या नॉन बॅंकिग फायनान्शियल कंपनीच्या शेअरने एका वर्षात दिला ९०० टक्क्यांचा परतावा, गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस

फारशी चांगली कामगिरी नसतानाही मॅग्मा फिनकॉर्प (Magma Fincorp)या नॉन बॅंकिग फायनान्शियल कंपनीने (NBFC) म्हणजेच एनबीएफसी प्रकारातील कंपनीने मागील एका वर्षात दिला ९०० टक्क्यांपेक्षा (High returns) जास्त परतावा.

Magma Fincorp Shares gives more than 900 percent returns
मॅग्मा फिनकॉर्पने वर्षभरात दिला ९०० टक्क्यांचा परतावा 

थोडं पण कामाचं

  • मॅग्मा फिनकॉर्पच्या शेअरची जबरदस्त बॅटिंग
  • शेअर बाजाराची घोडदौड
  • फक्त एका वर्षातच दिला ९१९ टक्क्यांचा परतावा

मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणूक ही अनिश्चिततेने भरलेली असते. मात्र सध्या शेअर बाजाराला (Share Market)सुगीचे दिवस आले आहेत. शेअर बाजार सध्या विक्रमी पातळीवर (Share Market at record high)पोचला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने (Sensex) ५२,००० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीने (Nifty) १५,७०० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. शेअर बाजारात कधी तेजी येईल आणि बाजारात कधी घसरण सुरू होईल याचा अंदाज बांधणे अवघड असते. बऱ्याचवेळा फारशी चांगली कामगिरी न केलेल्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीतदेखील तेजी दिसून येते. अशीच परिस्थिती वित्तीय क्षेत्रातील काही कंपन्यांची आहे. फारशी चांगली कामगिरी नसतानाही मॅग्मा फिनकॉर्प (Magma Fincorp)या नॉन बॅंकिग फायनान्शियल कंपनीने (NBFC) म्हणजेच 'एनबीएफसी' प्रकारातील कंपनीने मागील एका वर्षात ९०० टक्क्यांपेक्षा (High returns) जास्त परतावा गुंतवणुकदारांना  दिला आहे. कंपनीचे गुंतवणुकदार (Investors) त्यामुळे वर्षभरातच मालमाल झाले आहेत. कंपनीच्या शेअरच्या किंमतीत तेजी (Share price of Magma Fincorp) दिसून येते आहे. (Magma Fincorp Shares gives more than 900 percent returns in just one year)

मॅग्मा फिनकॉर्पच्या शेअरची जबरदस्त बॅटिंग

मॅग्मा फिनकॉर्पचा (Magma Fincorp)शेअर १६२.४० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. मागील वर्षी म्हणजेच जून २०२० मध्ये मॅग्मा फिनकॉर्पच्या शेअरची किंमत फक्त १५.३० रुपये प्रति शेअर इतकी होती. मात्र मागील वर्षभरातच या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत जबरदस्त तेजी नोंदवण्यात आली आहे. वित्तीय सेवा क्षेत्रातील इतर कंपन्यांना मागे टाकत मॅग्माच्या शेअरने जबरदस्त घोडदौड केली आहे. या क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या बजाज फायनान्सला (Bajaj Finance)देखील मॅग्मा फिनकॉर्पेच्या शेअरने मागे टाकले आहे. बजाज फायनान्सच्या शेअरच्या किंमतीत वर्षभरात १२९.६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर मुथ्युट फायनान्स (Muthoot Finance) या आणखी एका आघाडीच्यी एनबीएफसी कंपनीच्या शेअरने वर्षभरात ६३.२७ टक्क्यांचा परतावा दिला आहे. बजाज होल्डिंग्सच्या (Bajaj Holdings)शेअरमध्ये ३९.७९ टक्के वाढ झाली आहे. मात्र मॅग्मा फिनकॉर्पने फक्त एका वर्षातच ९१९ टक्क्यांचा परतावा दिला आहे.

शेअर बाजाराची घोडदौड

मोठ्या कंपन्यांबरोबरच स्मॉलकॅप आणि मिडकॅप श्रेणीतील कंपन्याच्या शेअरच्या किंमतीत मोठी तेजी दिसून येते आहे. मागील वर्षी लॉकडाऊननंतर शेअर बाजार गडगडला होता. मात्र त्यानंतर काही महिन्यातच पुन्हा सावरत बाजाराने तेजी दाखवत विक्रमी पातळी गाठली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता देशभरात कमी झालेली दिसते आहे. त्यामुळे अनेक राज्य सरकार हळूहळू कामकाज खुले करत आहेत. महाराष्ट्रातदेखील टप्प्या टप्प्याने कामकाज आणि बाजारपेठा खुल्या करण्यात येत आहेत. राज्याच्या विविध भागांची पाच लेव्हलमध्ये विभागणी करण्यात आली आहे. लेव्हल १ आणि २ मध्ये बहुतांश कामकाज खुले करण्यात आले आहे. तर उर्वरित भागांमध्ये निर्बंध लागू राहणार आहेत. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये निर्बंधांसह काही बाबींना सूट देण्यात आली आहे. उद्योगधंदे पुन्हा पूर्वरत होऊ लागल्याने शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

फेब्रुवारीपासून मॅग्मामध्ये आली मोठी तेजी

मॅग्मा फिनकॉर्पच्या शेअरच्या किंमतीत फेब्रुवारी २०२१ पासून मोठी तेजी आली आहे. फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या संचालक मंडळाने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ३,००० कोटी रुपयांच्या डेट सिक्युरिटिजला बाजारात आणण्यास मंजूरी दिली होती. कंपनी यातून भांडवल उभारणार होती. त्यामुळे कंपनीच्या हातातील खेळते भांडवलदेखील वाढणार होते. या गोष्टीमुळे बाजारात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत मोठी तेजी येण्यास सुरूवात झाली. याशिवाय समोर आलेल्या वृत्तानुसार सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांची रायझिंग सन होल्डिंग्स (Rising Sun Holdings) ही एक कंपनी आणि प्रमोटर समूहातील दोन सदस्य मॅग्मा फिनकॉर्पमध्ये मोठी हिस्सेदारी विकत घेण्यास तयार होते. मार्चच्या सुरूवातीलाच कंपनीच्या समभागधारकांनी रायसिंग सन होल्डिंग्सला प्रेफरेन्शियल इक्विटी शेअर इश्यू करून ३,४५६ कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यास परवानगी दिली होती. अर्थात या व्यवहाराला सेबी आणि इतर नियामक मंडळांची मंजूरी मिळायची आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी