वडापावच्या किंमतीत मिळणाऱ्या 'या' शेअरने फक्त १२ महिन्यात कमावून दिले 60 लाख रुपये

८ जुलै २०२० ला मुंबई शेअर बाजारात आदित्य व्हिजनच्या एका शेअरची किंमत २०.८६ रुपये प्रति शेअर इतकी होती. आज मुंबई शेअर बाजारात आदित्य व्हिजनचा शेअर १,२२५.६५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे.

Multibagger share of Aditya Vision
आदित्य व्हिजनच्या शेअरची छप्परफाड कमाई 

थोडं पण कामाचं

  • कोरोना महामारीच्या काळात या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना करून दिली जबरदस्त कमाई
  • आदित्य व्हिजनने मागील १२ महिन्यात ६,०२५ टक्के परतावा दिला
  • एका वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास ६० लाख रुपये

मुंबई: बिहारमध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या विक्रीच्या व्यवसायात असणाऱ्या 'आदित्य व्हिजन' (Aditya Visison)या कंपनीने गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे. शेअर बाजारात (Share Market) सध्या या शेअरच्या किंमतीमध्ये जोरदार उसळी आली आहे. सध्या फक्त बिहारमध्येच व्यवसायाची व्याप्ती असणारी ही कंपनी पुढील दोन वर्षात झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि आसाम या शेजारील राज्यांमध्ये देखील आपल्या व्यवसायाचा विस्तार करणार आहे. कंपनीने आपले लक्ष मुख्यत: टियर २ आणि टियर ३ शहरांवर केंद्रीत केले आहे. कोरोना महामारीच्या काळात या कंपनीच्या शेअरने (Share  price of Aditya Vision) गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई (High returns SHare)करून दिली आहे. आदित्य व्हिजन या कंपनीने मागील एकच वर्षात ६,००० टक्क्यांपेक्षा (Multibagger share) जास्त दणदणीत परतावा गुंतवणुकदारांना(Investors) कमावून दिला आहे.  (Multibagger Stock, Investment of Rs 1 lakh in Aditya Vision become Rs 60 lakhs in 12 months)

एका वर्षात केले १ लाखाचे ३७ लाख रुपये

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या रिटेल व्यवसायातील आदित्य व्हिजन या कंपनीने फक्त वर्षभरात गुंतवणुकदारांना रंकाचा राव बनवला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास ६० लाख रुपये झाले आहेत. आदित्य व्हिजनने मागील १२ महिन्यात ६,०२५ टक्के परतावा दिला आहे. ८ जुलै २०२० ला मुंबई शेअर बाजारात आदित्य व्हिजनच्या एका शेअरची किंमत २०.८६ रुपये प्रति शेअर इतकी होती. आज मुंबई शेअर बाजारात आदित्य व्हिजनचा शेअर १,२२५.६५ रुपये प्रति शेअरच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. 

कंपनीचा विस्तार

आदित्य व्हिजन विस्ताराच्या योजना आखते आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनी झारखंडमध्ये १२ ते १५ स्टोअर सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर एक वर्षाने उत्तर प्रदेशचे पूर्व भागात, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये स्टोअर सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. मार्चमध्ये २०२०-२१ हे आर्थिक वर्षे सरताना आदित्य व्हिजनचा महसूल ५.९ टक्क्यांनी घटून ९०६.८८ कोटी रुपयांवर आला होता. तर त्याआधीच्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल ९६३.७१ कोटी रुपये इतका होता.

आदित्य व्हिजनच्या व्यवसायाची सुरूवात

कोरोना महामारीला लक्षात घएऊन कंपनीने ऑनलाईन विक्रीवर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ग्राहकांना कंपनीच्या स्टोअरवरून किंवा ऑनलाईन स्वरुपात आर्डर देता येणार आहेत. बिहारमधील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कंपनीचे स्टोअर आहे. आदित्य व्हिजन १०,००० पेक्षा जास्त उत्पादनांची विक्री करते. यामध्ये एलईडी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांचा समावेश आहे. कंपनीने १९९९ मध्ये आपल्या व्यवसायाची सुरूवात केली होती आणि २०१६ मध्ये कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झाली होती. कंपनी ग्राहकांसाठी लकी ड्रॉ सारख्या आकर्षक योजना चालवत असते. कोरोना महामारीच्या काळातदेखील कंपनीने लकी ड्रॉ काढले होते.

कोरोना महामारीनंतर शेअर बाजार गडगडला होता. मात्र त्यानंतर काही महिन्यातच शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. सध्या सेन्सेक्स आणि निफ्टी आपल्या उच्चांकीच्या जवळपास व्यवहार करत आहेत. त्यामुळे काही शेअर्स हे मल्टीबॅगर शेअर बनले आहेत.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच आमचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी