाच्या दिवाळीपर्यत या शेअरने जवळपास १७,०७५ टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे. या शेअरचे गुंतवणुकदार एकाच वर्षात करोडपती झाले आहेत. या शेअरने करून दिलेल्या कमाईसमोर अनेक चांगल्या नामांकित कंपन्यांचे शेअर फिके पडले आहेत. 

एक लाखाचे १ कोटी ७२ लाख करणारा बंपर शेअर

फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स ही एक लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी आहे. या शेअरने १२ महिन्यांच्याच कालावधीत १७,०७५ टक्क्यांचा परतावा देत गुंतवणुकदारांना श्रीमंत (Wealth creation)केले आहे. एक वर्षापूर्वी या शेअरमध्ये केलेल्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास १ कोटी ७२ लाख रुपये झाले आहे. या मल्टीबॅगरने शेअरने अनेक शेअर्सना पछाडत छोट्या गुंतवणुकीद्वारे गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण केली आहे.

मागील पाच दिवसांपासून मात्र फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्सच्या शेअरमध्ये घसरण सुरू आहे. अनेक दिवस जबरदस्त तेजी नोंदवल्यावर आता या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

शेअर बाजाराची दिशा

मुंबई शेअर बाजाराचा निर्देंशाक असलेला सेन्सेक्स शुक्रवारी दिवसअखेर १०९ अंशाची घसरण नोंदवत ६०,०२९.०६ अंशांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी ४० अंशांची घसरण नोंदवत १७,८८८.९५ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांमध्ये आज घसरण झाली. यंदा शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी