Multibagger stock | आयटी कंपनीच्या शेअरची गगनभरारी, गुंतवणुकदारांची दिवाळी, लाखाचे झाले करोडो

Multibagger stock | सध्या एम्फॅसिस लि.चा शेअर ३,२८४.०० रुपयांच्या (Share price of Mphasis Ltd) पातळीवर व्यवहार करतो आहे. २० वर्षांपूर्वी म्हणजे १ ऑक्टोबर २००१ ला या शेअरची किंमत फक्त ८.७९ रुपये प्रति शेअर इतकी होती.

Multibagger Stock of Mphasis Ltd
एम्फॅसिस लि.चा मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • आयटी कंपनीच्या शेअरने कमावून दिले करोडो
  • एम्फॅसिस लि.च्या शेअरने २० वर्षात दिला ३७,२६० टक्क्यांचा छप्परफाड परतावा
  • १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे झाले ३ कोटी ७३ लाख रुपये

Multibagger stock | मुंबई: आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी (IT company)मागील दोन दशकात जबरदस्त झेप घेतली आहे. अनेक छोट्या आयटी कंपन्या मागील काही वर्षात जबरदस्त नफा कमावत विस्तारल्या आहेत. भारतातच नव्हे तर परदेशातदेखील आयटी कंपन्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांकडे गुंतवणुकदारांचे खास लक्ष असते. अशाच एका आयटी कंपनीने मागील वीस वर्षात गुंतवणुकदारांना छप्परफाड पैसा कमावून दिला आहे. या कंपनीने गुंतवणुकदारांच्या करोडपती बनवले आहे. शेअर बाजारातील (Share market investment)सध्याच्या तुफान तेजीमुळे अनेक गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीची जबरदस्त घोडदौड अनुभवायला मिळते आहे. काही वर्षांपूर्वी अतिशय किरकोळ किंमतीत असणाऱ्या शेअर्सनी आज गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती (Wealth creation) निर्माण केली आहे. गुंतवणुकदारांनी संयम राखत गुंतवणूक केल्यावर त्या संयमाचा प्रचंड फायदा गुंतवणुकदारांना मिळाला आहे. एम्फॅसिस लि. (Mphasis Ltd) या आयटी सेवा क्षेत्रातील कंपनीच्या शेअरने मागील वीस वर्षात गुंतवणुकदारांना मालमाल केले आहे. सध्या एम्फॅसिस लि.चा शेअर ३,२८४.०० रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. या शेअरने लाखाचे रुपांतर करोडोंमध्ये केले आहे. (Share market: Investment of Rs 1 Lakh in Multibagger Stock of Mphasis Ltd turned to Rs 3.73 crores in 20 years)

एम्फॅसिसचा ३७,२६० टक्क्यांचा जबरदस्त परतावा 

सध्या एम्फॅसिस लि.चा शेअर ३,२८४.०० रुपयांच्या (Share price of Mphasis Ltd) पातळीवर व्यवहार करतो आहे. २० वर्षांपूर्वी म्हणजे १ ऑक्टोबर २००१ ला या शेअरची किंमत फक्त ८.७९ रुपये प्रति शेअर इतकी होती. या २० वर्षात या शेअरने जवळपास ३७,२६० टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. गुंतवणुकदारांची अक्षरश: दिवाळी झाली आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा देत गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. दहा वर्षापूर्वी ७ ऑक्टोबर २०११ ला या शेअरची किंमत ३२१.९५ रुपये प्रति शेअर इतकी होती. म्हणजे दहा वर्षात या शेअरने ९२० टक्के परतावा दिला आहे.

एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले ३ कोटी ७३ लाख

एम्फॅसिस लि.च्या शेअरच्या किंमत २० वर्षांच्या कालावधीत जवळपास ३७३ पट वाढ झाली आहे. २० वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज ३ कोटी ७३ लाख रुपये झाले आहे. तर दहा वर्षात या शेअरने ९२० टक्के परतावा म्हणजे जवळपास १० पटीनी गुंतवणूक वाढवली आहे. दहा वर्षापूर्वी या एम्फॅसिस लि.च्या शेअरनमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज १० लाख झाले आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती (Wealth creation)उभी करून दिली आहे. 

एम्फॅसिस लि.चा व्यवसाय

एम्फॅसिस लि.ची स्थापना १९९८ ला झाली होती. कंपनी विविध प्रकारच्या आयटी सेवा पुरवण्याच्या व्यवसायात आहे. कंपनीचे मुख्यालय बंगळूरू येथे आहे. मागील वर्षी कंपनीने ९,७२२ कोटी रुपयांचा महसूल कमावला होता.

शेअर बाजाराचा कल

मुंबई शेअर बाजाराचा निर्देंशाक असलेला सेन्सेक्स आज दिवसअखेर १,१०० पेक्षा जास्त अंशाची घसरण नोंदवत ५९,९८४.७० अंशांच्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक असलेला निफ्टी ३५० अंशांची घसरण नोंदवत १७,८५७.२५ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांना आज घसरण झाली. मात्र शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी