Multibagger stock | या कंपनीच्या शेअरने फक्त एक हजाराचे केले १० लाख, तुफान पैसा

Multibagger stock : २० वर्षात आयशर मोटर्सचा शेअर फक्त २.४३ रुपयांच्या किंमतीवरून २,७१२ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचला आहे. मागील सहा महिन्यात आयशर मोटर्सच्या शेअरची किंमत २,४४७.२५ रुपयांवरून वाढून २,७१२ रुपयांवर पोचली आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होतेच मात्र त्याचबरोबर नफा कित्येक पटींनी वाढतो
  • आयशर मोटर्सच्या शेअरच्या किंमतीत २० वर्षात १११६ पटींनी वाढ
  • फक्त १ हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य झाले १० लाख रुपये

Multibagger stock | मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूक (Share Market Investment) ही तुमच्या संयमाची परीक्षा घेणारी असते. मात्र जे गुंतवणुकदार या परीक्षेत पास होत दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करतात त्यांच्यावर पैशांचा पाऊस धो धो कोसळतो. शेअर निवडताना चांगल्या कंपनीचा शेअर निवडत भविष्यात त्या कंपनीच्या व्यवसायात मोठी वाढ होणार आहे याचा अंदाज घ्यावा. दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होतेच मात्र त्याचबरोबर गुंतवणुकदारांना मिळणारा नफा हा कित्येक पटींनी वाढणार असतो. आयशर मोटर्स (Eicher Motors)या कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक हे याचे उत्तम उदाहरण आहे. मागील २० वर्षात आयशर मोटर्सचा शेअर फक्त २.४३ रुपयांच्या किंमतीवरून २,७१२ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचला आहे. (Share Market: Investment of Rs 1,000 in Multibagger Stock of Eicher Motors become Rs 10 Lakhs in 20 years)

आयशर मोटर्सचा तडाखेबंद परतावा आणि पैशांचा पाऊस

आयशर मोटर्सच्या शेअरमध्ये गुंतवणुकदार करोडपती आणि अब्जाधीश झाले आहेत. २० वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १,००० रुपयांचे मूल्य आज १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मागील २० वर्षात या शेअरने गुंतवणूक १,११६ पटींनी वाढवली आहे. २० वर्षात आयशर मोटर्सचा शेअर फक्त २.४३ रुपयांच्या किंमतीवरून २,७१२ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचला आहे.  मागील सहा महिन्यात आयशर मोटर्सच्या शेअरची किंमत २,४४७.२५ रुपयांवरून वाढून २,७१२ रुपयांवर (Share price of Eicher Motors) पोचली आहे. यावर्षी आतापर्यत या शेअरने २४ टक्के परतावा दिला आहे. मागील एकाच वर्षात आयशर मोटर्सच्या शेअरची किंमत १,२६८ रुपयांवरून वाढून २,७१२ रुपये प्रति शेअरवर पोचली आहे. मागील दहा वर्षात या मल्टीबॅगरने शेअरची (Multibagger stock) किंमत १७४ रुपयांवरून वाढून २,७१२ रुपयांवर पोचली आहे. या मल्टीबॅगरने शेअरने गुंतवणुकदारांसाठी जबरदस्त संपत्ती (Wealth creation)निर्माण केली आहे.

एक हजाराचे १० लाख आणि एक लाखाचे १० कोटी जेव्हा होतात

आयशर मोटर्सच्या शेअरमध्ये २० वर्षांपूर्वी गुंतवलेल्या १ हजार रुपयाचे मूल्य आज १०.१ लाख रुपये झाले आहे. तर २० वर्षांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज १०.१ कोटी रुपये झाले आहे. एप्रिल २०२०मध्येच जरी एखाद्या गुंतवणुकदाराने या शेअरमध्ये १०,००० रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य २१,५०० रुपये झाले असते. या शेअरने छप्परफाड परतावा देत गुंतवणुकादारांना कित्येक पिढ्यांची कमाई करून दिली आहे.

शेअर बाजारातील जबरदस्त कमाई

शेअर बाजाराने सध्या अभूतपूर्व तेजी दाखवली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीचा वारू उधळला आहे. यामुळे अनेक नवीन सर्वसामान्य गुंतवणुकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत. अर्थात शेअर बाजार रोजच वधारत जाईल आणि फक्त काही दिवसांतच आपण लाखोंची कमाई करू आणि श्रीमंत होऊ अशी अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजारात सावधपणे पावले उचलणेच योग्य ठरते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी