Multibagger stock | या इलेक्ट्रिकल कंपनीच्या शेअरने कमावून दिले लाखो, गुंतवणुकदारांची दणदणीत कमाई

Multibagger stock | सध्या हेवेल्स इंडिया लि.चा शेअर १,२६७.८० रुपयांच्या (Share price of Havells India Ltd) पातळीवर व्यवहार करतो आहे. १० वर्षांपूर्वी म्हणजे ३० सप्टेंबर २०११ ला या शेअरची किंमत फक्त ७३.०९ रुपये प्रति शेअर इतकी होती.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • या शेअरने १० वर्षात गुंतवणुकदारांना छप्परफाड पैसा कमावून दिला
  • १० वर्षात या शेअरने जवळपास १,६३४ टक्क्यांचा दणदणीत परतावा
  • १ लाखाचे मूल्य आज १७ लाख रुपये

Multibagger stock | मुंबई: शेअर बाजाराने मागील वर्षभरात अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. काही कंपन्यांच्या शेअर्सनी वर्षभरात दणदणीत करून दिली आहे. तर काही कंपन्या अशा आहेत ज्यांनी दीर्घकालावधीत गुंतवणुकदारांसाठी संपत्ती निर्माण केली आहे. अशाच एका कंपनीच्या शेअरने १० वर्षात गुंतवणुकदारांना छप्परफाड पैसा कमावून दिला आहे. या कंपनीने गुंतवणुकदारांच्या करोडपती बनवले आहे. शेअर बाजारातील (Share market investment)सध्याच्या तुफान तेजीमुळे अनेक गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. गुंतवणुकदारांनी संयम राखत गुंतवणूक केल्यावर त्या संयमाचा प्रचंड फायदा गुंतवणुकदारांना मिळाला आहे. हेवेल्स इंडिया लि. (Havells India Ltd) या इलेक्ट्रिकल उपकरणे बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील १० वर्षात गुंतवणुकदारांना मालमाल केले आहे. सध्या हेवेल्स इंडिया लि. चा शेअर १,२६७.८० रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. या शेअरने छोट्या गुंतवणुकीतून लाखोंची कमाई करून दिली आहे. (Share Market: Investment of Rs 1 Lakh in Multibagger Stock of Havells India Ltd turned to Rs 17 Lakhs in 10 years)

हेवेल्स इंडिया लि.चा १,६३४ टक्क्यांचा जबरदस्त परतावा 

सध्या हेवेल्स इंडिया लि.चा शेअर १,२६७.८० रुपयांच्या (Share price of Havells India Ltd) पातळीवर व्यवहार करतो आहे. १० वर्षांपूर्वी म्हणजे ३० सप्टेंबर २०११ ला या शेअरची किंमत फक्त ७३.०९ रुपये प्रति शेअर इतकी होती. या १० वर्षात या शेअरने जवळपास १,६३४ टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा देत गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. 

एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले १७ लाख

हेवेल्स इंडिया लि.च्या शेअरच्या किंमत १० वर्षांच्या कालावधीत जवळपास १७ पट वाढ झाली आहे. १० वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज १७ लाख रुपये झाले आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती (Wealth creation)उभी करून दिली आहे. 

हेवेल्स इंडिया लि.चा व्यवसाय

हेवेल्स इंडिया लि.ची स्थापना १९५८ मध्ये झाली होती. इलेक्ट्रिकल्स उपकरणांच्या क्षेत्रात ही एक आघाडीची कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय नॉयडा येथे आहे.

शेअर बाजाराचा ट्रेंड

मुंबई शेअर बाजाराचा निर्देंशाक असलेला सेन्सेक्स आज दिवसअखेर ६७० पेक्षा जास्त अंशाची घसरण नोंदवत ५९,३०६.९३ अंशांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी १८५ अंशांची घसरण नोंदवत १७,६७१.६५अंशांच्या पातळीवर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांना आज घसरण झाली. मात्र शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी