Multibagger stock | या फार्मा कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना दिले श्रीमंतीचे टॉनिक, तुफान कमाई

Multibagger stock | सध्या न्यूलॅंड लॅबोरेटरीज लि. चा शेअर १,६९०.०० रुपयांच्या (Share price of Neuland Laboratories Ltd.) पातळीवर व्यवहार करतो आहे. १० वर्षांपूर्वी म्हणजे ४ नोव्हेंबर २०११ला न्यूलॅंड लॅबोरेटरीज लि. शेअरची किंमत ६८.०० रुपये प्रति शेअर इतकी होती.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • फार्मा कंपन्यांची दणदणीत कमाई
  • न्यूलॅंड लॅबोरेटरीज लि.च्या शेअरने गुंतवणुकदारांना करून दिली तुफान कमाई
  • या शेअरने दिला १० वर्षात जवळपास २,३८५ टक्क्यांचा छप्परफाड परतावा

Multibagger stock | मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्र हे मागील काही दशकात जबरदस्त वेगाने विस्तारणारे क्षेत्र आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात औषधनिर्मिती क्षेत्राची प्रचंड वेगाने वाढ झाली आहे. भारतीय फार्मा कंपन्यांदेखील (Pharmaceuticals Companies) मागील काही दशकात जोरदार कामगिरी केली आहे. फक्त मोठ्या आणि आघाडीच्या फार्मा कंपन्यांनीच नव्हे तर छोट्या आणि मध्यम आकाराच्या फार्मा कंपन्यांनीदेखील या कालावधीत मोठा महसूल आणि तडाखेबंद नफा कमावला आहे. मागील वर्षभरात शेअर बाजाराने (Share Market)सर्व विक्रम तोडले आहेत. साहजिकच या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी जबरदस्त कमाई केली आहे. मागील दहा वर्षांसाठी या कंपन्यांने सातत्यपूर्ण गुंतवणूक करणाऱ्यांनी पिढ्यांची कमाई केली आहे. त्यातच कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात फार्मा कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत अभूतपूर्व तेजी आली आहे. फार्मा क्षेत्रातील काही शेअर्स मल्टीबॅगर्स ठरले आहेत. असा एक मल्टीबॅगर शेअर आहे, न्यूलॅंड लॅबोरेटरीज लि. (Neuland Laboratories Ltd.) या फार्मा कंपनीचा. या शेअरमध्ये दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी मोठी कमाई केली आहे. सध्या न्यूलॅंड लॅबोरेटरीज लि.चा शेअर सध्या १,६९०.०० रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना छोट्या गुंतवणुकीतून मोठी कमाई करून दिली आहे. (Share Market: Investment of Rs 1 Lakh in Multibagger Stock of Neuland Laboratories Ltd. turned to Rs 25 Lakhs in 10 years)

न्यूलॅंड लॅबोरेटरीज लि.  चा २,३८५ टक्क्यांचा परतावा 

सध्या न्यूलॅंड लॅबोरेटरीज लि. चा शेअर १,६९०.०० रुपयांच्या (Share price of Neuland Laboratories Ltd.) पातळीवर व्यवहार करतो आहे. १० वर्षांपूर्वी म्हणजे ४ नोव्हेंबर २०११ला न्यूलॅंड लॅबोरेटरीज लि.  शेअरची किंमत ६८.०० रुपये प्रति शेअर इतकी होती. या शेअरने १० वर्षात जवळपास २,३८५ टक्क्यांचा छप्परफाड परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. या शेअरने वर्षभरातच गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. 

एक लाखाच्या गुंतवणुकीचे २५ लाख रुपये

न्यूलॅंड लॅबोरेटरीज लि. च्या शेअरच्या किंमत वर्षभराच्या कालावधीत जवळपास २५ पट वाढ झाली आहे. १० वर्षापूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाखाचे मूल्य आज २५ लाख रुपये झाले आहे. या मल्टीबॅगर शेअरने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना छोट्याशा गुंतवणुकीद्वारे मोठी संपत्ती (Wealth creation)उभी करून दिली आहे. आगामी काळातदेखील फार्मा क्षेत्राला सुगीचे दिवस येण्याचीच चिन्हे आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

कंपनीचा व्यवसाय आणि विस्तार

न्यूलॅंड लॅबोरेटरीज लि. ची स्थापना १९८४ मध्ये झाली होती. कंपनी विविध एपीआय आणि औषधांच्या निर्मितीच्या व्यवसायात आहे.

शेअर बाजारातील गुंतवणूक

शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीचा वारू उधळला आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी