Multibagger stock | या ऊर्जा क्षेत्रातील शेअरने वर्षभरात पैसा वाढवला सहापट

Multibagger stock | सध्या जेएसडब्ल्यू एनर्जीचा शेअर ३४१.५० रुपयांच्या (Share price of JSW Energy) पातळीवर व्यवहार करतो आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे २ नोव्हेंबर २०२० ला या शेअरची किंमत फक्त ५८.८० रुपये प्रति शेअर इतकी होती.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • जेएसडब्ल्यू एनर्जी या कंपनीच्या शेअरचा जवळपास ५०० टक्क्यांचा छप्परफाड परतावा
  • शेअरच्या किंमत वर्षभराच्या कालावधीत जवळपास ६ पट वाढ
  • १ लाखाचे मूल्य आज ६ लाख रुपये झाले

Multibagger stock | मुंबई: ऊर्जा क्षेत्र हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. शेअर बाजारातील तेजीमुळे काही शेअर्स जबरदस्त तेजीत आले आहेत. काही शेअर्स मल्टीबॅगर ठरत त्यांनी गुंतवणुकदारांचे पैसे काही पटींनी वाढवले आहेत. अशाच प्रकारची तेजी जेएसडब्ल्यू एनर्जी (JSW Energy)या उर्जा क्षेत्रातील एका कंपनीच्या शेअरने दाखवली आहे. काही कंपन्यांच्या शेअर्सनी वर्षभरात दणदणीत करून दिली आहे. शेअर बाजारातील (Share market investment)सध्याच्या तुफान तेजीमुळे अनेक गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. मात्र ज्या गुंतवणुकदारांनी संयम राखत गुंतवणूक केली आहे त्यांना याचा खरा फायदा मिळाला आहे. सध्या जेएसडब्ल्यू एनर्जीचा शेअर ३४१.५० रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. या शेअरने छोट्या गुंतवणुकीतून मोठी कमाई करून दिली आहे. (Share Market: Investment of Rs 1 Lakh in Multibagger Stock of JSW Energy turned to Rs 6 Lakhs in 1 year)

जेएसडब्ल्यू एनर्जीचा ५०० टक्क्यांचा परतावा 

सध्या जेएसडब्ल्यू एनर्जीचा शेअर ३४१.५० रुपयांच्या (Share price of JSW Energy) पातळीवर व्यवहार करतो आहे. वर्षभरापूर्वी म्हणजे २ नोव्हेंबर २०२० ला या शेअरची किंमत फक्त ५८.८० रुपये प्रति शेअर इतकी होती. या वर्षात या शेअरने जवळपास ४८०.७ म्हणजे जवळपास ५०० टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. या शेअरने वर्षभरातच गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. 

एक लाखाच्या गुंतवणुकीचे ६ लाख रुपये

जेएसडब्ल्यू एनर्जीच्या शेअरच्या किंमत वर्षभराच्या कालावधीत जवळपास ६ पट वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज ६ लाख रुपये झाले आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती (Wealth creation)उभी करून दिली आहे. आगामी काळातदेखील ऊर्जा क्षेत्रात मोठा विस्तार होत या क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

शेअर बाजाराची दिशा

मुंबई शेअर बाजाराचा निर्देंशाक असलेला सेन्सेक्स शुक्रवारी दिवसअखेर ८३१ पेक्षा जास्त अंशाची तेजी नोंदवत ६०,१३८.४६ अंशांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी २५८ अंशांची तेजी नोंदवत १७,९२९.६५ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांमध्ये आज वाढ झाली. शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी